वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g21 क्र. ३ पृ. १४-१५
  • उत्तर का महत्त्वाचं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तर का महत्त्वाचं आहे
  • सावध राहा!—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाला अर्थ आहे हे तुम्हाला समजेल
  • दररोजच्या जीवनासाठी एक भरवशालायक मार्गदर्शन मिळेल
  • तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  • भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळेल
  • देव खरंच आहे का? हे जाणून तुम्हाला काय फायदा होईल?
    सावध राहा!—२०१५
  • देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • बायबल आपल्याला एक आशा देतं
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बायबल आपल्याला एक आशा देतं
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या-सुरुवातीचे धडे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२१
g21 क्र. ३ पृ. १४-१५
झाडाखाली बसलेले मित्रमैत्रिणी झाडावर बसलेल्या पक्षांना पाहत आहेत.

उत्तर का महत्त्वाचं आहे

या विश्‍वाचा कोणी निर्माणकर्ता आहे का हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? आत्तापर्यंत पाहिलेल्या पुराव्यांवरून, एक सर्वशक्‍तिमान देव अस्तित्वात आहे ही गोष्ट जर तुम्हाला पटली असेल, तर बायबल हे त्याच्या प्रेरणेने लिहिलं आहे या गोष्टीचा पुरावासुद्धा तुम्हाला तपासून पाहावासा वाटेल. आणि बायबल जे म्हणतं त्यावर तुमचा विश्‍वास असेल, तर खाली दिलेल्या मार्गांनी तुम्हाला त्याचा फायदा होईल.

जीवनाला अर्थ आहे हे तुम्हाला समजेल

बायबल म्हणतं: “आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन, अन्‍नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून [देव] तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत राहिला.”—प्रेषितांची कार्यं १४:१७.

म्हणजे काय: निसर्गातल्या ज्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेता त्या सर्व गोष्टी निर्माणकर्त्याकडून भेट आहेत. त्याला तुमची किती काळजी आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा या गोष्टींबद्दलची तुमची कदर आणखीन वाढेल.

दररोजच्या जीवनासाठी एक भरवशालायक मार्गदर्शन मिळेल

बायबल म्हणतं: “नीती, न्याय आणि निःपक्षपणा काय असतो, हेही तुला समजेल आणि योग्य मार्ग कोणता हे तुला कळेल.”—नीतिवचनं २:९.

म्हणजे काय: आपला निर्माणकर्ता असल्यामुळे, आपल्याला आनंदी राहण्यासाठी कशाची गरज आहे हे देवाला माहीत आहे. बायबल वाचल्यामुळे जीवनासाठी उपयोगी असलेल्या बऱ्‍याच गोष्टी तुम्हाला समजतील.

तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

बायबल म्हणतं: “तुला देवाचं ज्ञान मिळेल.”—नीतिवचनं २:५.

म्हणजे काय: या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे ही गोष्ट समजल्यामुळे तुम्हाला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील. जसं की, जीवनाचा उद्देश काय आहे? आज इतकं दु:ख का आहे? मेल्यानंतर आपलं काय होतं? या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं तुम्हाला बायबलमध्ये मिळतील.

भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळेल

बायबल म्हणतं: “यहोवा म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत. ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.’”—यिर्मया २९:११.

jw.org/mr या वेबसाईटवर बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो?  आणि बायबलचा लेखक कोण आहे?  हे व्हिडिओ पाहा. त्यासाठी सर्च बॉक्समध्ये “बायबल खरं” किंवा “बायबलचा लेखक” असे शब्द टाकून शोधा.

म्हणजे काय: देव आपल्याला असं वचन देतो, की भविष्यात तो सर्व वाईट गोष्टी, दु:ख आणि मृत्यूसुद्धा काढून टाकेल. देवाने दिलेल्या या वचनावर तुमचा भरवसा असेल, तर सुंदर भविष्याच्या आशेमुळे दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांना तुम्हाला धैर्याने तोंड देता येईल.

निर्माणकर्ता आहे असं मानल्यामुळे काही जणांना कसा फायदा झाला आहे

सिंडी.

“जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्वं द्यायचं, इतरांसोबत असलेले संबंध कसे टिकवायचे, किंवा मग देवाशी मैत्री कशी करायची, अशी कोणतीही गोष्ट असो, यांबाबतीत देव आपल्याला कशी मदत करतो हे पाहून मी नेहमी चकीत होते.”—सिंडी, अमेरीका

एलीस.

“निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवल्यामुळे मी आयुष्यात खूप सुखी आणि समाधानी आहे. त्याने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दल आणि बायबलबद्दल शिकण्यासारखं बरच काही आहे. त्यामुळे मला कधीच कंटाळा येत नाही.”—एलीस, फ्रान्स.

पिटर.

“निर्माणकर्त्याने बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वागल्यामुळे मी आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. त्यामुळे मला इतरांबद्दल पॉझिटीव विचार करायला, इतरांशी प्रेमाने वागायला आणि समाधानी राहायला मदत झाली आहे. शिवाय आता माझ्या मुलांसोबतही माझं चांगलं जमतं.”—पिटर, नेदरलँड्‌स.

लिझ.

“पूर्वी माझं आयुष्य खाणंपिणं, झोपणं आणि धडपडत कामाला जाणं इतकंच होतं. फक्‍त जगण्यापुरतंच माझं आयुष्य होतं. पण आता आयुष्य किती सुंदरए ते मला समजलंय. आणि मला भरभरून जगावसं वाटतं.”—लिझ, एस्टोनिया.

एड्रीअन.

“मी सहसा कुठल्याही गोष्टीचं खूप जास्त टेन्शन घेतो. पण लवकरच सगळ्या वाईट गोष्टींचा, अन्यायाचा आणि दु:खाचा अंत होणार आहे हे समजल्यामुळे मी चिंतेचा सामना करायला शिकलोय.”—एड्रीअन, फ्रांस.

जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमध्ये कशी दिली आहेत हे पाहण्यासाठी बायबलचा अभ्यास का करावा?—पूर्ण व्हिडिओ  हा व्हिडिओ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा