वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १/१ पृ. २१-२६
  • त्याच्या पावलास अनुसरण्याचे आव्हान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याच्या पावलास अनुसरण्याचे आव्हान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जुळवून घेण्यास शिका
  • लक्ष द्या
  • दूर जाऊ नका
  • योग्य अंतर ठेवा
  • फाजील आत्मविश्‍वास टाळा, निराशेचा सामना करा
  • येशूच्या पावलांचं जवळून अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • येशूच्या पावलांना अनुसरणारे लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • येशू जसा चालला तसे चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देवाबरोबर चालणे—पहिली पावले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १/१ पृ. २१-२६

त्याच्या पावलास अनुसरण्याचे आव्हान

“ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता स्वतःचा कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१. फिलिप्स.

१, २. (अ) खरे आव्हान कोणते असू शकते आणि हे ख्रिश्‍चनांना आस्थेचे का आहे? (ब) येथे कोणते प्रश्‍न विचारण्यात आले आहेत?

समुद्रकिनारी वाळूत तसेच बर्फाच्छादित शेतात चालण्याचा तुम्हाला कधी प्रसंग आला होता का? चालत असताना, तुमच्या आधी जो तेथून गेला त्याच्या पावलाचे ठसे पाहून तुम्ही मोहित झाला होता का? तेव्हा आपण देखील याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालावे आणि त्याच्या पावलाच्या ठशात आपला पाय बरोबर ठेवून चालावे असे तुम्हाला वाटले होते का? तुम्ही तो प्रयत्न केला असल्यास असे हे चालणे तितके सोपे नाही हेच तुम्हाला आढळले असेल. खरे पाहता, कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे—मग ते खरेपणाने असो की लाक्षणिकपणे—हे खरेच एक आव्हान आहे. पण तेच आम्ही आता ख्रिस्ती असल्यामुळे अगदी हेच करण्याचा पवित्रा घेतला आहे. होय, येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आमचा मानस आहे.

२ तर मग हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यासाठी तुम्ही निकराचा प्रयत्न करीत आहात का? यापेक्षा अधिक म्हणजे, यात काहीही सामोरे आले तरी तुमचा असेच करीत राहण्याचा निश्‍चय आहे का? तर मग, कोणाच्या पावलावर प्रत्यक्षात पाऊल ठेवून चालण्यात ज्या अडचणी सामोऱ्‍या येतात त्याची समज मिळवून घेतल्यास ख्रिस्ताच्या लाक्षणिक पावलावर पाऊल ठेवून चालणे यशस्वीपणे पार पाडता येईल.

जुळवून घेण्यास शिका

३. दुसऱ्‍याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे हे प्रथमदर्शनी विचित्र का वाटेल?

३ प्रत्येकाची चालण्याची ढब ही वेगळी असते. दोन व्यक्‍तींमधील चालण्याचे अंतर भिन्‍न असते. तसेच पहिला व दुसरा माणूस पाय उचलून पुढे जेथे टाकतो त्यामधील कोनाचे अंतर देखील भिन्‍न असते. कदाचित एकाचा आंगठा सरळ दिशा दाखवीत असेल आणि दोन आंगठ्यामधील कोनही वेगवेगळे असतील आणि ते एकापेक्षा दुसऱ्‍यास अधिक स्पष्ट दाखवीत असतील. तर आता आव्हान काय असते ते तुम्हाला कळले का? तुम्हाला दुसऱ्‍याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावयाचे आहे तर टांगा लांब टाकण्याची स्वतःची पध्दत आणि पावलाचा ठसा ज्या दिशेने आहे त्याप्रमाणे करण्यास तुम्हाला जुळवून घ्यावे लागेल. पहिल्यांदा हे विचित्र वाटेल पण ते केलेच पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही.

४. येशूच्या पावलास अनुसरणे यात खास आव्हान का आहे?

४ ख्रिस्ताचे लाक्षणिकरित्या चालणे हे अप्रतिम होते कारण त्याच्या समकालीन लोकात तो एकटाच परिपूर्ण मनुष्य होता; ‘त्याला पाप ठाऊक नव्हते.’ (२ करिंथकर ५:२१) वस्तुतः मानव हे स्वाभाविकरित्या अपूर्ण आहेत त्यामुळे येशूच्या पावलास अनुसरणे हा त्यांचा दैनंदिन मार्ग नाही. याविषयीचे स्मरण पौलाने करिंथकरांना देताना म्हटलेः “तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही? व मानवी रितीने चालता की नाही?” द्वेष व झगडा ही “देहाची कर्मे” करण्याकडे कल असणे हे अपूर्ण लोकांना स्वाभाविक वाटते. पण येशू तर प्रेमाच्या मार्गाने चालला, आणि “प्रीती हेवा करीत नाही, . . . फुगत नाही.” यास्तव, ख्रिस्ताच्या पावलास अनुसरण्यात जे आव्हान प्रस्तुत होत असते ते कोणा अपूर्ण मानवास अनुसरण्याची विचारणा होत असते त्यावेळी असलेल्या आव्हानापेक्षा अधिक प्रबळ असते.—१ करिंथकर ३:३; १३:४, ५; गलतीकर ५:१९, २०; तसेच इफिसकर ५:२, ८ पहा.

५, ६. (अ) ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यात बरेच लोक का अपयशी ठरले व त्यामुळेच पौलाला कोणता सल्ला द्यावा लागला? (ब) आज ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे प्रोत्साहन लोकांना कसे दिले जात आहे व याकरवी त्यांना कोणता आशीर्वाद मिळतो?

५ अपूर्णता असली तरी देवाच्या इच्छेकडे करण्यात आलेले दुर्लक्ष एखाद्याला ख्रिस्ताच्या पावलास अनुसण्यामध्ये अडथळा निर्माण करू शकते. याकरताच पौलाने इफिसमधील ख्रिश्‍चनांना हा सल्ला दिला की, “परराष्ट्रीय भ्रष्ट मार्गाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये; त्यांची बुद्धी अंधःकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्‍न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.”—इफिसकर ४:१७, १८.

६ आज सर्वत्र केल्या जाणाऱ्‍या राज्य-प्रचाराच्या कामामुळे लोकांना आपल्या सर्वसाधारण मार्गाने जीवन व्यतित करण्याचे थांबवावे असे आर्जविले जात आहे. देवाच्या उद्देशांकडे दुर्लक्ष करुन आचरण्यात येणारे, मानसिक काळोखात आचरलेले, आणि ज्यात कसलाच फायदा नाही अशी ध्येये मूर्ख अंतःकरणाने जोपासण्याची कर्मे सोडून देण्याचे सांगितले जाते. उलटपक्षी, त्यांनी ख्रिस्ताचे परिपूर्ण उदाहरण अनुसरावे, “त्याच्यामध्ये चालत राहा”ण्याचे व याकरवी “प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लाव”ण्याचे उत्तेजन दिले जाते. (कलस्सैकर २:६, ७; २ करिंथकर १०:५) या आव्हानास पुरे करणारे लोक आपल्या विश्‍वासात स्थैर्यता मिळवितात. ख्रिस्त चालला त्या मार्गाने चालण्याचा सराव झाल्यावर ते मार्गाक्रमण त्यांना सुकर ठरते.

७. येशूच्या पावलास अनुसरणे हे आव्हानात्मक असले तरी आपल्याला कोणती खात्री आहे?

७ तरीपण आव्हान हे बहुधा पुढे राहतेच. परिपूर्ण प्राणीमात्र व अपूर्ण लोक यातील तफावत मोठी आहे. याकरता, परिपूर्ण उदाहरण अनुसरायचे आहे तर अपूर्ण प्राणीमात्रांनी आमुलाग्र बदल केले पाहिजेत. काही लोकांना अनुवंशिक वारशामुळे वा वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे ख्रिस्ती मार्गास जुळवून घेणे हे इतरांपेक्षा अधिक जड जाते. तरीपण यहोवा ही खात्री देतो की जो निकराचा प्रयत्न करतो त्याला ते मार्गाक्रमण जमू शकेल. “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३; तसेच २ करिंथकर ४:७ही पहा; १२:९.) हीच गोष्ट सर्व ख्रिश्‍चनांच्या बाबतीत खरी आहे.

लक्ष द्या

८, ९. (अ) कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेवेळी अविभाज्य लक्ष आणि एकाग्रता का जरुरीची आहे? (ब) येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापासून आपले लक्ष भटकू नये यासाठी कोणती पवित्र शास्त्र सूचना अनुसरणे सहाय्यक ठरते?

८ आम्ही कोठे पाय ठेवतो तेथे आपले लक्ष नसेल तर खऱ्‍या अर्थाने आपल्याला पावलांचे अनुकरण करता येणार नाही. आमचे डोळे इतरत्र फिरकले—म्हणजे आमच्या सभोवार चालत असलेल्या हालचालीवर केंद्रित ठेवले तर—कधी ना कधी आमचे पाऊल वाकडे पडेल. आम्ही अविभाज्य लक्ष दिले नाही आणि यात एकाग्रता राखली नाही तर ज्या पावलांचे आपण अनुकरण करीत आहोत तेथून आपला रस्ता चुकेल. यासाठीच जेव्हा रस्त्यात अनपेक्षितरित्या मोठा आवाज होतो किंवा इतर काही अडखळणे आमच्या समोर येऊन आमचे लक्ष विचलीत करतात तेव्हा आम्ही सतत दक्षता बाळगली पाहिजे.—पडताळा इयोब १८:१०, ११.

९ येशूच्या पावलांना अनुसरण्याच्या बाबतीत लाक्षणिक मार्गीसुद्धा हे खरे आहे. आपल्या स्वतःकडे नीट लक्ष द्यावे असा येशूने आपल्या अनुयायांना इशारा दिला. तसे न केल्यास “अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्‍यांनी [त्यांची] अंतःकरणे भारावून जातील,” असे तो म्हणाला. (लूक २१:३४) अशा या अडखळणांचा सैतान दैनंदिनरित्या वापर करून आम्ही आपली नजर येशूच्या पावलास अनुसरण्याऐवजी इतरत्र लावावी असा प्रयत्न करतो. विरोध, आजार, किंवा आर्थिक मंदी यांचा फायदा घेऊन तो आमचे लक्ष हिरावून घेण्याचा त्वरेचा प्रयत्न करतो. “आपण वाहवत जाऊ” नये याकरता “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे.” असे करण्याचा दुसरा अर्थ हा की, आपण पूर्वीपेक्षा ख्रिस्ताच्या पावलावर आपली नजर अधिकपणे केंद्रित ठेवावी.—इब्रीयांस २:१; तसेच १ योहान २:१५-१७ देखील पहा.

दूर जाऊ नका

१०. (अ) वेगवेगळे पावलांचे ठसे एकमेकांना ओलांडून जात आहे असे दिसते तेव्हा कोणता धोका असतो? (ब) आध्यात्मिक मार्गी चुकीच्या पावलांचा मागोवा घेणे का धोक्याचे आहे?

१० गर्दी असणाऱ्‍या समुद्रकिनाऱ्‍याच्या बीचवर आपल्याला दिसेल की आपण कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असता आणखी काही पावलांचे ठसे त्यात मिसळले आहेत. काही पावलांचे ठसे तर वरकरणी सारखेच दिसतात. तर मग आपण खऱ्‍या पावलांचा मागोवा घेत आहोत याची खात्री बाळगणे किती महत्वाचे आहे बरे! नाहीतर दुसऱ्‍याच पावलांचा मागोवा घेत आपण कुठेतरी दूर भटकत राहू. हे आध्यात्मिक अर्थी खूपच गंभीर परिणाम ओढवून आणील. प्रत्यक्षात खरी पावले नसता त्याचे ठसे मात्र खरे असल्याचे वाटून त्याचा मागोवा घेतला तर काय होते ते एका नीतीसूत्रात इशारेवजा सांगितले आहे. ते म्हणतेः “मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो; पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.”—नीतीसूत्रे १६:२५.

११. पौलाने आरंभीच्या ख्रिस्तीजनांना कोणता इशारा दिला व त्याकरवी कोणापुढे उदाहरण मांडले?

११ असा हा धोका संभवत असल्यामुळे पौलाला आरंभीच्या ख्रिस्ती मंडळ्यांना हा इशारा देण्याचे अगत्याचे वाटलेः “मला आश्‍चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहा. . . . तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. . . . जी तुम्ही स्विकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.” (गलतीकर १:६-९) पौलाच्या या उदाहरणास अनुसरून आज यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ, पावलांचे बनावट ठसे उमटविणाऱ्‍या धर्मत्यागी आणि खोट्या बंधुविषयी ताकीद देतात. ख्रिस्ताने देवाच्या मार्गदर्शनानुरुप खऱ्‍या ख्रिश्‍चनांना जो मार्ग आखून दिला आहे त्यापासून वाहवत जाण्याची त्यांची इच्छा नाही.—स्तोत्रसंहिता ४४:१८.

१२. (अ) २ तीमथ्य १:१३ आम्हाला बनावट पावले अनुसरण्यापासून परावृत्त राहण्यात कशी मदत करू शकते? (ब) दुसऱ्‍या प्रकारच्या सुवार्तेची कोणती गुणलक्षणे आहेत?

१२ ख्रिस्ताच्या पावलांच्या ओळखीकडे नीट लक्ष देत राहिल्यामुळे आपल्याला फसवणूक टाळता येते. येशू, त्याची शिकवण, आणि ख्रिस्ती मंडळीचे कार्यवहन याविषयीचे अचूक ज्ञान आम्हाला “सुवचनांचा नमुना” ओळखण्यात आणि ‘ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करु पाहणारे’ यापासून संरक्षण देईल. (२ तीमथ्य १:१३) तथाकथित असणारी सुवार्ता—जी खरी पाहता बनावट पावलांचे ठसे आहेत—सत्याच्या नमुन्यात बसत नाही. ते विपर्यास करून सबंध चित्रच ओरबडून टाकतात. मुलभूत पवित्र शास्त्र सत्ये आणि तत्वे यांची स्पष्टता करण्याऐवजी ते त्यांचा विपर्यास करतात. यहोवाच्या सेवेत अधिक सहभाग मिळविण्याचे प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात मंद होण्याचा ते प्रभाव पाडतात. त्यांचा संदेश सरळ नसतो व तो यहोवाचे नाम व त्याची संस्था यांना गौरवीत नाही. तो नकारात्मक, चुका शोधून काढणारा आणि टीकात्मक असतो. तर मग अशा पावलांचा मागोवा घेणे नकोच.

योग्य अंतर ठेवा

१३. कोणाच्या पावलांस अनुसरण्यामध्ये अंतराचे महत्व कसे समाविष्ट असते?

१३ आम्ही चालताना आमच्या दोन पावलातील अंतर हे आम्ही ज्या वेगाने चालतो त्याकरवी ठरविण्यात येते. जितके वेगाने आपण चालतो तितके अंतर लांब असते; आणि हळू चाललो तर ते अंतर कमी होते. आपण ज्या पावलांना अनुसरत आहोत त्या पायांच्या दोन ठशातील अंतराने चाललो तर त्याला अनुसरणे सोयीचे बनते. याचप्रमाणे आमचा नेता येशूच्या लाक्षणिक पावलांस आम्हाला अनुसरायचे आहे तर मग ते अंतर आपण लक्षात घेतले पाहिजे.

१४. (अ) कदाचित कोणत्या मार्गी आपण येशूच्या गतिसोबत आपली गति ठेवणारे नाहीत असे दिसेल? (ब) “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याच्या पुढे जाणे हे मूर्खतेचे का आहे?

१४ येशू ख्रिस्ताच्या गतिच्या अंतराप्रमाणे आपले अंतर नसेल तर त्याचा अर्थ या दोन गोष्टींमध्ये एक होऊ शकतो. तो म्हणजे, येशू आज ज्याचा वापर यहोवाच्या उद्देशास्तव करीत आहे त्या “विश्‍वासू व बुध्दीमान दास” याच्या पुढे आम्ही अधिक वेगाने जाण्याचा प्रयत्न करीत आहोत, किंवा त्या ‘दासा’चे मार्गदर्शन अनुसरण्यात आम्ही मागे आहोत. (मत्तय २४:४५-४७) याविषयीचे उदाहरण पहिल्या प्रकाराच्या अनुषंगाने पाहू जाता, गतकाळात काही ख्रिश्‍चनांना वाटत होते की काही तात्विक वा संघटनात्मक किंवा शुध्दीकरण जरूरीचे आहेत व ते मुदतीबाहेर जात आहेत. त्यामुळे ते फारच उतावीळ झाले. सर्व गोष्टींच्या हालचाली भरभर होत नाहीत असे वाटून ते नाखूष झाले व त्यांनी स्वतःला यहोवाच्या लोकांपासून अलिप्त केले. पण हे केवढे मूर्खतेचे व संकुचित दृष्टीचे होते बरे! खरे पाहता त्यांना ज्या गोष्टींविषयी इतका विचलीतपणा वाटत होता त्या बदलल्या गेल्या, पण यहोवाच्या नियुक्‍त वेळी.—नीतीसूत्रे १९:२; उपदेशक ७:८, ९.

१५. आपले अंतर योग्यतेने राखण्याचे उत्तम उदाहरण राजा दावीद व येशू यांनी कसे मांडले?

१५ सर्व गोष्टी कोणत्या गतिने व्हाव्या यावर आपली वाचा करण्यापेक्षा यहोवावर थांबून राहणे हा सूज्ञतेचा मार्ग आहे. प्राचीन काळच्या दावीद राजाने याविषयीचे उत्तम उदाहरण मांडले. यहोवाची नियुक्‍त वेळ येण्याआधी शौल राजाविरूद्ध कट उभारुन आपले राज्यपद जाहीर करण्याचे त्याने नाकारले. (१ शमुवेल २४:१-१५) याचप्रमाणे, ‘दावीदाचा पुत्र’ येशू यानेही हे ओळखले की आपल्या स्वर्गीय राज्यपदात पूर्णपणे प्रवेश मिळविण्यासाठी थांबून राहणे अगत्याचे आहे. “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस,” हे भविष्यवादित उद्‌गार आपल्याविषयी लागू होणारे आहेत हे त्याला ठाऊक होते. याकरताच यहुदी जमावाने त्याला “राजा करण्याकरिता धरू” पाहिले तेव्हा येशू लागलेच तेथून निघून गेला. (मत्तय २१:९; स्तोत्रसंहिता ११०:१; योहान ६:१५) यानंतर ३० वर्षांनी देखील इब्रीयांस पत्र १०:१२, १३च्या मते येशू आपल्या राजपदासाठी थांबून होता असे दिसते. खरे म्हणजे, देवाच्या राज्याची १९१४ मध्ये स्थापना झाल्यावर त्याला त्याचा बादशाही हक्क मिळेपर्यंत गेली १९ शतके तो थांबूनच होता.

१६. (अ) आम्ही जातो त्यापेक्षा मंदगतिने आमचे चालणे कसे होऊ शकते ते स्पष्ट करा. (ब) यहोवाने सहनशीलता राखण्यामागील काय उद्देश आहे आणि या सहनशीलतेचा गैरफायदा घेण्याचे आम्ही कसे टाळावे?

१६ तथापि, योग्य अंतर न राखणे याचा अर्थ गति मंदावणे, मागे पडणे असाही होऊ शकतो. जेव्हा देवाचे वचन आपल्याला आमच्या जीवनात काही बदल करण्याचे सांगते तेव्हा आम्ही विलंब न लावता तो करतो का? का आम्ही म्हणतो की देव सहनशील आहे तेव्हा हा बदल काही काळाने, म्हणजे जेव्हा आम्हाला सोयीस्कर असेल तेव्हा करता येण्याजोगा आहे? हे खरे की यहोवा हा सहनशील देव आहे. पण आम्ही आवश्‍यक बदल करण्यात दिरंगाई दाखवावी याकरता तो सहनशील नाही. उलटपक्षी, “तो तुमचे सहन करतो, [ते यासाठी की] कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चाताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९, १५) तर मग, या स्तोत्रकाराचे अनुकरण करणे किती चांगले, ज्याने असे म्हटलेः “मी तुझ्या आज्ञा पाळण्याविषयी उतावळा झालो. मी विलंब लाविला नाही.”—स्तोत्रसंहिता ११९:६०.

१७. योग्य गति ठेवणे याचा आमच्या राज्य प्रचाराशी काय संबंध आहे आणि त्यामुळे आम्ही आपणाला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१७ मंदगति ही राज्याच्या प्रचाराच्या बाबतीत सुद्धा घडू शकते. मत्तयाच्या २५ व्या अध्यायानुसार येशू आज मानवजातीचा न्याय करून “मेंढरां”ना “शेरडां”पासून वेगळे करीत आहे. हे आज बहुतांशी “राज्याची ही सुवार्ता” याच्या प्रचाराने साध्य केले जात आहे. (मत्तय २४:१४; २५:३१-३३; प्रकटीकरण १४:६, ७) हे वेगळे करण्याचे कार्य उरकण्याचा वेळ मर्यादित आहे. (मत्तय २४:३४) उपलब्ध असणारा वेळ संपण्याच्या बेताला आला असताना येशू या कार्याची गति वाढवील असे आम्हाला अपेक्षिता येईल. या कामात तो देवाचा प्रतिनिधि या अर्थाने कार्य करतो, आणि देवाने एकत्रीकरणाच्या कामाविषयी असे अभिवचन दिलेच होतेः “मी यहोवा हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) तर मग, देवाचे सहकर्मी आणि त्याच्या पुत्राच्या पावलास काळजीपूर्वक अनुसरणारे असे आम्ही आमची शारीरिक क्षमता आणि शास्त्रवचनीय जबाबदाऱ्‍या आम्हास वाव देतात त्यानुसार राज्य प्रचार करण्याची आपली गति वाढवीत आहोत का? असेच लाखो यहोवाचे साक्षीदार करतात हे क्षेत्र कार्याचे अहवाल दाखवितात!

फाजील आत्मविश्‍वास टाळा, निराशेचा सामना करा

१८. एखाद्या व्यक्‍तीठायी फाजील स्वरूपाचा आत्मविश्‍वास कसा बळावू शकतो आणि पवित्र शास्त्र या धोक्याविषयी कसा इशारा देते?

१८ आम्ही दुसऱ्‍या कोणाच्या पावलास जितक्या दीर्घकाळ अनुसरत राहू तितक्या अधिकपणे त्याची चालण्याची सवय आपली सवय होईल. पण तेच आपण स्वसंतुष्ट झालो तर काही काळाने आमचे पाऊल मार्गाने ढळण्याचा संभव आहे. तद्वत, आपण जेव्हा येशूच्या लाक्षणिक पावलांना अनुसरतो, तेव्हा आपल्यामध्ये फाजील आत्मविश्‍वास बळावण्याचा, आमचे बळ व क्षमता यावरच निष्काळजीपणे विसंबून राहण्याचा आणि आम्ही येशूचे परिपूर्ण मार्गाक्रमण हस्तगत केले आहे असे वाटू देण्याचा धोका जडू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. लूक २२:५४-६२ मध्ये लिखित असणारा पेत्राचा अनुभव आम्हासाठी समयोचित उदाहरण असा आहे. त्याकरवी १ करिंथकर १०:१२ च्या सत्यतेला अधिक भर मिळतो. ते वचन म्हणतेः “आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”

१९. (अ) प्रत्येक ख्रिश्‍चनांच्या बाबतीत अधूनमधून काय घडते? (याकोब ३:२) (ब) रोमकरांस पत्र ७:१९, २४ मधील पौलाच्या शब्दांचा आम्ही कसा अर्थ घ्यावा?

१९ अपूर्णता असल्यामुळे प्रत्येक ख्रिश्‍चन कधी ना कधी चुकीचे पाऊल टाकील. यामुळे उद्‌भवणारे अंतर हे खूपच लहान, वा इतरांच्या लक्षात देखील येणार नाही असे असेल. किंवा ते अंतर इतके मोठे राहील की ते सर्वांना दिसणारे बनेल. या दोन्ही प्रकरणात पौलाचा हा सूज्ञ सल्ला लक्षात घेणे किती सांत्वनदायक ठरेल बरेः “जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. किती मी कष्टी मनुष्य!” (रोमकर ७:१९, २४) अर्थात, चुकीच्या गोष्टी करण्याच्या सबबीखातर हे शब्द वापरायचे नाहीत. उलटपक्षी, ते अपूर्णतेसोबत झगडणाऱ्‍या भक्‍तिमान ख्रिश्‍चनांच्या उत्तेजनास्तव आहेत आणि त्यांना येशूच्या परिपूर्ण पावलांस अनुसरण्याचे आव्हान पूर्ण करण्यात पराकाष्ठा राखावी याकरता मदत देतात.

२०. (अ) आमच्या जीवन शर्यतीत नीतीसूत्रे २४:१६ आमची कशी मदत देते? (ब) आमचा काय करण्याचा दृढ निश्‍चय असावा?

२० “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठेल.” असे नीतीसूत्रे २४:१६ म्हणते. आमच्या जीवनाच्या शर्यतीत मागे राहावे वा ती सोडून द्यावी असे कोणीही वाटू देऊ नये. ही शर्यत शंभर यार्ड धावण्याची नव्हे तर जणू मॅरेथॉनची, सहनशीलतेची शर्यत आहे. १०० यार्ड धावण्याच्या शर्यतीत धावणाऱ्‍याचे जरा देखील पाऊल वळले तर तो ती बहुतांशी हरण्याची शक्यता आहे. पण मॅरेथॉन शर्यतीत धावणारा जरी कोलमडला, तरी त्याला स्वतःला सावरण्याची वेळ मिळते आणि धाव संपविता येते. तेव्हा व्यक्‍तीगतरित्या तुमचे पाऊल चुकीच्या दिशेकडे वळाले असल्यामुळे तुम्ही “किती मी कष्टी मनुष्य!” असे कळवळून म्हणता, तरी तुम्हाला सावरण्याची वेळ अद्याप आहे हे लक्षात घ्या. आताही तुम्हाला आपला नेता येशू ख्रिस्त याच्या पावलावर परत पाऊल ठेवून चालण्याची सुसंधि आहे. उदास होण्याचे कसलेहि कारण नाही! मागे फिरण्याचेहि कोणतेच कारण नाही! तर मग, ‘येशूच्या पावलांना अनुसरण्याचे’ जे आव्हान आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यात इश्‍वरी मदतीकरवी आपला दृढ निश्‍चय राखा.—१ पेत्र २:२१.

ख्रिश्‍चनांनी—

◻ जुळते घेण्यास का शिकले पाहिजे?

◻ एकाग्रतेने का लक्ष दिले पाहिजे?

◻ सत्याचा नमुना का लक्षात ठेवला पाहिजे?

◻ योग्य अंतर आणि गति का ठेवली पाहिजे?

◻ फाजील आत्मविश्‍वास का टाळला पाहिजे?

◻ निराशेचा सामना का दिला पाहिजे?

[२६ पानांवरील चित्रं]

आपली नजर ध्येयाकडे लावल्यामुळे धार्मिक निश्‍चयाने उठून धावू लागेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा