वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 जुलै पृ. ३०-३१
  • बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • अभ्यास—फलदायक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • बायबलचा पूर्ण फायदा कसा घ्याल?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • यहोवानं केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींतून पुरेपूर लाभ मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 जुलै पृ. ३०-३१
यहोशवा नियमशास्त्र दिव्याच्या प्रकाशात वाचतो

बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा

यहोशवा नियमशास्त्र वाचतो; यरीहोच्या भिंती पडतात पण राहाबचं घर तसंच राहतं; यहोशवा आकाशाकडे हात करून प्रार्थना करतो

इस्राएल राष्ट्राला नियुक्‍त देशात घेऊन जाण्यासाठी यहोशवा त्यांचे नेतृत्व करणार होता. आणि हे काम सोपं नव्हतं. पण ते पूर्ण करण्यासाठी यहोवाने त्याला बळ दिलं व त्याला असं प्रोत्साहन दिलं: “तू खंबीर हो व खूप हिंमत धर.” पुढे त्याने यहोशवाला सांगितलं की जर त्याने त्याचं वचन वाचलं आणि त्याचं पालन केलं, तर तो योग्य निर्णय घेऊ शकेल आणि यशस्वी होईल.—यहो. १:७, ८.

आज आपणही “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण” काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) जर आपल्याला यहोशवासारखं यशस्वी व्हायचं असेल, तर आपणही यहोवाने त्याला जे सल्ले दिले होते त्यांचं पालन केलं पाहिजे. आपण नियमितपणे बायबल वाचलं पाहिजे आणि त्यातून आपण जे शिकलो त्याचा वापर करून योग्य निर्णय घेतले पाहिजेत.

पण आपल्यापैकी काहींना कदाचित अभ्यास कसा करायचा तेच माहीत नसेल, म्हणून अभ्यास करणं त्यांना कंटाळवाणं वाटत असावं. पण तरीही बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. “या सूचनांचा वापर करा.” या चौकटीत दिलेली माहिती अभ्यासातून उपयुक्‍त सल्ले मिळवण्यासाठी आणि तो मजेदार बनवण्यासाठी तुमची मदत करेल.

स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यातच मला आनंद आहे.” (स्तो. ११९:३५) देवाच्या वचनाचा अभ्यास करताना तुम्हालाही आनंद मिळेल. तुम्ही जसजसा बायबलचा अभ्यास करत राहाल तसतशी त्यातून सुंदर माहिती तुम्हाला मिळत जाईल.

यहोशवासारखं एखाद्या राष्ट्राचं जरी तुम्हाला नेतृत्व करायचं नसलं तरी तुमच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणून यहोशवासारखं देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्याचं पालन करा. असं केल्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घ्याल आणि यशस्वी व्हाल.

या सूचनांचा वापर करा

  • एक व्यक्‍ती हात जोडून प्रार्थना करताना

    अभ्यासाआधी प्रार्थना करा. बायबलमध्ये यहोवाचे विचार दिले आहेत आणि ते आपल्या फायद्यासाठी लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा बायबल वाचता तेव्हा यहोवाला प्रार्थना करा. वाचलेलं आपल्याला समजावं, लक्षात राहावं आणि शिकलेल्या माहितीचा उपयोग करून जीवनात योग्य निर्णय घेता यावेत म्हणून प्रार्थनेत यहोवाची मदत मागा.—एज्रा ७:१०.

  • एक व्यक्‍ती स्वतःला प्रश्‍न विचारते

    स्वतःला प्रश्‍न विचारा. तुम्ही जेव्हा बायबल किंवा त्यावर आधारित असलेलं एखादं प्रकाशन वाचता तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता: “मला या भागातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं? बायबलच्या मूळ विषयाशी याचा कसा संबंध आहे? मी या माहितीचा उपयोग करून इतरांची मदत कशी करू शकतो?”

  • एक व्यक्‍ती मनन करते

    मनन करा. वाचताना मधे थोडं थांबून, विचार करा. ‘हे वाचल्यामुळे मला काय वाटतं आणि मला असं का वाटतं? माझ्या आयुष्यात जे घडलं आहे, सध्या घडत आहे किंवा कदाचित भविष्यात घडेल त्या गोष्टींशी हे कसं संबंधित आहे? ही बायबल तत्त्वं आणि सल्ले मी माझ्या जीवनात कशी लागू करू शकतो?’ (ईयो. २३:५; स्तो. ४९:३) मनन करताना यहोवाने त्याच्या लोकांना काही गोष्टी करण्यापासून मनाई का केली होती हे तुम्हाला स्पष्ट करता येतं का ते पाहा. या गोष्टीचा विचार करा, की ज्या व्यक्‍तीबद्दल तुम्ही वाचत आहात त्याने एखादी गोष्ट जर वेगळ्या प्रकारे केली असती तर त्याचे काय परिणाम झाले असते.—अनु. ३२:२८, २९.

  • एक व्यक्‍ती बायबल अहवालाची कल्पना करते

    तुमच्या कल्पनाशक्‍तीचा वापर करा. उदाहरणार्थ, योसेफच्या भावांनी त्याला इश्‍माएली लोकांना विकून टाकलं तेव्हा काय घडलं असेल याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. (उत्प. ३७:१८-२८) तुम्हाला काय दिसतं, काय ऐकू येतं आणि कशाचा वास येतो? त्या व्यक्‍तींच्या जागी स्वतःला ठेवून पाहा. ते काय विचार करत आहेत, त्यांना काय वाटतं? अशा प्रकारे, आपल्या कल्पनाशक्‍तीचा वापर करून बायबलचा अभ्यास केल्यामुळे तो जास्त अर्थपूर्ण बनतो.

  • एक व्यक्‍ती अभ्यासासाठी असलेली साधनं वापरते

    अभ्यासासाठी असलेल्या साधनांचा वापर करा. संघटनेने पुरवलेल्या साधनांचा वापर करून तुम्ही संशोधन मजेदार बनवू शकता. तुमच्या भाषेत ऑनलाईन आणि छापील स्वरूपात असणाऱ्‍या साधनांचा वापर कसा केला जातो ते शिका. यासाठी तुम्ही इतरांचीही मदत घेऊ शकता. उदाहरणार्थ, वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक या साधनांत एका विशिष्ट विषयावर माहिती आणि अनेक बायबल वचनांचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसंच, देवाच्या वचनाच्या अभ्यासाकरता मार्गदर्शिका या पुस्तिकेचा वापर करा. या पुस्तिकेत नकाशे, कालगणना, मापं आणि इतरही विषयांबद्दल उपयुक्‍त माहिती देण्यात आली आहे.

  • एक व्यक्‍ती मुख्य मुद्द्‌यांची थोडक्यात उजळणी करते

    मुख्य मुद्दयांची उजळणी करा. असं केल्यामुळे तुम्ही जो अभ्यास केला आहे त्यातली माहिती लक्षात ठेवायला तुम्हाला मदत मिळेल. शिकलेली माहिती इतरांना सांगितल्यामुळे ती चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. या माहितीचा वापर तुम्ही सेवाकार्यातही करू शकता का? यामुळे मुख्य मुद्दे तर तुमच्या लक्षात राहतीलच, शिवाय तुमच्या अभ्यासामुळे इतरांनाही फायदा होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा