वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. २ पृ. १६
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चिंतांचा सामना करण्यासाठी आपल्याला बायबलमधून मदत मिळू शकते का?
  • पण कधी अशी वेळ येईल का जेव्हा चिंताच नसणार?
  • यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • चिंता
    सावध राहा!—२०१६
  • आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. २ पृ. १६
नंदनवनात असलेलं एक कुटुंब

देवाच्या राज्यात, लोक “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” —स्तोत्र ३७:११

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

चिंतांचा सामना करण्यासाठी आपल्याला बायबलमधून मदत मिळू शकते का?

तुम्ही काय म्हणाल?

  • हो

  • नाही

  • कदाचित

बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर [देवावर] टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:७) चिंतांपासून मुक्‍त होण्यासाठी देव आपली मदत करेल अशी खात्री बायबल आपल्याला देतं.

बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?

  • प्रार्थना करण्याद्वारे तुम्हाला “देवाची शांती” मिळेल आणि यामुळे चिंतांचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत होईल.—फिलिप्पैकर ४:६, ७.

  • देवाच्या वचनाचं वाचन केल्यामुळेसुद्धा आपल्याला तणावातून बाहेर यायला मदत होते.—मत्तय ११:२८-३०.

पण कधी अशी वेळ येईल का जेव्हा चिंताच नसणार?

काही लोक विश्‍वास करतात की . . . चिंता आणि तणाव या मानवांच्या जीवनाचा एक भाग आहे. तर इतर काहींचं मत आहे, की मृत्यूनंतरच्या जीवनात आपण सर्व चिंतापासून मुक्‍त होतो. तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

देवाने वचन दिलं आहे, की तो अशा सर्व गोष्टी काढून टाकेल ज्यांमुळे आपल्याला चिंता वाटते. बायबलमध्ये म्हटलं आहे: “मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल.”—प्रकटीकरण २१:४.

बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?

  • देवाच्या राज्यात लोक शांती आणि सुख अनुभवतील. —यशया ३२:१८.

  • आज आपल्याला विनाकारण ज्या चिंतांचा आणि तणावांचा सामना करावा लागतो त्या नसणार.—यशया ६५:१७.

अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा ३ वा अध्याय पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा