वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १०/१ पृ. २२-२३
  • ताबोर डोंगरमाथ्यावरुन विजयाकडे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ताबोर डोंगरमाथ्यावरुन विजयाकडे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाद्वारे, बाराकने शक्‍तिशाली सैन्य पराजित केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “मी तुमच्यासोबत नक्की येईन”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया
    बायबलमधून शिकू या!
  • दोन शूर स्त्रिया
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १०/१ पृ. २२-२३

वचनयुक्‍त देशाचे देखावे

ताबोर डोंगरमाथ्यावरुन विजयाकडे!

इतिहासाच्या काळातील मार्ग एकमेकांना येऊन भिडले असल्याचे तुम्ही एका उंच बुरुजावरुन अवलोकन करीत असल्याची कल्पना करा. तुम्हाला काय दिसते? ऐतिहासिक गोष्टी समोरासमोर घडत आहेत!

पवित्र शास्त्रातील मगिद्दो हे स्थळ या वर्णनानुरुप जुळते, कारण ते लष्करी मार्ग व व्यापारी मार्गावर वसले होते. तरीपण इज्रेल दरीच्या मागे ताबोर डोंगर दिसतो. त्याला सुपीक खोऱ्‍यातील शहराकडे जाणाऱ्‍या व्हिआ मारीस या हमरस्त्यावरुन देखील बघता येईल.a

या प्रदेशातून कोठूनही ताबोरकडे बघितल्यास त्याच्या दिमाखीपणाची छाप तुम्हावर नक्कीच पडेल. (पडताळा यिर्मया ४६:१८.) ताबोर त्याच्या भोवतालच्या प्रदेशात अगदी एकांतात उंचावला आहे, त्याचा गोलाकार सर्व दिशेकडून दिसतो. त्याच्या शेजारी दक्षिणेकडे तळवट आहे, ही तळवट सुपीक इज्रेल दरी व समुद्र किनारा यांना एकत्र जोडते.

हळूवारपणे वळसा घेत ताबोरच्या शिखरावर पोहंचताच दक्षिणेकडे तुम्हाला इज्रेल शहर दिसेल. येथेच येहू मोठ्या त्वेषाने रथ हाकीत अहाबाच्या राजवाड्याकडे आला होता व तेथे इजबेलीचा भयानक अंत झाला होता ही आठवण आपल्या मनास चाटून जाईल. (१ राजे २१:१; २ राजे ९:१६-३३) जवळच मगिद्दो आहे. पश्‍चिमेकडे कर्मेल पवर्त दिसतो आहे; येथेच एलियाने अग्निपरिक्षा घेतली होती. (१ राजे, अध्याय १८) ताबोरहून तुम्हाला किशोन नदी समुद्रापर्यंत वाहत गेलेली दिसेल. तसेच पाच मैल पश्‍चिमेकडे, नैऋत्येस गालीलच्या खालच्या भागात असणाऱ्‍या डोंगरदरीत नासारेथ वसलेले दिसते.

पण, ताबोरचा उल्लेख करताच पवित्र शास्त्रातील कोणता अहवाल तुमच्या डोळ्यापुढे उभा राहतो? सहसा तो दबोरा व बाराकचा असेल. त्यांच्या काळी हजोरचा राजा याबीन याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्‍या कनान्यांनी २० वर्षे इस्राएलांना जेरीस आणले होते. तेव्हा दबोरा संदेष्ट्रीने बाराकास हालचाल करण्याची प्रेरणा दिली. त्यानेही दहा हजार इस्राएली सैन्य जमविले. ते गालीलमध्ये राहणाऱ्‍या नफताली व जुबुलून वंशापैकीचे बहुतेक होते. हे सैन्य या ताबोर डोंगरावर एकत्र झाले. त्यांच्याकडे शस्त्रे ही नव्हतीच, कारण इस्राएलापाशी ढाल किंवा भाला नव्हता.—शास्ते ५:७-१७.

पण त्यांच्याविरुद्ध जबर लष्करी सैन्य उभे ठाकले. याबीनचा सरसेनापती सीसरा याने शस्त्रसिद्ध कनानी योद्ध्‌यांना इज्रेलच्या दरीकडे आणले होते. ते पुढील पानावर वर उजवीकडे दाखविण्यात आलेल्या मिसरच्या भिंतीवरील चित्रातील शस्त्रसिद्ध लोकांसारखे दिसले असावेत. कनान्यांनी वापरलेल्या युद्धाच्या शस्त्रांवर मिसराच्या युद्धाच्या शस्त्रांची छाप दिसत होती; शिवाय अधिक भयानक म्हणजे सीसराने आणलेले शस्त्र—९०० युद्ध रथ!

त्या कनानी रथांना चोहोकडून आग ओकता येईल असे व्यासपीठ होते. चालक आपल्याभोवती कमरबंद बांधून असे की ज्यामुळे त्याचे हात काम करण्यास मोकळे होत. किंवा तो घोड्यावर आपले लक्ष केंद्रित करी आणि त्याचा सोबती अस्त्रांचा मारा करी. रथाच्या चाकांच्या कण्यातून लोखंडी पाती बाहेर येत होती. ताबोर डोंगराहून खाली बघणाऱ्‍या बाराकच्या सैन्याला रथांचा समूह मोठा भयानक, थोपवता येणार नाही असा व अजिंक्य वाटला असावा.

तरीही, यहोवाने बाराकास हे अभिवचन दिलेः “मी सीसरा याला किशोन नदीपर्यंत येईसे करीन. . . . तो आपले सर्व लष्कर व रथासोबत येईल.” अगदी योग्य वेळी इस्राएली वीर ताबोरच्या कडेने खाली आले.—शास्ते ४:१-१४.

इस्राएलांना त्यांच्या स्वर्गातील प्रबळ देवाकडून जी मदत मिळाली ती अगदी आश्‍चर्यचकित करणारी व महत्त्वपूर्ण होती. दबोराने नंतर आपल्या गायनात हे गायिलेः “आकाशातून सेना लढल्या; ताऱ्‍यांनी आपल्या कक्षातून सीसरासोबत लढाई केली. किशोन नदीने त्यास वाहून नेले. . . . हे जिवा हिंमत धरुन चाल कर.” (शास्ते ५:२०, २१) होय, कमीत कमी शस्त्राने सिद्ध पण धैर्यशाली इस्राएलांनी शस्त्रसिद्ध कनान्यांना पळविले आणि देवाने त्यांचा बिमोड केला. त्यानेच किशोन नदीचे कोरडे पात्र अचानकपणे दुथडी भरुन वाहू दिले व त्यामुळे भयग्रस्त रथांची संघटनाच दुभंगविली.

खाली तुम्हाला किशोन नदीचा भाग दिसेल. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते व तिचे काठ गाळाने भरुन जातात. अशा या गाळातून कनानी रथ पळ काढण्यासाठी धडपडत आहेत असे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे करा. उसळत्या पाण्याने काही पळत्या सैनिकांना आणि रथांना वाहवून नेले. इस्राएलांनी सेनापती सीसरा यावर देखील आपला विजय मिळविला. त्याने आपला रथ सोडून दिला व तो रणांगणावरुन उघड्या पावलाने वाट मिळेल तेथे पळून जाऊ लागला. त्याने याएल या स्त्रीच्या डेऱ्‍यात आसरा घेतल्यावर तिने संधि साधून या शत्रूला ठार केले.—शास्ते ४:१७-२२.

अशाप्रकारे, इस्राएलांच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण व विजयी अध्यायाच्या घटनेची सादरता दबोरा तसेच जे, ताबोर डोंगराच्या माथ्यावरुन न्याहाळत होते त्यांच्यासमोर घडली गेली.

[तळटीपा]

a  यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९०च्या कॅलेंडरमध्ये ताबोरचे मोठे व स्पष्ट छायाचित्र तसेच नकाशा पहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा