वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bm भाग २३ पृ. २६
  • सुवार्तेचा सगळीकडे प्रसार होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्तेचा सगळीकडे प्रसार होतो
  • बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांसमोर सुवार्तेचं समर्थन करणं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “माझी बाजू ऐकून घ्या”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
bm भाग २३ पृ. २६
अथेन्समध्ये पौल भाषण देत आहे

भाग २३

सुवार्तेचा सगळीकडे प्रसार होतो

पौल सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी जमिनीवाटे व समुद्रावाटे प्रवास करतो

ख्रिस्ताचा अनुयायी बनल्यानंतर पौलाने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा मोठ्या आवेशाने प्रसार केला. एके काळी ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करणाऱ्‍या पौलाला आता स्वतः भयानक विरोधाला तोंड द्यावे लागले. पण तरीसुद्धा, या परिश्रमी प्रेषिताने दूरदूरच्या अनेक ठिकाणी जाऊन, देवाचे राज्य कशा प्रकारे मानवजातीसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश पूर्ण करेल याविषयीची सुवार्ता सांगितली.

पौलाच्या पहिल्या प्रचार दौऱ्‍याच्या वेळी लुस्त्र येथे त्याने जन्मापासून पांगळा असलेल्या एका मनुष्याला बरे केले. हे पाहून लोक मोठ्याने ओरडून, पौल व त्याचा सोबती बर्णबा देव आहेत असे म्हणू लागले आणि त्यांच्यासाठी बलिदान देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. असे करण्यापासून पौल व बर्णबा यांनी मोठ्या मुश्‍किलीने त्या लोकांना रोखले. पण याच लोकांनी नंतर पौलाच्या विरोधकांच्या सांगण्यावरून त्याला दगडमार केला आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून निघून गेले. पौल या हल्ल्यातून मरता मरता वाचला आणि नंतर त्याने या शहरात येऊन येथील शिष्यांना प्रोत्साहन व सांत्वन दिले.

ख्रिस्ती बनलेल्या काही यहुद्यांचे असे म्हणणे होते, की परराष्ट्रीयांतील ख्रिश्‍चनांनी मोशेच्या नियमशास्त्रातील विशिष्ट आज्ञांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. पौलाने हा प्रश्‍न जेरूसलेममधील प्रेषित व वडीलधाऱ्‍यांपुढे सादर केला. तेव्हा प्रेषितांनी व वडीलधाऱ्‍यांनी शास्त्रवचनांचे नीट परीक्षण केल्यानंतर देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मंडळ्यांना असे लिहून कळवले, की मूर्तिपूजेपासून, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्‍त खाण्यापासून तसेच जारकर्मापासून त्यांनी अलिप्त राहावे. या आज्ञा “जरुरीच्या” होत्या, पण त्यांनुसार वागण्याकरता मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे बंधनकारक नव्हते.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

दुसऱ्‍या प्रचार दौऱ्‍यात पौल सध्याच्या ग्रीसमध्ये असलेल्या बिरुयास गेला. तेथे राहणाऱ्‍या यहुद्यांनी मोठ्या उत्सुकतेने देवाच्या वचनाचा स्वीकार केला आणि पौलाने शिकवलेल्या गोष्टींची खातरी करून घेण्यासाठी ते दररोज शास्त्रवचनांत परीक्षण करायचे. पण, येथेही पौलाला विरोध झाल्यामुळे त्याला हे शहर सोडून अथेनैस जावे लागले. अथेनैतील विद्वानांपुढे पौलाने एक जोरदार भाषण दिले. पौलाचे हे प्रभावशाली भाषण म्हणजे लोकांच्या भावनांचा आदर करून, त्यांच्या मनातील विचार ओळखून परिणामकारक रीत्या त्यांच्याशी कसे बोलावे याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

पौलाच्या तिसऱ्‍या प्रचार दौऱ्‍यानंतर तो जेरूसलेमला गेला. तेथील मंदिरात तो गेला तेव्हा काही यहुद्यांनी दंगल माजवली. त्यांना पौलाला ठार मारायचे होते. पण रोमन सैनिकांनी मध्ये पडून पौलाला ताब्यात घेतले आणि त्याची उलटतपासणी केली. पौल रोमन नागरिक असल्यामुळे त्याने नंतर रोमन सुभेदार फेलिक्स याच्यासमोर आपली बाजू मांडली. यहुद्यांनी पौलावर जे आरोप लावले होते ते सिद्ध करण्यासाठी त्यांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत. आणखी एक रोमन सुभेदार, फेस्त, जेव्हा पौलाला यहुद्यांच्या स्वाधीन करणार होता तेव्हा पौलाने म्हटले, “मी कैसराजवळ न्याय मागतो.” फेस्ताने उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.”—प्रेषितांची कृत्ये २५:११, १२.

रागाने पेटलेल्या जमावापासून पळ काढण्यासाठी रोमी सैनिक पौलला मदत करतात

त्यामुळे, पौलाला जहाजाने इटलीला नेण्यात आले. पण प्रवासादरम्यान जहाज फुटल्यामुळे त्याला मिलिता नावाच्या बेटावर हिवाळा घालवावा लागला. शेवटी रोमला पोचल्यावर पौल दोन वर्षे एक भाड्याच्या घरात राहिला. शिपायांचा पहारा असूनही, हा आवेशी प्रेषित त्याची भेट घ्यायला येणाऱ्‍या सर्वांना देवाच्या राज्याविषयी सांगत राहिला.

—प्रेषितांची कृत्ये ११:२२–२८:३१ वर आधारित.

  • लुस्त्र येथे पौलाने जन्मापासून पांगळा असलेल्या एका मनुष्याला बरे केले तेव्हा काय घडले?

  • मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्यासंबंधी उठलेला वाद कशा प्रकारे सोडवण्यात आला?

  • पौल रोमला कसा काय पोचला आणि तेथे त्याने काय केले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा