वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९६ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००२
  • नमुना पत्र
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—चांगलं पत्रलेखन
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • लोक घरी भेटत नाहीत तेव्हा
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ११/९६ पृ. २

प्रश्‍न पेटी

◼ ज्या घरमालकांना आपण घरी भेटू शकलो नाही अशांसोबत पत्रव्यवहार करताना आपण काय लक्षात ठेवण्यास हवे?

आपण लोकांना त्यांच्या घरी भेटी देतो तेव्हा वैविध्य कारणांपोटी त्यांच्याशी संपर्क साधणे हे अत्याधिक कठीण होत असल्याचे आपल्या प्रत्ययास येत आहे. काही प्रचारकांना, अशा लोकांप्रत पोहंचण्याकरता पत्रव्यवहार करणे अधिक व्यवहार्य असल्याचे दिसून आले आहे. हे उत्तम परिणाम घडवून आणत असले तरी काही समस्या टाळण्याकरता आपली मदत करू शकतील अशा काही स्मरणिका आहेत ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत:

पत्रव्यवहाराकरता संस्थेच्या परतीच्या पत्त्याचा उपयोग करू नका. यामुळे अनुचितपणे असे सूचित होईल, की पत्रे दफ्तरांनी पाठवली आहेत आणि याची परिणीती अनावश्‍यक समस्या आणि कधीकधी तर अतिरिक्‍त खर्च यात होते.

तुमच्याजवळ घरमालकाचा अचूक पत्ता व त्याबरोबरच पुरेसा टपालखर्चही आहे याची खात्री करा.

पत्त्यावर केवळ “रहिवाशास” असे लिहू नका; तर त्याच्या विशिष्ट नावाचा उपयोग करा.

घरात कोणी नसल्यास पत्रे दारातच ठेवू नका.

संक्षिप्त पत्रे सर्वोत्तम ठरतात. एक लांबलचक संदेश लिहीत बसण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एखादी हस्तपत्रिका अथवा एखादे जुने नियतकालिक त्यासोबत जोडा.

टंकलिखित पत्रे सुवाच्य असतात आणि अधिक अनुकूल छाप पाडतात.

तुम्ही त्या व्यक्‍तीस आधी व्यक्‍तिशः साक्ष दिल्याशिवाय पत्रे ही पुनर्भेट असल्याचे गणले जात नाही.

पूर्वी आस्था दर्शवलेल्या एखाद्या व्यक्‍तीस तुम्ही पत्र लिहीत असता तेव्हा, तुमच्याशी जेथे संपर्क साधता येईल असा विशिष्ट पत्ता व दूरध्वनी क्रमांकही द्या. आपला बायबल अभ्यास कार्यक्रम समजावून सांगा.

स्थानिक मंडळीच्या सभांचे आमंत्रण द्या. सभेच्या स्थळाचा पत्ता द्या तसेच सभांच्या वेळा देखील द्या.

क्षेत्र परतल्यावर घरी नसलेल्यांशी पत्रव्यवहार करत राहू नका; जो प्रचारक सध्या त्या क्षेत्रात काम करत आहे तो ते उरकण्याची जबाबदारी पेलेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा