वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९५ पृ. ८
  • इतरांच्या लाभास्तव त्यांना मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांच्या लाभास्तव त्यांना मदत करा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आस्था दाखवलेल्या सर्वांच्या लाभास्तव त्यांचा मागोवा घ्या
    आमची राज्य सेवा—१९९५
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • तुम्हाला आढळलेल्या आस्थेचा मागोवा घ्या
    आमची राज्य सेवा—१९९५
  • सूक्ष्मदृष्टीने प्रचार करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ९/९५ पृ. ८

इतरांच्या लाभास्तव त्यांना मदत करा

१ आपल्याला जे जाणून घेण्याची गरज आहे ते शिकवण्याचे अभिवचन यहोवा आपल्याला देतो. तो स्तोत्र ३२:८ मध्ये आपल्याला आश्‍वासन देतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” हे आश्‍वासन आपल्याकरता खूपच लाभाचे आहे. इतरजण बायबलमधील सुज्ञ सल्ला ऐकून लाभ कसा मिळवून घेऊ शकतात हे आपल्याला निःस्वार्थीपणे त्यांना दाखवायचे आहे. (यश. ४८:१७) सप्टेंबर दरम्यान, आपण ज्यांना भेटू त्या सर्वांना अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करून असे करू शकतो. आपल्या सादरता देताना, बायबलचे काहीच ज्ञान नसणाऱ्‍या तसेच बायबलच्या शिकवणुकींवर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या व्यक्‍तींना देखील बायबलचे व्यावहारिक मूल्य आपण दाखवू शकतो असे विविध मार्ग आहेत.

२ आज वैवाहिक समस्या सर्वत्र आढळत असल्यामुळे, तुम्ही “अनंतकाल जगू शकाल” पुस्तकातून हा विचार दाखवण्याचे कदाचित ठरवाल:

▪ “मी ज्यांच्याशी बातचीत केली असे अनेक लोक विवाहासंबंधीचे दुःख तसेच घटस्फोट यांच्यातील प्राचंड वाढीबद्दल खूप चिंतातुर आहेत. या समस्येविषयी तुम्हाला काय वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] त्यामागील कारणे काय असतील हे जाणण्यात अनेकजण अपयशी ठरले आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे प्रायत्न केला, तर जोडपी त्यांचा विवाह केवळ सुरक्षितच नव्हे, तर त्यामध्ये खरा आनंदही प्राप्त करू शकतील. बायबलमधील सल्ला लागू करण्यात यशाची गुरुकिल्ली अनेकांना मिळाली आहे.” इफिसकर ५:२८, २९, ३३ वाचा. पृष्ठ २४३ काढा, १६ व १७ परिच्छेदांची चर्चा करा व त्यानंतर पुस्तक सादर करा.

३ मुलांना मौल्यवान वेळेची व त्यांच्या पालकांकडील प्राशिक्षणाची गरज आहे. “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक सादर करताना तुम्ही म्हणू शकता:

▪ “आपल्या तरुणांच्या भविष्यातील कल्याणाबाबत आपण सर्वच चिंतातुर आहोत. तुमच्या मते, मुलांनी सुरक्षित भवितव्य शोधण्यात पालक त्यांना मदत करू शकतील असा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? [प्रातिसादासाठी वाव द्या.] सुमारे ३,००० वर्षांआधी लिहिलेल्या या बायबलच्या नीतीसूत्रातील हा सल्ला ऐका. [नीतिसूत्रे २२:६ वाचा.] शाळेत मिळणाऱ्‍या सूचनेकरवी आपली मुले पुष्कळ काही लाभ मिळवू शकत असली, तरी पालकांकरवी घरी दिले जाणारे प्राशिक्षण हे सर्वात मौल्यवान आहे. त्यासाठी वेळ, लक्ष व प्रीतीची गरज आहे, परंतु शेवटी श्रमाचे सार्थक होते.” पृष्ठ २४५ काढा, २० आणि २१ परिच्छेदांची चर्चा करा व कौटुंबिक चर्चेचा आधार म्हणून या पुस्तकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे स्पष्टीकरण द्या.

४ पृथ्वी परादीस कशी बनेल हे दाखवून तुम्हाला “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक सादर करावेसे वाटेल:

▪ “भवितव्यात तुमचे जीवन कसे असेल याविषयी तुम्ही चिंतातुर असाल असे मला नक्की वाटते. अनेक धार्मिक लिखाणे भवितव्याविषयी सांगतात. उदाहरणार्थ, बायबलमध्ये, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होण्याविषयी येशूने आपल्याला प्रार्थना करावयास शिकवले. ते घडल्यावर पृथ्वी कशी असेल? [प्रातिसादासाठी वाव द्या.] एका कलाकाराने परादीसमय जगाचे रेखाटलेले हे चित्र आहे. [पृष्ठे १२ व १३ वरील चित्र दाखवा. त्यानंतर परिच्छेद १२ मधील यशया ११:६-९ वाचा.] अशा जगात राहणे आश्‍चर्यकारक नसेल का? अशा एका परादीसमध्ये तुम्ही तसेच तुमचे कुटुंब कसे राहू शकते ते हे पुस्तक दाखवून देईल.”

५ एखाद्या घरी तुमचे यश ठरवण्यात तुमच्या सादरतेची आगाऊ तयारी करणे हे एक मुख्य कारण आहे. दार ठोठावण्याआधी एखाद्या शास्त्रवचनीय विचाराबद्दल सांगण्यास तुमच्याजवळ काही आहे याची खात्री करा. पुस्तक न स्वीकारल्यास तुम्ही जे नियतकालिक अथवा पत्रिका देण्याचे ठरवता त्यातील मनोरंजक वैशिष्ट्याबद्दल संक्षिप्त विवेचन देखील लक्षात ठेवा. सप्टेंबर दरम्यान, राज्याच्या सत्याचे बीज पेरण्यासाठी तुमच्या समोर असणाऱ्‍या प्रात्येक संधीचा फायदा घ्या. (उप. ११:६) सर्वकाळ टिकणाऱ्‍या लाभांची कापणी करण्यास तुम्ही इतरांची मदत करत असाल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा