वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 २/१ पृ. २७-२९
  • यहोवा मदतीसाठी आमचा तातडीचा आक्रोश ऐकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा मदतीसाठी आमचा तातडीचा आक्रोश ऐकतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्वरित सुटकेसाठी याचना
  • जे “अहाहा” म्हणतात!
  • “देवाचा महिमा वाढो!”
  • मुक्‍तिदात्यावर भाव ठेवा
  • यहोवा—प्राचीन काळातील “मुक्‍तिदाता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • भग्न हृदयास यहोवा तुच्छ लेखत नाही
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • “आम्हास प्रार्थना करावयास शिकवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुमच्या प्रार्थना “धुपाप्रमाणे” आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 २/१ पृ. २७-२९

यहोवा मदतीसाठी आमचा तातडीचा आक्रोश ऐकतो

मदत तातडीने हवी होती. हे राजाला प्याला देणाऱ्‍या सेवकाच्या चेहऱ्‍यावरुन स्पष्ट दिसत होते. काय विपरीत घडले याबद्दल विचारणा झाली तेव्हा या प्यालेबरदाराने यरुशलेम व त्याच्या भिंतींची जी उद्‌ध्वस्त स्थिती झाली होती त्याबद्दलचा आपला विलाप प्रकट केला. तेव्हा प्रश्‍न विचारण्यात आला: “तुझी विनंति काय आहे?” “तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,” असे प्याला देणाऱ्‍या नेहम्याने नंतर लिहिले. तो यहोवाकडे मदतीसाठी केलेला त्वरेचा, शांत व तातडीचा आक्रोश होता. याचा काय परिणाम दिसला? पारसाचा राजा अर्तहशश्‍त याने लगेच नेहम्याला यरुशलेमाच्या तटाची पुनर्बांधणी करण्याची नियुक्‍ती दिली!—नेहम्या २:१-६.

होय, यहोवा आपणावर प्रेम करणाऱ्‍यांच्या तातडीच्या विनंत्या ऐकतो. (स्तोत्रसंहिता ६५:२) यास्तव, एखादी परिक्षा तुमच्या सहनशक्‍तीच्या पलिकडे जात आहे असे दिसत असल्यास तुम्ही स्तोत्रकर्त्याने स्तोत्रसंहिता ७० मध्ये लिखित असणारी, तातडीच्या ईश्‍वरी मदतीसाठी जी प्रार्थना केली तशी करू शकता. या स्तोत्राचा मथळा ते “स्मरणार्थ” असल्याचा उद्देश दाखवतो. स्तोत्रसंहिता ४०:१३-१७ मध्ये थोड्याशा बदलाने याचीच पुनरावृत्ती करण्यात आली आहे. तेव्हा, हे ७० वे स्तोत्र यहोवाच्या लोकांना कशी मदत देऊ शकते?

त्वरित सुटकेसाठी याचना

दावीद या याचनेने सुरवात करतोः “हे देवा . . . मला मुक्‍त कर. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.” (स्तोत्रसंहिता ७०:१) आपणही त्रासात असताना देवाने त्वरेने येऊन आमची मदत करावी अशी आपण त्याला प्रार्थना करू शकतो. यहोवा आम्हाला वाईट गोष्टींनी परिक्षेत पाडीत नाही, आणि त्याला “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून सोडविणे . . . कळते.” (२ पेत्र २:९; याकोब १:१३) पण एखादी परिक्षा त्याने आम्हास शिक्षण मिळावे या उद्देशाने पुढे चालू दिली तर काय? तर मग, तिला वागवून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे सूज्ञानाची विचारणा करावी. आपण विश्‍वासाने त्याच्याकडे मागितल्यास तो आम्हाला सूज्ञान देऊ शकतो. (याकोब १:५-८) आमच्या परिक्षांना सहन करण्यासाठी आवश्‍यक असणारे बळ देखील देव पुरवितो. उदाहरणार्थ, तो ‘आपण आजारी असता आमचे अंथरूण बदलतो.’—स्तोत्रसंहिता ४१:१-३; इब्रीयांस १०:३६.

आम्हाला वारशाने लाभलेली पापीष्ठ स्थिती, तसेच आमचे मोहपाशाला सतत सामोरे असणे आणि आमचे यहोवासोबतचे नाते नष्ट करण्याचा दियाबलाचा प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे आम्ही दर दिवशी देवाच्या मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. (स्तोत्रसंहिता ५१:१-५; रोमकर ५:१२; १२:१२) येशूच्या नमुनेदार प्रार्थनेतील हे शब्द लक्षवेधी आहेः “आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाईटापासून सोडीव.” (मत्तय ६:१३) होय, देवाची आज्ञा मोडण्यासाठी मोहपाश सामोरा येतो तेव्हा त्याला बळी पडण्यास वाव देऊ नये, तसेच तो “वाईट” सैतान याने आम्हावर प्राबल्य करण्यापासून त्याला दूर करावे यासाठी आम्ही देवाला विचारणा करू शकतो. तथापि, आम्ही सुटकेसाठी आपला आक्रोश त्याच्यापुढे करण्यासोबत, ज्या परिस्थितीमुळे आम्हाला मोहपाशापुढे व सैतानाच्या पाशापुढे आणले जाते ती टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.—२ करिंथकर ११:१३.

जे “अहाहा” म्हणतात!

आम्ही राखून असलेल्या विश्‍वासास्तव, शत्रू आमची निंदा करीत असल्यामुळे आमची कसून परीक्षा घेतली जाऊ शकते. तसे घडल्यास दाविदाच्या या शब्दांवर मनन कराः “जे माझा जीव घ्यावयास पाहतात, ते लज्जित व फजीत होवोत, माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत. ‘अहाहा! अहाहा!’ असे थट्टेने म्हणणाऱ्‍यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत.” (स्तोत्रसंहिता ७०:२, ३) दाविदाच्या शत्रूंना त्याला मृतवत्‌ झालेले पाहण्याची इच्छा होती. ते त्याचा ‘जीव घेण्यास’ पाहात होते. तथापि, सूडबुद्धी राखण्याऐवजी, देवच त्यांना लज्जित करील असा विश्‍वास त्याने राखला. दाविदाने प्रार्थिले की, त्याचे शत्रू “लज्जित व फजीत” होवोत, ते आपली दुष्ट योजना पूर्ण करण्यात विचलीत, त्रेधा उडालेले, अस्वस्थ व निराशीत होवोत. होय, त्याला इजा देण्याचा प्रयत्न करणारे व त्याच्या विपत्तीत संतोष मानणारे गोंधळले जावोत व त्यांना मानहानी मिळो.

एखाद्या शत्रूवर विपत्ती ओढवल्यावर आम्ही द्वेषपूर्ण आनंद व्यक्‍त केल्यास आम्हाला आमच्या पापाबद्दल यहोवाला जाब द्यावा लागेल. (नीतीसूत्रे १७:५; २४:१७, १८) तथापि, शत्रूंनीच देव व त्याच्या लोकांची निंदा केल्यास आम्ही अशी प्रार्थना करू शकतो की, यहोवाने आपल्या पवित्र नामास्तव, ज्या लोकांदेखत ते शत्रू आपली बढाई करीत आहेत त्यांच्यासमोर त्यांना ‘मागे हटवून अप्रतिष्ठा देवो.’ (स्तोत्रसंहिता १०६:८) सूड घेणे देवाकडे आहे त्यामुळे तोच त्याच्या व आमच्या शत्रूंना गोंधळून लज्जित करू शकतो. (अनुवाद ३२:३५) उदाहरणार्थ, जर्मनीतून यहोवाच्या साक्षीदारांचा उच्छेद करण्याचे नाझी नेता ॲडाल्फ हिटलरने निश्‍चय केला होता. पण यात त्याला केवढे दयनीय अपयश आले. कारण तेथेच आज कित्येक हजारो जण राज्याची घोषणा करीत आहेत!

आमचे शत्रू आमचा उपहास करून आम्हाला तुच्छतेने “अहाहा, अहाहा!” असे म्हणतील. ते देव व त्याच्या लोकांना टोमणे देत असल्यामुळे हे पापी “लज्जेने मागे हटोत,” व त्यांना तुच्छता लाभो. ही प्रार्थना करीत असता आपण आपली सचोटी राखू या व यहोवाचे अंतःकरण आनंदी करू या की ज्यामुळे त्याला सैतान व इतर जे कोणी त्याची निंदा करतील अशांना उत्तर देता येईल. (नीतीसूत्रे २७:११) आमच्या गर्विष्ठ शत्रूंचे आम्हाला कधीही भय वाटू देऊ नये, कारण “जो परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.” (नीतीसूत्रे २९:२५) ज्याने देवाच्या लोकांना बंदिवान करून नेले त्या गर्विष्ठ नबुखद्‌नेस्सर राजाला अपमान सहन करावा लागला आणि हे कबूल करावे लागले की, ‘जे अभिमानाने चालतात त्यांस स्वर्गीचा राजा नीचावस्थेत लोटतो.’—दानीएल ४:३७.

“देवाचा महिमा वाढो!”

शत्रूंनी आम्हाला त्रास दिला तरी आपण आपल्या सहउपासकांसोबत यहोवाचे गौरव करू या. देवाचे गौरव करण्यामुळे जो त्रास येतो त्याच्या आहारी न जाता दाविदाने हे घोषित केलेः “तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; ज्यांना तू सिद्ध केलेल्या तारणाची आवड वाटते ते, ‘देवाचा महिमा वाढो!’ असे सतत म्हणोत.” (स्तोत्रसंहिता ७०:४) यहोवाचे लोक त्याजठायी “आनंद व उल्लास” करीत असल्यामुळे ते सतत आनंदी राहतात. देवासोबत जवळचे नाते, समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार या नात्याने जोपासल्यामुळे त्यांना मोठा आनंद लाभत आहे. (स्तोत्रसंहिता २५:१४) तथापि, त्यांचेकडे देवाचा नम्रपणे शोध घेणारे असे पाहण्यात येते. विश्‍वासधारी बनून ते देवाच्या आज्ञा मानीत असल्यामुळे ते त्याचे व त्याच्या वचनातून अधिक ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करीत असतात.—उपदेशक ३:११; १२:१३, १४; यशया ५४:१३.

यहोवाचे साक्षीदार सुवार्तेची घोषणा करीत असता ते सतत “देवाचा महिमा वाढो!” असे सतत म्हणत असतात. ते यहोवाचे गौरव करतात व त्याला अतिश्रेष्ठ मानतात. ते सत्याचा शोध घेणाऱ्‍यांना मोठ्या आनंदाने देवाबद्दल शिकून घेण्याची व त्याचे गौरव करण्याची मदत देतात. जगातील लोकांप्रमाणे सुखविलासामागे न धावता यहोवाचे लोक त्याच्या ‘तारणाची आवड धरतात.’ (२ तीमथ्य ३:१-५) वारशाने लाभलेल्या आपल्या पापीष्ठ स्थितीची जाणीव असल्यामुळे ते, यहोवा देवाने चिरकालिक जीवनप्राप्तीच्या तारणासाठी जी तरतूद केली आहे तिजबद्दल खोल कृतज्ञता व्यक्‍त करीत आहेत; ही तरतूद देवाने आपल्या प्रिय पुत्र, येशू ख्रिस्त याच्या पापक्षालनाचे यज्ञार्पणाद्वारे दिली आहे. (योहान ३:१६; रोमकर ५:८; १ योहान २:१, २) तुम्हीही देवाचा महिमा करता का व त्याच्या स्तुतीस्तव खऱ्‍या भक्‍तीचे आचरण करून आपणाठायी त्याच्या ‘तारणाची आवड’ आहे हे सिद्ध करता का?—योहान ४:२३, २४.

मुक्‍तिदात्यावर भाव ठेवा

दाविदाने हे स्तोत्र गायिले तेव्हा त्याला आपली इतकी असहाय्य स्थितीची जाणीव झाली की, त्याने म्हटलेः “मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, मजकडे येण्याची त्वरा कर. माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्‍तिदाता तू आहेस. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] विलंब लावू नको.” (स्तोत्रसंहिता ७०:५) आपल्या समविश्‍वासूंप्रमाणेच आपल्यावर देखील सैतानाद्वारे छळ, मोहपाश व हल्ले होतात तेव्हा आपण “दीन” आहोत असे आपल्याला वाटायला लागते. आम्हास जरी टाकून दिलेले नाही तर, तत्त्वहीन शत्रूपुढे निराधार झाल्याचे वाटू लागेल. तथापि, यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना सोडवू शकेल व जरुर सोडवील हा आत्मविश्‍वास आम्ही बाळगावा.—स्तोत्रसंहिता ९:१७-२०.

यहोवा आपल्याला गरजेच्या वेळी “मुक्‍तिदाता” ठरतो. आमच्या स्वतःच्या कमतरतेमुळे आम्हावर परिक्षेचा काळ आला असेल. जरी ‘आमच्या मूर्खतेने आम्हाला मार्गभ्रष्ट केले’ असेल तरी आम्ही आपले अंतःकरण ‘परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] रुष्ट होऊ देऊ नये.’ (नीतीसूत्रे १९:३) त्याला दोष देता येणार नाही, तो तर, आम्ही विश्‍वासाने त्याच्याकडे प्रार्थना केल्यास आम्हास मदत देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. (स्तोत्रसंहिता ३७:५) पण, आम्ही एखादे पाप टाळण्यासाठी झगडत आहोत तर काय? तेव्हा आम्ही आपल्या प्रार्थनेत याबद्दल स्पष्ट असू या, व नीतीमान मार्गाचे आचरण करण्यासाठी ईश्‍वरी मदतीची विनवणी करू या. (मत्तय ५:६; रोमकर ७:२१-२५) देव आमची अंतःकरणपूर्वक प्रार्थना ऐकेल आणि जर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या अधीन स्वतःला केले तर आमची आध्यात्मिक रितीने वृद्धी घडेल.—स्तोत्रसंहिता ५१:१७; इफिसकर ४:३०.

विश्‍वासाच्या परिक्षेत झगडत असताना आता आपला निभाव लागणे शक्य नाही असे आपल्याला वाटू लागेल. आमची पापी शरीर अशक्‍त असल्यामुळे ते लवकर सुटका होण्याची वाट पाहील. (मार्क १४:३८) यामुळेच आम्ही कदाचित ही याचना करूः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] विलंब लावू नको.” देवाच्या नावावर जी निंदा लादण्यात आली आहे त्याच्याबद्दलची खास काळजी आपल्याला आहे तर, आपण दानीएल संदेष्ट्यासारखीच प्रार्थना करुः “हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] ऐक; हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] क्षमा कर. हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] ऐक, कार्य कर; विलंब लावू नको. हे माझ्या देवा . . . तुझे लोक यांस तुझे नाव दिले आहे, म्हणून तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.” (दानीएल ९:१९) आमचा स्वर्गीय पिता विलंब लावणार नाही याबद्दल आपण विश्‍वास राखू शकतो, कारण प्रेषित पौलाने ही खात्री दिली आहेः “आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी साहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.”—इब्रीयांस ४:१६.

यहोवा मुक्‍तिदाता आहे हे कधीच विसरु नका. त्याचे सेवक या नाते आपण हे तसेच स्तोत्रसंहिता ७० मध्ये दाखविण्यात आलेल्या प्रार्थनाशील भावना आपल्या स्मरणात ठेवणे चांगले आहे. आपल्याला काळजी वाटणाऱ्‍या गोष्टींसंबंधाने आपल्याला वारंवार प्रार्थना करण्याची गरज राहील. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) कदाचित एखाद्या समस्येला काहीच तोडगा नाही, पेचप्रसंगातून सुटण्याचा काही मार्ग नाही असे दिसत असेल. तरीपण, आमचा स्वर्गीय पिता आमची मजबूती करील आणि आम्हास सहन करता येते त्यापलिकडे आमची परिक्षा होऊ देणार नाही. या कारणास्तव, सनातन राजाच्या राजासनापुढे जाऊन त्याला अंतःकरण ओतून करणारी प्रार्थना करण्याचा कधी कंटाळा करू नका. (१ करिंथकर १०:१३; फिलिप्पैकर ४:६, ७, १३; प्रकटीकरण १५:३) विश्‍वासाने प्रार्थना करा व त्याच्यावर पूर्णपणे भाव ठेवा, कारण यहोवा मदतीसाठी आमचा तातडीचा आक्रोश ऐकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा