भाग ८ • प्रेषितांची कार्यं २१:१८–२८:३१
“देवाच्या राज्याचा प्रचार . . . कोणत्याही अडथळ्याशिवाय”
या भागात, पौलसोबत प्रवास करताना आपण पाहू, की तो कशा प्रकारे संतापलेल्या जमावांचा सामना करतो, तुरुंगवास भोगतो आणि एकापाठोपाठ एक रोमन अधिकाऱ्यांसमोर न्यायालयात हजर होतो. या सर्व परिस्थितींतून जातानाही प्रेषित पौल देवाच्या राज्याबद्दल साक्ष देत राहिला. प्रेषितांची कार्यं पुस्तकाच्या शेवटच्या भागातल्या रोमांचक घटनांवर विचार करताना स्वतःला हा प्रश्न विचारा, की ‘मला या धाडसी आणि आवेशी प्रचारकाचं अनुकरण कसं करता येईल?’