वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 २/१५ पृ. २९-पृ. ३० परि. ६
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०१३
  • वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • पिलाताकडून हेरोदाकडे आणि परत पिलाताकडे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 २/१५ पृ. २९-पृ. ३० परि. ६

वाचकांचे प्रश्‍न

परफ्यूम किंवा इतर सुगंधांचा ज्यांना त्रास होतो अशा बंधुभगिनींना मदत करण्यासाठी काय करता येईल?

काही जणांना परफ्यूम व इतर सुगंधांचा खूप त्रास होतो. दररोजच्या जीवनात ते अनोळखी लोकांच्या संपर्कात येतात, तेव्हा बहुतेक वेळा त्यांना हा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. पण, ख्रिस्ती सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना येताना बंधुभगिनींनी परफ्यूम वापरू नये अशी सूचना देता येईल का, अशी विनंती काही जणांनी केली आहे.

ख्रिस्ती मंडळीतील कोणतीही व्यक्‍ती मुद्दामहून असं काहीही करणार नाही, ज्यामुळे दुसऱ्‍या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणं कठीण जाईल. कारण, सभांमधून मिळणाऱ्‍या उत्तेजनाची आपल्या सर्वांनाच खूप गरज आहे. (इब्री १०:२४, २५) त्यामुळे, जर एखाद्याला इतरांनी लावलेल्या परफ्यूम इत्यादींचा इतका त्रास होत असेल, की त्याला सभांमध्ये बसणंही कठीण वाटत असेल तर तो याविषयी वडिलांशी बोलू शकतो. अर्थात, परफ्यूम लावण्याविषयी वडील कोणतेही नियम बनवणार नाहीत. कारण हे योग्य ठरणार नाही; शिवाय याला बायबलचाही आधार घेता येणार नाही. पण, ते बांधवांना याविषयी काही माहिती नक्कीच देऊ शकतात, ज्यामुळे इतरांना होणाऱ्‍या त्रासाची त्यांना जाणीव होईल. तसंच, वडील समस्येचं स्वरूप लक्षात घेऊन सेवा सभेतील ‘स्थानिक गरजा’ या भागात या विषयावर चर्चा करायचं ठरवू शकतात. यासाठी त्यांना आपल्या प्रकाशनांत या विषयावर आलेल्या माहितीचा आधार घेता येईल. किंवा, ते विचारपूर्वक एखादी घोषणा करण्याचं ठरवू शकतात.a पण, साहजिकच सभांमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घोषणा केल्या जाऊ शकत नाहीत. आपल्या सभांना नेहमीच नवीन लोक आणि इतर मंडळ्यांचे बांधव येत असतात. त्यांना या समस्येबद्दल कदाचित कल्पना नसेल. त्यामुळे, जर त्यांनी परफ्यूम लावला असेल, तर तेवढ्यासाठी आपण त्यांना संकोचल्यासारखं वाटायला लावू नये. आपल्या सभांना येणाऱ्‍या सर्वांचंच आपण प्रेमानं स्वागत करू इच्छितो.

अशा प्रकारची समस्या असलेल्या मंडळीत शक्य असल्यास, परफ्यूमचा त्रास होणाऱ्‍या बांधवांनी राज्य सभागृहात इतर बांधवांपासून दूर बसण्याची वडील वर्ग व्यवस्था करू शकतात. उदाहरणार्थ, राज्य सभागृहाला लागून अशी एखादी खोली असेल जिथं सभागृहात चाललेला कार्यक्रम ऐकण्याची सोय आहे; तिथं हे बांधव बसू शकतात. जर असा उपाय करणं शक्य नसेल, आणि काही जणांना अजूनही खूप त्रास होत असेल तर मग अशा बांधवांसाठी सभेचा कार्यक्रम रेकॉर्ड करण्याची मंडळीद्वारे व्यवस्था केली जाऊ शकते. किंवा, फोनद्वारे त्यांना घरच्या घरी सभेचा कार्यक्रम ऐकता येईल अशी व्यवस्था केली जाऊ शकते. बऱ्‍याच मंडळ्यांत ज्या बांधवांना वेगवेगळ्या कारणांमुळे घराबाहेर पडणं शक्य नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था केल्या जातात.

अलीकडच्या काही वर्षांत आपली राज्य सेवा यात प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहताना बंधुभगिनींनी अशा प्रकारचा त्रास असलेल्यांबद्दल विचारशीलपणा दाखवावा असं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. बहुतेक ठिकाणी अधिवेशनं बंद सभागृहांत आयोजित केली जातात जिथं खेळती हवा नसते. त्यामुळे, अधिवेशनांना येताना उग्र वासाच्या परफ्युम्सचा वापर करू नये अशी बांधवांना विनंती करण्यात येते. शिवाय, अधिवेशनं ज्या ठिकाणी आयोजित केली जातात, तिथं परफ्यूमचा त्रास होणाऱ्‍यांसाठी वेगळ्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणं सहसा शक्य नसतं. त्यामुळे अधिवेशनांना येताना बांधवांनी परफ्यूम वापरण्याच्या बाबतीत खास लक्ष द्यावं अशी विनंती करण्यात येते. पण मंडळीच्या सर्वच सभांना हा नियम लागू करण्याचा यामागे हेतू नाही, आणि कोणीही तसा अर्थ काढू नये.

सध्याच्या जगात आपल्या सर्वांनाच आदामापासून आलेल्या अपरिपूर्णतेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण इतर जण आपल्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी समजुतदारपणे वागतात तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं! एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहता यावं म्हणून परफ्यूम न वापरणं हे काही जणांना एक त्याग करण्यासारखं वाटू शकेल. पण आपल्या बांधवांवर असलेल्या प्रेमामुळे असा त्याग करणं आपल्याला जड जाणार नाही.

पंतय पिलात नावाचा एक माणूस खरोखरच होता याचे बायबलच्या व्यतिरिक्‍त इतर पुरावे आहेत का?

लॅटिन भाषेत पंतय पिलाताचं नाव कोरलेली दगडी पाटी

लॅटिन भाषेत पिलाताचं नाव कोरलेली दगडी पाटी

बायबलच्या वाचकांना पंतय पिलाताबद्दल माहीत आहे. कारण, येशूच्या न्यायचौकशीमध्ये व त्याला मृत्युदंड देण्यामध्ये त्याची भूमिका होती. (मत्त. २७:१, २, २४-२६) पण, त्याच्या नावाचा उल्लेख फक्‍त बायबलमध्येच नाही, तर त्या काळात लिहिलेल्या इतर ऐतिहासिक अहवालांतसुद्धा बऱ्‍याच वेळा आढळतो. दी अँकर बायबल डिक्शनरीनुसार, जगिक इतिहासाच्या अहवालांमध्ये पंतय पिलाताचा, “यहुदीयाच्या इतर कोणत्याही रोमी अधिपतीपेक्षा सर्वात जास्त वेळा व अधिक तपशीलवार” उल्लेख करण्यात आला आहे.

यहुदी इतिहासकार जोसिफसच्या लिखाणामध्ये पिलाताच्या नावाचा उल्लेख सर्वात जास्त वेळा येतो. पिलात अधिपती असताना, त्याला आलेल्या समस्यांशी संबंधित तीन विशिष्ट घटनांचा उल्लेख जोसिफसनं केला. शिवाय, पिलाताबद्दल आणखी एका घटनेची नोंद, यहुदी इतिहासकार फायलो यानं केली. तसंच रोमी सम्राटांचा इतिहास लिहिणारा लेखक टॅसिटस यानंदेखील पिलाताचा उल्लेख केला. सम्राट टायबेरियस राज्य करत असताना पंतय पिलातानंच येशूला मृत्युदंड सुनावला होता, असं त्यानं लिहिलं.

सन १९६१ मध्ये काही पुरातत्वशास्त्रज्ञ इस्राएलमधील सीझरीया इथं एका प्राचीन रोमी सभागृहाचं उत्खनन करत असताना त्यांना एक दगडी पाटी सापडली. या पाटीवर पिलाताचं नाव लॅटिन भाषेत अगदी स्पष्टपणे कोरलेलं होतं. ही पाटी पूर्वी एखाद्या मंदिराची असावी. त्यावरचा मजकूर जरी अपूर्ण असला तरी शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की त्यावर, “पूजनीय देवतांसाठी ही टायबेरियम [इमारत], यहुदीयाचा अधिपती पंतय पिलात याजकडून समर्पित” असं लिहिलं असावं. टायबेरियम, हे कदाचित रोमी सम्राट टायबेरियसच्या सन्मानार्थ बांधलेलं एक मंदिर असावं.

बाप्तिस्मा न झालेला प्रचारक उपस्थित असताना जर एखादी बहीण बायबल अभ्यास चालवत असेल तर तिनं डोक्यावर पदर घेतला पाहिजे का?

१५ जुलै २००२ च्या टेहळणी बुरूज अंकात “वाचकांचे प्रश्‍न” यामध्ये वरील विषयावर माहिती प्रकाशित करण्यात आली होती. एखादी बहीण बायबल अभ्यास चालवत असताना जर एक प्रचारक तिथं उपस्थित असेल, तर तिनं पदर घेतला पाहिजे, असं त्या लेखात सांगितलं होतं. मग त्या प्रचारकाचा बाप्तिस्मा झालेला असो किंवा नसो. या विषयावर आणखी विचार केल्यावर, मागे दिलेल्या सूचनेमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं दिसून येतं.

एखादी बहीण नियमित सुरू असलेला बायबल अभ्यास घेत असताना जर एक बाप्तिस्मा झालेला बांधव तिच्यासोबत असेल, तर तिनं नक्कीच पदर घेतला पाहिजे. कारण, ख्रिस्ती मंडळीमध्ये शिकवण्याची जबाबदारी बांधवांवर सोपवण्यात आली आहे. अभ्यास चालवताना, सहसा बांधवानं पार पाडावी अशी जबाबदारी ती बहीण पार पाडत असते. त्यामुळे, पदर घेण्याद्वारे ती यहोवानं केलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेबद्दल आदर दाखवते. (१ करिंथ. ११:५, ६, १०) शिवाय, जर बांधव बायबल अभ्यास घेण्यासाठी पात्र असेल, आणि असं करणं त्याला शक्य असेल, तर अभ्यास त्यानं चालवावा अशी विनंतीही ती त्याला करू शकते.

दुसरीकडे पाहता, अशी कल्पना करा की एक बहीण नियमित सुरू असलेला बायबल अभ्यास घेत आहे. पण, तिच्यासोबत असलेल्या प्रचारकाचा बाप्तिस्मा झालेला नाही आणि तो तिचा पतीही नाही. अशा वेळी, शास्त्रवचनांनुसार तिला पदर घेण्याची गरज नाही. पण, अशा परिस्थितीतही एखादी बहीण तिच्या विवेकामुळे कदाचित पदर घेण्याचं ठरवू शकेल.

a या विषयावर अधिक माहितीसाठी ८ ऑगस्ट २००० च्या अवेक! अंकातील पृष्ठे ८-१० वरील “हेल्पिंग दोज विथ एमसीएस” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा