तुम्हाजवळ चौकस बुद्धी आहे का?
जिज्ञासा ही “जाणून घेण्याची इच्छा” आहे. उत्कट जिज्ञासूवृत्ती व्यक्तीला शिकण्यास उत्सुक, गोष्टीविषयीचा शोध घेणारे बनविते. यहोवाने ही उत्सुकता आम्हामध्ये ठेवली आहे, त्यामुळे बहुदा जन्म झाल्याच्या क्षणापासूनच आम्ही आम्हासाठीचे जग निरखून पाहतो. आमचे अस्तित्व हेच मुळात शिकण्याची कला कधीच न लोपणारी आहे. आम्हास प्रौढ, सुयोग्य प्रौढ बनणे आहे तर आम्हास आमची जिज्ञासा, गोष्टीचा शोध लावण्याच्या इच्छेस पूर्ण वाव दिला पाहिजे.
हे खासकरून आध्यात्मिक बाबतीत सत्य आहे. आमचे चिरकालीक जीवनाचे भवितव्य आमचे यहोवाबाबतचे शिकण्यावर अवलंबून आहे. (योहान १७:३) तो आम्हाकडून त्याबाबत विचारणा करण्याचे “त्याला चाचपडत चाचपडत शोधण्याचे” अपेक्षितो असे पवित्रशास्त्र आम्हास सांगते. (प्रे. कृत्ये १७:२३, २४, २७) आम्ही आमची चौकसवृती दडपून ठेवली किंवा त्याला वाढण्याचा वाव देत नाही तर आमची प्रगती मंदावेल. वास्तविक, आध्यात्मिक गोष्टीविषयीच्या आस्थेची कमतरता नाशकारक होऊ शकेल.—स्तोत्रसंहिता ११९:३३, ३४; होशेय ४:६.
यानुसार, यहोवाच्या लोकांवर पूर्वीच्या काळापासूनच नेहमी योग्य इच्छा तृप्तीसाठी सूचना घेणे व शिकणे याच्या जरूरीवर जोर दिला गेला होता. (अनुवाद ६:६, ७; ३१:१२; २ इतिहास १७:९) येशू मसिहा पृथ्वीवर कधीही नव्हता एवढा थोर शिक्षक होता. (मत्तय ९:३५) त्याच्या शिष्यांनी त्याचे उदाहरण अनुसरले. विरोधास तोंड देताना सुद्धा त्यांनी “शिकविण्याचे व सुवार्ता गाजविण्याचे सोडिले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२) अशाप्रकारचे त्यांचे शिक्षण चौकस बुद्धीत आस्था चेतविणारे ठरले. पुष्कळजण बिरूयातील लोकांप्रमाणे होते ज्यांनी असा प्रतिसाद दिला: “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने, या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी शास्त्रवचनात दररोज काळजीपूर्वक शोध केला.”—प्रे. कृत्ये १७:११.
याप्रमाणेच आधुनिक ख्रिश्चन मंडळ्यांच्या पुष्कळ हालचाली शिक्षणासभोवताली केंद्रित आहेत. अशाप्रकारे मंडळी प्राधान्याने तिच्या अस्तीत्वाचा उद्देश पूर्ण करते म्हणजेच यहोवा व त्याचे उद्देश यांच्याविषयी शिकण्याची इच्छा वाढविते व तृप्त करते. अशाप्रकारची जिज्ञासा हितकारक व फायद्याची आहे.
जिज्ञासेच्या योग्य मर्यादा
कांहीवेळेस मुलांच्या त्यांच्या स्वतःच्या जिज्ञासेबाबत संरक्षित राखले पाहिजे. मूल कांहीतरी उष्ण अशास स्पर्श करण्यास किंवा जिज्ञासेने काचेचा तुकडा, त्याची चव कशी आहे म्हणून तोंडात घालते तेव्हा त्याला दुखापत होईल. या विषयीच्या त्याच्या जिज्ञासेला आम्ही नाऊमेद करतो तेव्हा आम्ही त्यास त्याच्या वाढीस अटकाव करतो असे नाही.
मुले मोठी होतात तेव्हा त्यांची जिज्ञासा त्यांना पुन्हा समस्येत लोटील. अशा प्रकारे, किशोरवयीन मुलगा अश्लील मासीकात काय आहे हे पहाण्यास फारच जिज्ञासू होईल. किंवा युवती जिज्ञासेमुळे तंबाखू किंवा इतर मादक औषधांच्या प्रयोगाकडे वळेल. कदाचित तरूणांची टोळी एकत्र येऊन भरपूर बीअर प्राशन करील—केवळ ते पिणे कसे काय असते हे पाहण्यासाठी! पुन्हा एकवार आम्ही किशोवयीनास या प्रकारच्या जिज्ञासेविषयी नाऊमेद केले तर त्यांची स्वाभाविक वाढ व विकासास बाधा आणीत नसतो.
प्रौढ ख्रिश्चनाची जिज्ञासूवृती त्यास कदाचित धोक्यात घालील अशी कांही क्षेत्र आहेत का? होय, आहेतच. पौलाने तिमथ्याला जे त्याचा विश्वास बहकला जाण्याच्या यत्नाने ख्रिश्चन जिज्ञासेला उपयोगात आणतील त्याच्या विरूद्ध धोक्याचा इशारा दिला. “हे तीमथ्या” असे पौल म्हणाला, “तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून व जिला ‘विद्या’ हे नांव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर रहा. अशा विद्येचे प्रदर्शन करून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत.”—१ तीमथ्यी ६:२०, २१.
तीमथ्याला लिहीलेल्या त्याच्या दुसऱ्या पत्रात पौलाने पुढील धोक्याचा इशारा दिला: “ती माणसे सत्यापासून चुकली आहेत, पुनरूत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करितात.” (२ तीमथ्यी २:१८) अशा प्रकारच्या भाष्याने केवढी जिज्ञासा उत्पन्न केली असावी याची तुम्ही कल्पना करू शकाल का? बेसावध लोकांनी आश्चर्य केले असेल की: ‘या माणसांच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? पुनरूत्थान होऊन चुकले आहे असे ते कसे म्हणू शकतात?’ गुप्तपणे त्यांनी ऐकले असेल. परिणाम? काहींचा विश्वास नाश पावला. अशाप्रकारचे भाष्य जिज्ञासेमुळे ऐकणे धोक्याचे होते त्या प्रमाणेच प्रयोगादाखल जिज्ञासेमुळे मादक औषधे किंवा अश्लील मासिके धोकेदायक आहेत.
याचा अर्थ ख्रिश्चन संकोचीत मनोवृतीचे, इतर लोकांचे विचार ऐकण्यास नाखुष आहेत असा आहे का? नाही, ती अशी गोष्ट नाही. त्या ऐवजी त्यांना सूचना आहे की त्यांना नंतर दुःखी बनविल अशा गोष्टीसाठी त्यांचे मन उत्सुक होण्यापासून टाळावे. हव्वेने जिज्ञासेमुळे दियाबल सैतानाचे धूर्त शब्द ऐकण्याचे नाकारले असते तर इतिहास केवढा बदलला असता याचा केवळ विचार करा! (उत्पत्ती ३:१–६) प्रेषित पौलाने इफिसकर वडीलांना “लांडगे,” जे हव्वेबाबत सैतानाने प्रदर्शित केलेला आत्मा दाखवितात व “शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरित गोष्टी बोलतील” त्यांजविषयी धोक्याचा इशारा दिला. (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) ते “बनावट गोष्टी” आम्हास “सावज” करण्यास उपयोगात आणतील. हे शब्द ख्रिश्चनाच्या आध्यात्मिकतेस घातक विचार व्यक्त करतात.—२ पेत्र २:३.
तुम्हास एकादे पेय विषारी होते हे माहीत आहे तरी त्याची चव कशाप्रमाणे आहे हे जाणण्यासाठी जिज्ञासेमुळे किंवा तुमची शरीरप्रकृती त्या विषास सहन करण्यास पुरेशी आहे हे पाहण्यास ते प्राशन कराल का? अर्थातच नाही. याचप्रमाणे, सत्यापासून तुम्हास बहकविण्यास व फसविण्यास जाणूनबूजून आयोजीत शब्दाकडे खुल्या मनोवृत्तीने पहाणे सुज्ञ मार्ग आहे का? खचित नाही!
जगिक तत्वज्ञानासंबधी सावध असा
जिज्ञासेने आम्हास जागिक तत्वज्ञान परिक्षण्याकडे निरविले तर ती देखील आम्हास उपाय करू शकते. तत्वज्ञानाची व्याख्या अशी केली आहे “वास्तविकतेची तत्व व मूलभूत कारणे यांचा संपूर्ण मानवी अनुभव व अंदाज याच्या माध्यमातून स्पष्टीकरण करण्याचा मानवी प्रयत्न होय.” सर्वसाधारणपणे मानवी तत्वज्ञान विचारार्थ घेतात ते “सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहंचणारे” त्याच्या प्रमाणे बनतात. (२ तीमथ्यी ३:७) त्यांचे अपयश एका मुलभूत दोषामुळे आहे: ते देवाकडच्या ज्ञानापेक्षा मानवी ज्ञानावर विसंबून राहतात.
प्रेषित पौलाने हा दोष मनमोकळे पणे उघड केला होता. तो करिंथकरांच्या सोबत “या जगाच्या ज्ञाना”संबधी बोलला जे “देवापाशी मुर्खत्व” गणले आहे. (१ करिंथकर ३:१९) त्याने रोमकरांना “निर्बुद्ध कल्पना”चे होते त्यांच्याविरूद्ध इशारा दिला. (रोमकर १:२१, २२) आम्हापाशी आहे त्या सर्व गोष्टीचा दाता यहोवा आहे. संयुक्तीकपणे आम्हास “देवाच्या रहस्यमय गोष्टी” उघड करण्यास “अचूक ज्ञान व पूर्ण समज” पुरविण्यास आम्ही त्याजकडे पाहतो. (फिलीपैकर १:९; १ करिंथकर २:१०) देवाच्या ज्ञानाचा प्रमुख उगम त्याचे वचन पवित्रशास्त्र आहे.
मानवी तत्वज्ञान देव वचनास दुर्लक्षित करते म्हणून आम्ही कधीही ते सादर करीत असलेल्या धोक्यांना कमी लेखू नये. आधुनिक तत्वज्ञानाच्या विचाराने ख्रिश्चन राष्ट्रसमुहाच्या पुष्कळ शिक्षकांना उत्क्रांतीचा सिद्धान्त स्विकारण्यास फसविले आहे. त्यांनी उच्च टिकेच्या बाजूस बौद्धीक अब्रुदारपणा प्राप्त करण्यास पवित्र शास्त्राच्या प्रेरितपणाच्या विश्वासास त्यागले. राजकीय व सामाजीक तत्वज्ञानाने व्यक्तीगत स्वातंत्र्यावर जोर दिला ज्याने गर्भपात, सर्वत्र असणारी लैंगिक अनीती, मादक औषधांचा दुरुपयोग व इतर घातक हालचालीकडे निरविले. भौतिकवादी विचारसरणीने बहुतेक लोकांना सौख्य व यशप्राप्ती त्यांच्या भौतिक समृद्धीने गणण्याकडे निरविले.
हे सर्व तत्वज्ञान समस्यांचे निरसन देवाच्या सहाय्याविना मानवी कल्पनेने सौख्यानंदाचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिनिधीत्व करते. यिर्मयाने ताडलेले मुलभूत सत्य ते सर्व दुर्लक्षित करतात: ‘हे यहोवा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) आमचे सौख्य व आमचे तारण आमचा आज्ञाधारकपणा व यहोवावर विसंबून राहाणे यावर अवलंबून आहे. आमच्या जिज्ञासूवृतीला मोकाटपणा देणे व आमच्या विचारसरणीला डागाळणाच्या व सरतेशेवटी आम्हास ज्यांना आशा नाही अशांच्या वर्गात लोटणाऱ्या मानवी कल्पनासाठी आमची मने खुली ठेवणे या मोहाचा प्रतिकार करणे हा सुज्ञतेचा मार्ग आहे.
जवळ येऊन ठेपलेल्या अंताबाबतची जिज्ञासा
यहोवा देवाने एदेन मध्येच सैतानाच्या बंडाळीचे दुष्ट परिणाम काढून टाकण्याचे जे प्रकट केले तेव्हापासून त्याच्या सेवकांच्याजवळ त्या इश्वरी उद्देशाच्या अंमलबजावणीबाबत ज्वलंत जिज्ञासा होती. एवढेच काय, देवदुतांनीही यासंबंधी जिज्ञासा दाखविली. (१ पेत्र १:१२) येशूच्या दिवसात पुष्कळजण राज्य केव्हा येईल याची अचूक वेळ जाणण्यास अति उत्सुक होते. तथापि, येशूने त्यांना वारंवार सांगितले होते की हे जाणणे ही त्यांच्यासाठी यहोवाची इच्छा नव्हती. (मत्तय २५:१३; मार्क १३:३२; प्रे. कृत्ये १:६, ७) विशिष्ठ तारीख निश्चीत करण्याचा प्रयत्न हा निष्फळ ठरला असता. याच्याऐवजी त्याने सुज्ञपणे त्यांना अर्जविले की त्यांनी त्यांच्या ख्रिश्चन जबाबदारीकडे लक्ष द्यावे व त्या दिवसाची समीपता लक्षात ठेवावी.—लूक २१:३४–३६.
आज, जागतिक घटना, अंत जवळ असण्याचा भरभक्कम पुरावा देतात तो केव्हा येईल त्या तारखेबाबतची जिज्ञासा समृद्ध होते. विशिष्ट प्रगतिने काहींना कदाचीत याची खात्री दिली होती की त्यांनी तो दिवस व घटका शोधून काढली. त्यांची आशा साकार झाली नाही तेव्हा त्यांना पुष्कळ यातना सहन कराव्या लागल्या आणि देवाची सेवा करण्यापासून दूर होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. ही गोष्ट यहोवाच्या हाती सोपविणे, तो योग्य समयी नाश आणील यावर भरवसा ठेवणे हे फार चांगले आहे. सुसज्ज असण्यास आम्हास पोषक ते सर्व काही पुरविले जात आहे.
समतोलाची गरज
यास्तव जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणे आमची जिज्ञासा वरदान किंवा शाप ठरू शकते. योग्यपणे जोपासली तर ती अमूल्य ज्ञानाचा खजिना असू शकते जी आनंद व आल्हाददायकता देते आमचा निर्माता त्याची इच्छा व त्याचे उद्देश याविषयीची सुदृढ जिज्ञासा सखोलपणे समाधान व फायदेकारक होऊ शकते. मोकाट, दूषित जिज्ञासा आम्हास तर्काच्या गाळात व मानवी कल्पनांच्यामध्ये आकर्षित करील जेथे अस्सल विश्वास व इश्वरी भक्ती बचावू शकत नाही. तद्वत, तुमची जिज्ञासा प्रश्नार्थक अशा कांहीकडे लोटण्याचा संकेत देऊ लागेल तेव्हा “तुम्ही . . . भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेपासून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.”—२ पेत्र ३:१७.