बायबल काय म्हणतं?
जगाचा अंत
“जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत,” असं बायबलमधील १ योहान २:१७ या वचनात म्हटलं आहे. पण मग हे कोणतं “जग” आहे आणि ते कधी व कसं नाहीसं होईल?
नेमक्या कोणत्या ‘जगाचा’ अंत?
बायबल काय म्हणतं?
हे जग म्हणजे आपली पृथ्वी नव्हे. कारण, बायबलमधील वचनात म्हटलं आहे, की जगाची “वासना” नाहीशी होईल; म्हणजेच, जे लोक देवाचा अनादर करतात आणि आपल्या कार्यांद्वारे स्वतःला देवाचा शत्रू बनवतात त्यांचा देव नाश करणार आहे. देवाला या लोकांच्या वाईट विचारसरणीचा वीट आहे. (याकोब ४:४) तर अशा जगाचा भाग असलेल्या लोकांना “युगानुयुगाचा नाश ही शिक्षा” मिळणार आहे. (२ थेस्सलनीकाकर १:७-१०) पण “तुम्ही जगाचे” बनू नका, या येशूच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या लोकांना मात्र या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे.—योहान १५:१९.
पहिले योहान २:१७ या वचनाच्या शेवटी असं म्हटलं आहे, की “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची संधी मिळालेले धार्मिक लोक “पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील,” असं स्तोत्र ३७:२९ या वचनात म्हटलं आहे.
“जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.”—१ योहान २:१५.
पण मग कसा होईल हा अंत?
बायबल काय म्हणतं?
जगाचा अंत प्रामुख्यानं दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यांत, देव संघटित खोट्या धर्माचा नाश करेल. बायबलमध्ये या संघटित खोट्या धर्माला, “मोठी बाबेल,” असं नाव देण्यात आलं आहे. ती एक वेश्या आहे, असं तिच्याबद्दल म्हटलं आहे. (प्रकटीकरण १७:१-५; १८:८) कारण, ती देवाबरोबर एकनिष्ठ असल्याचा दावा करते; परंतु सोबतच जगातील राजकीय नेत्यांबरोबरही तिचे मैत्रीसंबंध आहेत. आणि खरं तर, तिचे हेच मित्र तिचा नाश करणार आहेत. ते तिचा “द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस [तिची धनसंपत्ती] खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.”—प्रकटीकरण १७:१६.
दुसऱ्या टप्प्यांत, देव जगातील राजांकडं अर्थात जगातील सरकारांकडं त्याचा मोर्चा वळवेल. “हर्मगिदोन” म्हटल्या जाणाऱ्या लढाईत देव या राजांचा आणि जगातील इतर दुष्ट लोकांचा नाश करेल. हर्मगिदोन ही ‘देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ आहे.—प्रकटीकरण १६:१४, १६.
“देशांतील सर्व नम्र जनांनो, . . . धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:३.
केव्हा होईल हा अंत?
बायबल काय म्हणतं?
येणाऱ्या राज्याची संपूर्ण जगात पुरेशी घोषणा झाली आहे आणि येणाऱ्या नाशाविषयी लोकांना भरपूर इशारा देण्यात आला आहे, असं समाधान देवाला झाल्यावर तो मानवी सरकारांना काढून स्वतःचं एक जागतिक सरकार स्थापन करेल. (दानीएल ७:१३, १४) येशू ख्रिस्तानं म्हटलं होतं: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आज जगभरात चाललेल्या प्रचार कार्यातून देवाचा न्याय आणि त्याची दया दिसून येते. शिवाय हे प्रचार कार्य, अंत जवळ आल्याच्या इतर चिन्हांपैकी एक चिन्ह आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणावर होणारी युद्धं, भूकंप, दुष्काळ आणि रोगराई हीदेखील अंत जवळ आल्याची काही चिन्हं आहेत.—मत्तय २४:३; लूक २१:१०, ११.
बायबलमध्ये फक्त जागतिक घटनांविषयीच भाकीत करण्यात आलेलं नाही तर या शेवटल्या दिवसात लोकांची मनोवृत्ती कशी होईल तेही सांगण्यात आलं आहे. त्यात असं म्हटलं आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील . . . माणसे स्वार्थी, धनलोभी, . . . आईबापांस न मानणारी, . . . असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, . . . देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” होतील.a—२ तीमथ्य ३:१-५.
सध्याचं दुष्ट जग लवकरच ‘नाहीसं’ होणार आहे.—१ योहान २:१७
वर सांगितलेल्या गोष्टी, १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या. पण, या वर्षापासून पृथ्वीच्या अगदी कानाकोपऱ्यात देवाच्या राज्याची घोषणादेखील करण्यात येऊ लागली. ही घोषणा यहोवाचे साक्षीदार करत आहेत. हे काम आपणच करत आहोत, याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या मुख्य प्रकाशनाचं नावच, टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक असं आहे.
“तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्तय २५:१३. (g15-E 11)
a अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा अध्याय ९ पाहा. हे पुस्तक www.jw.org/mr या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.