वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 १२/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • कापणी होण्याआधी “शेतात” काम करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 १२/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूजचे नवीन अंक तुम्ही वाचलेत का? असल्यास, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देता येतात का ते पाहा:

• आपापसातले मतभेद मिटवताना कोणती गोष्ट विचारात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे?

आपण सर्वात आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या सगळ्यांमध्ये चुकीचे विचार आणि मनोवृत्ती आहेत. समोरच्या व्यक्‍तीला दोषी ठरवण्याआधी, आपण स्वतः समस्येचे कारण आहोत का याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.—८/१५, पृष्ठ २३.

• प्रेषितांची कृत्ये ३:२१ येथे सांगितल्यानुसार, ‘सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याचा काळ’ केव्हा असेल?

या पुनर्स्थापनेचे दोन टप्पे असतील. पहिली पुनर्स्थापना आध्यात्मिक परादीसची आहे जिची सुरवात १९१९ पासून झाली आहे. आणि दुसरी पुनर्स्थापना आपल्या पृथ्वीला प्रत्यक्षात परादीसच्या पूर्वस्थितीत आणले जाईल तेव्हा होईल.—९/१, पृष्ठे १७, १८.

• नीतिसूत्रे ६:६-८ येथे सांगितल्यानुसार मुंगीवर कोणी देखरेख करणारा नसतो तरीही ती कामाच्याबाबतीत आपल्याकरता उत्तम उदाहरण कशी आहे?

मुंग्यांच्या वारूळात एक राणी मुंगी असते; ती अंडी घालते आणि त्या वारूळातल्या सर्व मुंग्याची जननी असते एवढ्यासाठीच तिला राणी म्हटले जाते. मुंग्या अत्यंत मेहनती असतात. आपणही त्यांच्याप्रमाणेच असावे. सतत आपल्या कामात सुधार करत राहावा आणि आपल्यावर कोणाची देखरेख नसतानाही काम करत राहावे.—९/१५, पृष्ठ २६.

• योशीया “सुखाने” मरण पावेल अशी हुल्दाने २ राजे २२:२० (पं.र.भा.) येथे केलेली भविष्यवाणी खरी होती का, कारण योशीया तर युद्धात मरण पावला?

होय, तो सुखानेच मरण पावला. कारण सा.यु.पू. ६०९-६०७ मध्ये बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेमला घेरा घालून तिचा नाश केला त्या अरिष्टाआधीच तो मरण पावला.—९/१५, पृष्ठ ३०.

• शलमोनाने “रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी” अशी पत्नीला दिलेली उपमा प्रशंसात्मक होती हे कसे? (नीतिसूत्रे ५:१८, १९)

मादी आयबेक्स किंवा रानशेळी शांत स्वभावाची आणि दिसायला सुडौल असते. तरीही, जेथे अन्‍न जास्त प्रमाणात मिळत नाही अशा खडकाळ आणि कठीण ठिकाणी राहून ती आपल्या पिलांना जन्म देऊ शकते.—१०/१, पृष्ठ ३०, ३१.

• हेन्री ग्रू आणि जॉर्ज स्टॉर्स हे कोण होते?

हे दोघेजण १८०० च्या शतकात राहत होते. ते बायबलचे आवेशी विद्यार्थी होते. ग्रू यांना कळाले की, आत्म्याचे अमरत्व आणि नरकाग्नीच्या शिकवणींप्रमाणे त्रैक्याची शिकवण देखील शास्त्रानुसार नाही. स्टॉर्स यांना देखील हे समजले की, काही जणांना पृथ्वीवर अनंत जीवन प्राप्त होईल. हे दोघेही चार्ल्स टेझ रस्सल (ज्यांनी १८७९ मध्ये या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले) यांच्या आधी हयातीत होते.—१०/१५, पृष्ठे २६-३०.

• स्वतःच्याच रक्‍ताचा उपयोग केल्या जाणाऱ्‍या औषधोपचारांबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे काय मत आहे?

यहोवाचे साक्षीदार, स्वतःचे रक्‍त साठवून नंतर ते संक्रमणाद्वारे घेत नाहीत; त्यांचे हे मत बायबलच्या विश्‍वासानुसार आहे. शस्त्रक्रिया, वैद्यकीय चाचणी किंवा सध्या चालू असलेल्या उपचारात आपल्या रक्‍ताचा उपयोग कसा केला जावा याबाबतीत प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतःचा निर्णय घ्यावा. फक्‍त त्याने, रक्‍ताविषयी बायबल काय म्हणते याचा विचार करावा आणि स्वतःचे जीवन देवाला समर्पित केले आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.—१०/१५, पृष्ठे ३०, ३१.

• या वर्षाच्या सुरवातीला घेतलेल्या एका सर्वेक्षणात जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांमध्ये कोणती एक महत्त्वपूर्ण गरज दिसून आली?

पुरेसा निधी नसलेल्या विकसनशील देशांमध्ये ११,००० राज्य सभागृहांची गरज आहे असे निष्पन्‍न झाले. सोयीस्कर सभागृह बांधण्यासाठी अनेक देशांतील ख्रिश्‍चनांनी दिलेले अर्थसाहाय्य यासाठी उपयोगात आणले जात आहे.—११/१, पृष्ठ ३०.

• बायबलमध्ये मूळ भाषेतल्या काही शब्दांचा उपासनेशी काय संबंध आहे?

एक शब्द आहे लिटरजिया ज्याचे भाषांतर “सार्वजनिक सेवा” असे केले जाते. दुसरा एक शब्द आहे लॅट्रिआ ज्याचे भाषांतर “[देवाची] सेवा” असे केले जाते. (इब्री लोकांस १०:११; लूक २:३६, ३७, NW)—११/१५, पृष्ठे ११, १२.

• बायबलमधील आदाम-हव्वेच्या वृत्तान्तातून आपण कोणता मूलभूत धडा शिकू शकतो?

यहोवाचे अधिपत्य नाकारणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.—११/१५, पृष्ठे २४-७.

• देव आपल्या सेवकांना शक्‍ती देतो याबद्दल शास्त्रवचनात कोणता पुरावा दिला आहे?

दावीद, हबक्कूक आणि प्रेषित पौल या सर्वांनी कबूल केले होते की, यहोवाने त्यांना सामर्थ्य किंवा शक्‍ती दिली होती. (स्तोत्र ६०:१२; हबक्कूक ३:१९; फिलिप्पैकर ४:१३) अशाप्रकारे, आपण खात्री बाळगू शकतो की, देव आपली मदत करायला तयार व समर्थ देखील आहे.—१२/१, पृष्ठे १०, ११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा