कार्यक्षमतेत उत्तरोतर वाढ करण्याचा समय
१ या सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाचा सतत नजीक असलेला शेवट आणि आमच्या सेवकपणावर होणाऱ्या यहोवाकडील समृद्ध आशीर्वादांचा वर्षाव पाहता, आम्हास प्रेषित पेत्राच्या त्या सूचनेस अवमानता येणारच नाही की, कार्यक्षमतेत वाढ करण्यास “आपल्या मनरुपी कंबरा बांधा.”—१ पेत्र १:१३; यशया ६०:२२
२ पेत्राने ज्यावेळी ही वरील सूचना दिली त्यावेळी तो आमच्या तारणाप्रीत्यर्थ येशू ख्रिस्ताने दिलेल्या बलिदानाबाबत बोलत होता. आम्ही, जी राज्याची सुवार्ता गाजवितो ती आम्हाठायीच्या विश्वासाचे जाहीर प्रकटन करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे; शिवाय यहोवा देवाने त्याच्या पुत्राचे दान देऊन जी प्रीती आम्हावर व्यक्त केली तिच्या आम्हाठायीच्या आवडीचे ते धन्योद्गार असतात. (योहान ३:१६) मग, देवाने नेमून दिलेल्या या कार्यात मेमोरियल काळात तर अधिक तन्मयतेने मग्न राहण्याची संधि असते.
मेमोरियल समारंभ
३ या वर्षी मेमोरियल समारंभ एप्रिल १० रोजी सूर्यास्तानंतर पार पाडला जाईल. या खास घटनेस आपल्या दृष्टीसमोर ठेवून आम्ही, यहोवा देवासोबतच्या आमच्या नातेसंबंधाबद्दल तसेच येशूने दिलेल्या स्वअर्पणास आम्ही कोणत्या प्रकारे ओळखत आहोत याबद्दलची पूर्वचाचणी करू या. आमच्या विचार करण्यात, बोलण्यात आणि वागणूकीत आम्ही यहोवाकडील नीतीमान दर्जांना काटेकोरपणे निष्ठावंत राहून दरदिवशी आम्हाठायीच्या विश्वासाचे प्रदर्शन करीत आहोत का? राज्याबद्दल प्रचार करून व शिष्य बनविण्याचे कामात मग्न राहून आम्ही इतरांबद्दल आपणाठायी जी प्रीती बाळगतो ती प्रदर्शित करतो का? मेमोरियल समारंभात आम्ही विशेष मार्गी दरवर्षी, यहोवा देवाने आणि येशूने आम्हाकरिता जे काही केले त्याची आठवण करतो. (लूक २२:१९; १ करिंथ ११:२३, २४) अशा या विचारप्रवर्तक चिंतनाने आम्हास आमच्या वैयक्तिक क्षमतेनुसार तसेच परिस्थितीनुसार जी व्यवहारिक हालचाल करता येईल, ती करण्यास उत्तेजन द्यावे.
४ मार्च २५ रोजी जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या बहुतेक सर्व मंडळ्यातून “खरे जीवन मिळवण्यास झटा!” या विषयावर खास भाषण होईल. हे नवोदितांकरता केवढी उत्तम संधि पुरविते की, त्यांनीही मंडळीसोबत संबंधित राहण्यास सुरवात करावी. जे सर्व या खास भाषणास उपस्थित राहतील त्यांना पुढेही यहोवाच्या लोकांसोबत राहण्याचे उत्तेजन द्यावे.
मासिकांच्या विशेष अंकाचे वितरण करण्यात वाढ करा
५ द वॉचटावर आणि अवेक! ही मासिके जशी आमच्या सार्वजनिक सेवेत अती महत्त्वाची भूमिका पार पाडतात तशीच आम्हा सर्वांस नियमितपणे आध्यात्मिक अन्न आणि समयसूचक वाचन साहित्य पुरवीत आहेत. आता, मे आणि जूनची मासिके तयार करण्यात केवढे खास परिश्रम उचलले जात आहेत, हे जाणून सर्व प्रचारकांना मोठे कुतुहूल वाटेल. आम्ही वर्गणी सादर करताना या अंकांचे प्रदर्शन करू. यास्तव हे अंक हाती येताच लक्षपूर्वक वाचन करून त्यांचेतील मुख्य मुद्यांशी बारकाईने परिचित व्हा. हे सर्व आमच्या आवेशास प्रोत्साहन देणारे ठरेल की ज्या आधारे आम्ही प्रथम वर्गणी किंवा वर्गणी न केल्यास किरकोळ अंक किंवा दोन अंकासह एक माहितीपत्रक देऊ.
६ तुम्ही तुमच्या वैयक्तिक कार्यक्रमात वेळ काढून मे आणि जूनमध्ये सहाय्यक पायनियरींग करू शकाल का? जर मंडळीतील अनेक प्रचारकांनी मिळून एकाच वेळी पायनियरींग करण्याचे आयोजित केले तर या खास सेवा हालचालीचे काळात एकमेकांस मदत व उत्तेजनही देऊ शकाल. गटाने केल्या जाणाऱ्या सेवेकरिता आयोजन करून तीत जरूर ती मदत वडीलवर्ग आनंदाने देतील.
७ आपल्या स्वतःच्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करा, जसे स्वास्थ्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, काम किंवा शाळेचे वेळापत्रक ही सर्व लक्षात घ्या. जर सध्याला तुम्हाला पायनियरींग करणे शक्य नसेल तर क्षेत्र सेवेतील वेळेत केवढी वाढ करू शकता? हे तितकेच खरे की, आम्ही यहोवाबद्दलची आवड आणि त्याचा पुत्र येशू याच्या अमूल्य दानाबद्दल जी आपुलकी तिला, आपल्या संपूर्ण जिवाने जेवढी सेवा करतो तिजकरवी प्रदर्शित करतो, तिने यहोवा संतोषित होतो. देववचनांच्या प्रकाशात आम्ही स्वतःचे स्वपरिक्षण करीत राहून व सेवेकरिता मनरुपी कंबरा बांधून आम्ही उपकारस्मरणरुपी यज्ञ सतत वाहत राहण्यात यहोवाचा आत्मा आम्हास बळ पुरवील याची खात्री बाळगून असू शकतो.—इब्री. १३:१५.