वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१५ पृ. १८-२३
  • स्वातंत्र्यात ख्रिस्ती समर्पणानुसार जगणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वातंत्र्यात ख्रिस्ती समर्पणानुसार जगणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचा आत्मा नियमांची गरज कमी करतो
  • नियमन मंडळाला जबाबदार?
  • विद्यार्थी आणि सैनिक
  • आजच्या नियमन मंडळाशी सहकार्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” कोण आहे आणि तो काय काम करतो?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१५ पृ. १८-२३

स्वातंत्र्यात ख्रिस्ती समर्पणानुसार जगणे

“जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.”—२ करिंथकर ३:१७.

१. यहोवाचे साक्षीदार कोणाला समर्पित आहेत व ते कायदेशीर माध्यमांचा उपयोग का करतात?

यहोवाच्या साक्षीदारांचा असा विश्‍वास आहे, की त्यांचा धर्म सर्वकाळ टिकेल. यास्तव, ते चिरकालासाठी देवाची सेवा “आत्म्याने व खरेपणाने” करण्याची अपेक्षा करतात. (योहान ४:२३, २४) स्वतंत्र नैतिक प्राणी या नात्याने या ख्रिश्‍चनांनी यहोवा देवास पूर्ण समर्पण केले आहे व त्यानुसार जगण्याचा त्यांचा दृढनिश्‍चय आहे. त्यासाठी ते देवाचे वचन आणि त्याचा पवित्र आत्मा यांवर विसंबून राहतात. देव-प्रदत्त स्वातंत्र्यात पूर्ण मनाने आपल्या ख्रिस्ती समर्पणानुसार जीवन व्यतीत करत असताना साक्षीदार सरकारी “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या” भूमिकेबद्दल योग्य आदर दाखवतात आणि कायदेशीर साधनांचा व तरतूदींचा उचित वापर करतात. (रोमकर १३:१; याकोब १:२५) जसे की साक्षीदार, सह मानवांना, विशेषकरून आध्यात्मिक मार्गांद्वारे मदत करण्याचे कार्य पार पाडता यावे म्हणून विविध राष्ट्रांत असलेल्या अनेकांतील एका वॉच टावर संस्थेचा कायदेशीर साधन म्हणून उपयोग करतात. पण साक्षीदार कोणत्याही कायदेशीर एजन्सीला नव्हे तर देवाला समर्पित आहेत आणि यहोवाप्रती त्यांचे समर्पण कायमचे राहील.

२. यहोवाचे साक्षीदार बहुधा वॉच टावर संस्थेबद्दल आणि त्यासारख्या कायदेशीर एजन्सींबद्दल आदर का दाखवतात?

२ देवाचे समर्पित सेवक या नात्याने यहोवाच्या साक्षीदारांचे येशूने दिलेली सूचना अनुसरण्याचे कर्तव्य आहे; ती सूचना अशी आहे, की “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” (मत्तय २८:१९, २०) हे काम व्यवस्थीकरणाच्या शेवटापर्यंत चालेल कारण येशू असेही म्हणाला होता: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:३, १४) दर वर्षी, वॉच टावर संस्थेचे छापखाने आणि त्याचसारखी कायदेशीर मंडळे यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या जगव्याप्त प्रचार कार्यात उपयोगात आणण्याकरता कोट्यवधी बायबल, पुस्तके, माहितीपत्रके आणि नियतकालिके पुरवतात. यास्तव, ही कायदेशीर साधने, देवाच्या समर्पित सेवकांना त्यांच्या समर्पणानुसार जीवन व्यतीत करण्यास अमूल्य सहायक ठरली आहेत.

३. यहोवाचे साक्षीदार कोणत्या अर्थाने “संस्था” ही संज्ञा वापरतात?

३ काही जण म्हणतील, की वॉच टावर संस्थेविषयी—अथवा बहुतेक वेळा म्हटले जाते त्या “संस्थेविषयी”—साक्षीदारांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून असे वाटते, की ते, तिला एक कायदेशीर साधन आहे एवढेच समजत नाहीत. उपासनेबाबत ती जे काही म्हणेल तीच पूर्वदिशा असे ते मानतात का? यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक नामक इंग्रजी पुस्तकात हा मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडण्यात आला आहे: “द वॉचटावरने [जून १, १९३८, इंग्रजी] जेव्हा ‘संस्था’ असा उल्लेख केला तेव्हा त्याचा अर्थ, ती केवळ एक कायदेशीर साधन आहे असे नव्हे, तर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे एक मंडळ आहे ज्यांचे मिळून हे कायदेशीर साधन बनलेले आहे व जे तिचा उपयोग करतात.”a यास्तव, ही संज्ञा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ लागू होते. (मत्तय २४:४५) आणि बहुधा याच अर्थाने यहोवाच्या साक्षीदारांनी “संस्था” या संज्ञेचा वापर केला. अर्थातच, कायदेशीर मंडळ व ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ ह्‍या अदलाबदल करण्याजोगा संज्ञा नाहीत. वॉचटावर संस्थेच्या व्यवस्थापकांना निवडण्यात येते तर ‘विश्‍वासू दास’ यहोवाच्या पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलेले साक्षीदार आहेत.

४. (अ) गैरसमजुती टाळण्याकरता पुष्कळ साक्षीदार कसे बोलतात? (ब) परिभाषेसंबंधी आपण समतोल का राखला पाहिजे?

४ गैरसमजुती टाळण्याकरता यहोवाचे साक्षीदार बोलताना खबरदारी घेतात. “संस्था असे शिकवते” असे म्हणण्याऐवजी पुष्कळ साक्षीदारांना, “बायबल असे म्हणते,” किंवा “बायबल असे शिकवते असे मी समजलो,” असे म्हणावयास आवडते. अशाप्रकारे ते, प्रत्येक साक्षीदाराने व्यक्‍तिगत निर्णय घेऊन बायबल शिकवणुकी स्वीकारल्या आहेत यावर जोर देतात; शिवाय, साक्षीदार एखाद्या धार्मिक पंथाच्या हुकूमाच्या बंधनाखाली आहेत अशी चुकीची छाप पाडण्याचेही टाळतात. अर्थातच, परिभाषेसंबंधीच्या सूचना वादग्रस्त विषय होता कामा नये. कारण, परिभाषेचे महत्त्व केवळ गैरसमजुती टाळणे इतकेच असते. ख्रिस्ती समतोलाची आवश्‍यकता आहे. “शब्दयुद्ध करू नका” असा बायबल आपल्याला सल्ला देते. (२ तीमथ्य २:१४, १५) शास्त्रवचने हेही तत्त्व मांडतात: “तुम्हीहि सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल?”—१ करिंथकर १४:९.

देवाचा आत्मा नियमांची गरज कमी करतो

५. पहिले करिंथकर १०:२३ चा अर्थ आपण कसा घेतला पाहिजे?

५ प्रेषित पौलाने लिहिले: “सर्वच गोष्टी कायदेशीर आहेत, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्वच गोष्टी कायदेशीर आहेत तरी सर्व गोष्टी उन्‍नति करितातच असे नाही.” (१ करिंथकर १०:२३, NW) देवाचे वचन स्पष्टपणे ज्या गोष्टी नाकारते अशा गोष्टी करणे कायदेशीर आहे असे पौलाचे निश्‍चितच म्हणणे नव्हते. प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेल्या सुमारे ६०० नियमांच्या तुलनेत पाहता, ख्रिस्ती जीवनाला मार्गदर्शन देणारे फारच कमी स्पष्ट नियम आहेत. यास्तव, पुष्कळ बाबी एखाद्याच्या विवेकावर सोडल्या जातात. यहोवाला समर्पण केलेली व्यक्‍ती देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे येणाऱ्‍या स्वातंत्र्याचा उपभोग घेते. सत्य आपलेसे केल्यामुळे, एक ख्रिस्ती आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचे अनुकरण करतो व पवित्र आत्म्याद्वारे मिळणाऱ्‍या देवाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतो. यामुळे एखाद्या समर्पित ख्रिश्‍चनाला, कोणत्या गोष्टी स्वतःला आणि इतरांना “हितकारक” आहेत व कोणत्या गोष्टींमुळे “उन्‍नति” होते ते ठरवता येते. तो जे निर्णय घेईल त्यांचा परिणाम, त्याने ज्याला समर्पण केले आहे त्या देवाबरोबर असलेल्या त्याच्या नातेसंबंधावर होईल याची त्याला जाणीव असते.

६. आपण सत्य आपलेसे केले आहे हे आपण ख्रिस्ती सभांमध्ये कसे प्रदर्शित करू शकतो?

६ ख्रिस्ती सभांमध्ये उत्तरे देण्याद्वारे, एक साक्षीदार त्याने सत्य आपलेसे केल्याचे प्रदर्शित करतो. सुरवातीला, तो अभ्यासल्या जाणाऱ्‍या प्रकाशनातून उत्तरे वाचून दाखवील. पण कालांतराने, तो आपल्या शब्दांत बायबल शिकवणुकी व्यक्‍त करण्याइतपत प्रगती करील. यावरून तो, इतरांनी सांगितलेलेच पुन्हा बोलून दाखवण्याऐवजी स्वतःची विचारक्षमता विकसित करत असल्याचा पुरावा देतो. स्वतःच्या शब्दांत आपले विचार मांडल्याने व सत्याचे अचूक शब्द प्रेमळपणे व्यक्‍त केल्याने त्याचा त्यालाच आनंद होईल आणि त्याला स्वतःला खात्री पटल्याचे तो दाखवून देईल.—उपदेशक १२:१०; पडताळा रोमकर १४:५ब.

७. यहोवाच्या सेवकांनी कोणते निर्णय स्वतंत्रपणे घेतले आहेत?

७ देव आणि आपल्या सहमानवांबद्दलच्या प्रेमामुळे यहोवाचे साक्षीदार प्रवृत्त होतात. (मत्तय २२:३६-४०) खरेच, ख्रिस्तासारख्या प्रीतीच्या बंधनाने ते जगव्याप्त बंधूसमाज म्हणून जवळजवळ गुंफलेले आहेत. (कलस्सैकर ३:१४; १ पेत्र ५:९) परंतु, स्वतंत्र नैतिक प्राणी या नात्याने प्रत्येकाने व्यक्‍तिगतपणे, देव राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याचा, राजनैतिक गोष्टींसंबंधी तटस्थ राहण्याचा, रक्‍त वर्ज्य करण्याचा, विशिष्ट प्रकारचे मनोरंजन टाळण्याचा व बायबल स्तरांनुसार जगण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्णय त्यांनी घ्यावेत म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती केली जात नाही. हे निर्णय त्या जीवनशैलीच्या चौकटीत बसतात जे संभाव्य साक्षीदारांनी स्वतःहून ख्रिस्ती समर्पणाचे पाऊल उचलण्याआधी निवडलेले असते.

नियमन मंडळाला जबाबदार?

८. येथे कोणता प्रश्‍न स्पष्ट करणे आवश्‍यक आहे?

८ खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर देवाची सेवा करण्याची सक्‍ती नाही हे बायबल स्पष्टपणे दाखवून देते. ते म्हणते: “प्रभु आत्मा आहे; आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) परंतु, या वस्तुस्थितीचा मेळ, नियमन मंडळाबरोबर ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाच्या’ कल्पनेशी कसा बसतो?—मत्तय २४:४५-४७.

९, १०. (अ) मस्तकपदाचे तत्त्व ख्रिस्ती मंडळीत कसे लागू होते? (ब) पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीत कोणत्या गोष्टीमुळे मस्तकपदाच्या तत्त्वाचे अनुकरण आवश्‍यक बनले?

९ या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण मस्तकपदाचे शास्त्रवचनीय तत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. (१ करिंथकर ११:३) इफिसकर ५:२१-२४ मध्ये, ख्रिस्ताला “मंडळीचे मस्तक” म्हटले आहे; ज्याच्या “अधीन” ती आहे. विश्‍वासू आणि बुद्धिमान दास येशूच्या आध्यात्मिक बांधवांचा मिळून बनला आहे हे यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे. (इब्री लोकांस २:१०-१३) विश्‍वासू दासाला देवाच्या लोकांना आध्यात्मिक ‘अन्‍न यथाकाळी’ देण्याकरता नेमण्यात आले आहे. अंतसमयी, ख्रिस्ताने दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमले आहे. या दासाच्या या दर्जामुळे ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या प्रत्येकाकडून आदर मिळण्यास ते पात्र आहेत.

१० ऐक्य टिकवून ठेवणे व “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” होत आहे याची खात्री करणे, हा मस्तकपदाचा उद्देश होय. (१ करिंथकर १४:४०) पहिल्या शतकात हा उद्देश साध्य करण्याकरता, विश्‍वासू आणि बुद्धिमान दास वर्गातील अनेक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना संपूर्ण गटाचे प्रतिनिधीत्व करण्याकरता निवडण्यात आले. त्यानंतर घडलेल्या घटनांवरून हे शाबीत झाले, की या पहिल्या शतकातील नियमन मंडळाद्वारे होणारी देखरेख यहोवाला मान्य होती आणि तिच्यावर त्याचा आशीर्वाद होता. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी या व्यवस्थेचा अगदी आनंदाने स्वीकार केला. होय, त्यामुळे मिळालेल्या उत्तम प्रतिफळांबद्दल त्यांनी आनंद आणि कृतज्ञता व्यक्‍त केली.—प्रेषितांची कृत्ये १५:१-३२.

११. सध्याच्या नियमन मंडळाकडे कोणत्या दृष्टीने पाहिले जावे?

११ अशा व्यवस्थेचे महत्त्व आजही अस्तित्वात आहे. सध्या, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात दहा अभिषिक्‍त ख्रिश्‍चन समाविष्ट आहेत; या सर्वांना अनेक दशकांचा ख्रिस्ती अनुभव आहे. पहिल्या शतकातील नियमन मंडळाप्रमाणे ते यहोवाच्या साक्षीदारांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. (प्रेषितांची कृत्ये १६:४) प्रारंभिक ख्रिश्‍चनांप्रमाणे, साक्षीदारही उपासनेसंबंधीत बाबींवर बायबल आधारित शिक्षण व मार्गदर्शन याकरता नियमन मंडळाच्या प्रौढ बांधवांकडे आनंदाने पाहतात. नियमन मंडळाचे सदस्य त्यांच्या सहख्रिश्‍चनांप्रमाणेच यहोवा आणि ख्रिस्ताचे दास असले तरी, बायबल आपल्याला अशी सूचना देते: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्री लोकांस १३:१७.

१२. प्रत्येक ख्रिश्‍चनाला कोणाला जाब द्यायचा आहे?

१२ शास्त्रवचनांनी नियमन मंडळाला देखरेखीचा जो हुद्दा प्रदान केला आहे त्याचा असा अर्थ होतो का, की यहोवाच्या प्रत्येक साक्षीदाराने आपआपल्या कार्यांचा हिशेब त्यांना दिला पाहिजे? पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना जे लिहिले त्यावरून तर असे काही वाटत नाही; त्याने लिहिले: “तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो . . . आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.”—रोमकर १४:१०-१२.

१३. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रचार कार्याचा अहवाल का देतात?

१३ पण मग, प्रत्येक साक्षीदाराने त्याच्या प्रचार कार्याचा अहवाल द्यावा अशी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते हे खरे नाही का? होय खरे आहे, पण त्याचे कारण साक्षीदारांच्या एका हस्तपुस्तिकेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे; त्यात असे म्हटले आहे: “येशू ख्रिस्ताच्या आरंभीच्या अनुयायांनी प्रचार कार्याच्या प्रगतीबद्दलच्या अहवालात रस घेतला. (मार्क ६:३०) कार्याची वृद्धी झाली तसतसे सुवार्तेच्या प्रचारामध्ये सहभाग घेतलेल्यांना मिळालेल्या उल्लेखनीय अनुभवांसहित अहवालांमध्ये आकडेवारीचे संकलन करण्यात आले. . . . (प्रेषितांची कृत्ये २:५-११, ४१, ४७; ६:७; १:१५; ४:४) . . . जे साध्य करण्यात आले त्याचे अहवाल ऐकल्यामुळे त्या विश्‍वासू ख्रिस्ती कार्यकर्त्यांना केवढे उत्तेजन मिळाले असावे! . . . त्याचप्रमाणे, आधुनिक काळातील यहोवाची संघटना मत्तय २४:१४ च्या पूर्णतेला अनुलक्षून केल्या जाणाऱ्‍या कार्याचा अचूक अहवाल ठेवण्याचा प्रयत्न करते.”

१४, १५. (अ) दुसरे करिंथकर १:२४ नियमन मंडळाला कसे लागू होते? (ब) प्रत्येक ख्रिश्‍चनाने कशाच्या आधारावर व कोणत्या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून व्यक्‍तिगत निर्णय घेतले पाहिजेत?

१४ नियमन मंडळ एक प्रेमळ तरतूद व विश्‍वासाचे अनुकरण्याजोगे उदाहरण आहे. (फिलिप्पैकर ३:१७; इब्री लोकांस १३:७) आदर्श म्हणून ख्रिस्ताचे अनुकरण करून व त्याच्याशी जडून राहिल्याने ते पौलाच्या शब्दांप्रमाणे म्हणू शकतात: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.” (२ करिंथकर १:२४) जगाच्या चालीरितींचे निरीक्षण करून नियमन मंडळ, बायबल सल्ला अनुसरल्याने मिळणारे लाभ यांच्याकडे लक्ष आकर्षित करत आहे, बायबल नियम आणि तत्त्वे लागू करण्याविषयी सूचना देत आहे, गुप्त धोक्यांची सूचना देत आहे व ‘सहकाऱ्‍यांना’ आवश्‍यक असलेले प्रोत्साहन देत आहे. अशाप्रकारे, ते आपले ख्रिस्ती कारभारीपण पार पाडते, त्यांना आपला आनंद टिकवून ठेवण्यास साहाय्य करते आणि विश्‍वासात त्यांची उभारणी करते जेणेकरून ते दृढ उभे राहू शकतील.—१ करिंथकर ४:१, २; तीत १:७-९.

१५ नियमन मंडळाने दिलेल्या बायबल सल्ल्यानुसार एक साक्षीदार निर्णय घेतो तेव्हा तो असे स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतो कारण, त्याने स्वतः केलेल्या बायबल अभ्यासाने, तो जे काही करत आहे ते उचित आहे याची त्याला खात्री पटवून दिलेली असते. नियमन मंडळाकडून येणारा योग्य शास्त्रवचनीय सल्ला अनुसरण्याकरता प्रत्येक साक्षीदार स्वतः देवाच्या वचनामुळे प्रभावित होतो; तो जे निर्णय घेईल त्यांचा, त्याने ज्याला समर्पण केले आहे त्या देवाबरोबर असलेल्या त्याच्या व्यक्‍तिगत नातेसंबंधावर परिणाम होईल याची त्याला पूर्ण जाणीव असते.—१ थेस्सलनीकाकर २:१३.

विद्यार्थी आणि सैनिक

१६. आचरणासंबंधीचे निर्णय ही एक व्यक्‍तिगत बाब असली, तरी काहींना बहिष्कृत का केले जाते?

१६ आचरणासंबंधीचे निर्णय ही जर व्यक्‍तिगत बाब आहे तर, काही यहोवाच्या साक्षीदारांना बहिष्कृत का केले जाते बरे? एखाद्या विशिष्ट पापासाठी बहिष्कृतीकरण आवश्‍यक आहे ही प्रथा कोणीही स्वैरपणे ठरवत नाही. उलट मंडळीतील एखादी व्यक्‍ती अपश्‍चात्तापाने, पहिल्या करिंथकराच्या ५ व्या अध्यायात दिलेल्या यादीप्रमाणे घोर पातके करत राहते तेव्हा तिला बहिष्कृत केले जावे हे शास्त्रवचनानुसार अपेक्षित आहे. यास्तव, एखाद्या ख्रिश्‍चनाने जारकर्म केला आणि त्याने प्रेमळ मेंढपाळांकडून मिळणारे आध्यात्मिक साहाय्य नाकारले तरच त्याला बहिष्कृत केले जाते. केवळ यहोवाचे साक्षीदारच ही ख्रिस्ती प्रथा पाळतात असे नाही. धर्माचा विश्‍वकोश (इंग्रजी), म्हणतो: “सामाजिक कल्याणाला धोकादायक असणाऱ्‍या अननुरूप सदस्यांपासून संरक्षण करण्याच्या हक्काचा दावा कोणताही समाज करतो. धार्मिक बाबतीत पाहता, देवासमोरच्या आपल्या स्थितीवर [बहिष्कृतीकरणाच्या] या शिक्षेचा परिणाम होतो या विश्‍वासामुळे या अधिकाराला आणखीन बळकटी मिळते.”

१७, १८. बहिष्कृतीकरणाच्या उचितपणाचे उदाहरण कसे देता येऊ शकेल?

१७ यहोवाचे साक्षीदार बायबलचे विद्यार्थी आहेत. (यहोशवा १:८; स्तोत्र १:२; प्रेषितांची कृत्ये १७:११) नियमन मंडळाद्वारे आयोजित बायबल शिक्षण कार्यक्रमाची तुलना शिक्षण बोर्डाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमाशी करता येईल. शिकवल्या जाणाऱ्‍या माहितीचा उगम बोर्ड नसले तरी, तेच अभ्यासक्रम तयार करते, शिक्षण पद्धत ठरवते व आवश्‍यक निदेश देते. शाळेच्या अपेक्षांनुसार जगण्यास एखादा विद्यार्थी धडधडीतपणे विरोध करीत असल्यास, सहविद्यार्थ्यांसमोर समस्या उभी करीत असल्यास किंवा शाळेवर कलंक आणीत असल्यास त्याला काढून टाकता येऊ शकते. सर्व विद्यार्थ्यांच्या लाभासाठी कार्य करण्याचा शाळेच्या अधिकाऱ्‍यांना हक्क असतो.

१८ यहोवाचे साक्षीदार केवळ विद्यार्थीच नव्हे, तर येशू ख्रिस्ताचे सैनिकही आहेत; ‘विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध’ लढण्याचे निर्देशन त्यांना मिळाले आहे. (१ तीमथ्य ६:१२; २ तीमथ्य २:३) ख्रिस्ती सैनिक त्याला न शोभणारे आचरण वारंवार आचरीत राहिला तर देव त्याला नापसंत करू शकतो. निवड करण्याचे स्वातंत्र्य बहाल केलेली व्यक्‍ती या नात्याने एक ख्रिस्ती सैनिक त्याच्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतो पण आपल्या निर्णयाचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पौल असा तर्क करतो: “शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यांत गुंतत नाही; ह्‍यासाठी की, ज्याने त्याला सैन्यांत दाखल करून घेतले त्याने त्याला संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करितो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालीत नाहीत.” (२ तीमथ्य २:४, ५) प्रौढ ख्रिस्ती आणि नियमन मंडळातील सदस्य सार्वकालिक जीवनाचे बक्षीस जिंकता यावे म्हणून “नियमांप्रमाणे” वागून त्यांचा नेता येशू ख्रिस्त याच्या पूर्ण अधीन राहतात.—योहान १७:३; प्रकटीकरण २:१०.

१९. ख्रिस्ती समर्पणाच्या वस्तुस्थितींचे परीक्षण केल्यावर आपण कशाबद्दल खात्री बाळगू शकतो?

१९ या सर्व वस्तुस्थितींवरून हे स्पष्ट होत नाही का, की यहोवाचे साक्षीदार मनुष्यांचे दास नव्हे तर देवाचे सेवक आहेत म्हणून? ख्रिस्ताने त्यांना ज्याकरता बंधमुक्‍त केले त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे समर्पित ख्रिस्ती या नात्याने ते देवाच्या मंडळीतील आपल्या बांधवांबरोबर ऐक्याने सेवा करत असताना आपल्या जीवनावर देवाच्या आत्म्याला आणि त्याच्या वचनाला नियंत्रण करू देतात. (स्तोत्र १३३:१) हे सर्व पुरावे मिळाल्यावर त्यांच्या शक्‍तीच्या उगमाविषयी कोणतीही शंका उरता कामा नये. स्तोत्रकर्त्याप्रमाणे तेही असे गाऊ शकतात: “परमेश्‍वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.”—स्तोत्र २८:७.

[तळटीप]

a सन १९९३ मध्ये वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ वॉच टावर संस्था आणि त्यासारख्या इतर कायदेशीर एजन्सीस यहोवाच्या साक्षीदारांना कशाप्रकारे मदत करतात?

◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या भूमिकेमुळे ख्रिश्‍चनांना कोणता लाभ होतो?

◻ यहोवाचे लोक त्यांच्या प्रचार कार्याचा अहवाल का देतात?

◻ कोणत्या उचित प्रसंगी एखाद्या समर्पित ख्रिश्‍चनाला बहिष्कृत केले जाऊ शकते?

[१९ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील नियमन मंडळाने सर्वांसाठी एकच सिद्धान्त ठेवला

[२३ पानांवरील चित्र]

संपूर्ण जगभरात, यहोवाचे साक्षीदार येशूने त्यांना ज्यासाठी मुक्‍त केले त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा