२०२० सालची एकूण संख्या
यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८७
देश: २४०
मंडळ्या: १,२०,३८७
जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: १,७८,४४,७७३
स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २१,१८२
प्रचारकांचा उच्चांकa: ८६,९५,८०८
प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८४,२४,१८५
२०१९ च्या तुलनेत वाढ: -०.६
बाप्तिस्मा घेणारेb: २,४१,९९४
प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियरc: १२,९९,६१९
प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ३,३८,५६८
प्रचारात एकूण तास: १,६६,९९,०१,५३१
प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यासd: ७७,०५,७६५
२०२० च्या सेवा वर्षादरम्यानe यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि प्रवासी पर्यवेक्षक यांच्या गरजा भागवण्यासाठी २३ कोटी १० लाखांपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. जगभरात शाखा कार्यालयांत एकूण २०,९९४ जण खास पूर्णवेळेची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.
a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्या व्यक्तिला प्रचारक म्हणतात. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.
b एका व्यक्तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.
c पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्ती जिचं मंडळीत चांगलं नाव आहे. एक पायनियर स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात ठरवलेले तास घालवतो.
d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “बायबल अभ्यास म्हणजे नेमके काय?” हा लेख पाहा.
e २०२० चा सेवा वर्ष अहवाल हा १ सप्टेंबर, २०१९ ते ३१ ऑगस्ट, २०२० या कालावधीतला आहे.