वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ९/१ पृ. ८-९
  • काना येथील दुसरा चमत्कार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काना येथील दुसरा चमत्कार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • काना येथील दुसरा चमत्कार
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशूचा पहिला चमत्कार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • येशूचा पहिला चमत्कार
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ९/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

काना येथील दुसरा चमत्कार

यहुदीया येथील विस्तृत प्रचार कार्याची मोहीम संपवून येशू आपल्या स्वगृही परततो. ते विश्रांती घेण्यासाठी नव्हे. तर जेथे तो मोठा झाला त्या गालील प्रदेशात भव्य प्रमाणात सेवेची सुरुवात करण्यासाठी तो येतो. पण शिष्य त्याच्या सोबत राहाण्याऐवजी आपल्या परिवाराकडे व पूर्वीच्या व्यवसायाकडे परततात.

येशू कोणत्या संदेशाचा प्रचार सुरु करतो? तो असा आहे: “देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चाताप करा व सुवार्तेवर विश्‍वास ठेवा.” आणि याचा प्रतिसाद काय मिळतो? गालिली लोक येशूचा स्विकार करतात तो सर्वांकडून आदर प्राप्त करतो. हे फक्‍त त्याच्या संदेशामुळे नव्हे तर पुष्कळांनी महिन्यापूर्वी यरूशलेमेतील वल्हांडणाच्या वेळेस त्याने केलेले अद्‌र्भित कृत्य पाहिल्याने हे असे होते.

प्रत्यक्षात येशूने गालीलातील साक्षीची सुरुवात काना येथूनच सुरु केली होती. आधी तुम्हाला आठवत असेलच की यहुदीयावरून परत येताना एका लग्नाच्या मेजवानीत त्याने पाण्याचे रूपातंर द्राक्षरसात केले होते. आणि आता दुसऱ्‍या प्रसंगात हेरोद राजाच्या एका अमलदाराचा मुलगा खूप आजारी आहे. येशू यहुदातून काना येथे आला आहे असे ऐकताच तो अमलदार कफर्णहुम येथील आपल्या घरापासून त्याला भेटावयास येतो. दुःखातिशयाने तो विनंती करतो: ‘माझे मूल मरण्यापूर्वी आपण येण्याची कृपा करावी.’

येशू त्याला म्हणतो: ‘जा, तुझा मुलगा बरा झाला आहे!’ हेरोदाचा अमलदार त्याच्या वचनावर विश्‍वास ठेवतो व आपल्या घरी जाण्याच्या प्रवासास लागतो. तो वाटेने जात असता त्याचे दास त्याला भेटतात. त्यांना त्याला सर्व काही ठीक आहे व आपला मुलगा बरा झाला आहे हे सांगण्याची घाई झालेली असते. ‘त्याला कोणत्या ताशी बरे वाटू लागले?’ तो विचारतो.

“काल दुपारी १:०० वाजता,” ते उत्तरतात.

ह्‍यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की ‘तुझा मुलगा बरा झाला आहे त्याच वेळी हे झाले असे तो अमलदार ओळखतो. आणि तो व त्याचे घराणे येशूचे शिष्य बनतात.

यहुदीयावरून परतताना येशूने दोन चमत्कार तेथे सादर केल्याने काना हे ठिकाण प्रसिद्वीस आले. अर्थात ह्‍या वेळेपर्यंत त्याने केले चमत्कार हे फक्‍त एवढेच नव्हते. तर तो गालीलात परत आला होता याचे ते चिन्ह होते.

येशू आता घरी नासरेथला परततो. तेथे त्याच्यासाठी काय वाट पाहून आहे? योहान ४:४३–५४; मार्क १:१४, १५; लूक ४:१४, १५.

◆ येशू गालीलास परततो तेव्हा, त्याच्या शिष्यांचे काय होते; आणि लोक त्याचे कसे स्वागत करतात?

◆ येशू कोणता चमत्कार सम्पन्‍न करतो, आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्‍यावर त्याचा कसा परिणाम होतो?

◆ येशूमुळे काना हे कसे प्रसिद्धीस येते?

[८ पानांवरील चित्र]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा