वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. २१-२३
  • हातांची नखे—तुम्ही त्यांची निगा घेता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हातांची नखे—तुम्ही त्यांची निगा घेता का?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जटिल संरचना
  • त्यांचा उपयोग
  • योग्य काळजी घेतल्यास ती मजबूत होतात
  • त्यांच्या वाढीची व शोभेची निगा
  • जगावरील दृष्टिप्क्षेप
    सावध राहा!—२००२
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेचं नवीन वैशिष्ट्य
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. २१-२३

हातांची नखे—तुम्ही त्यांची निगा घेता का?

स्वीडनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“तुझी नखं पाहू जरा,” असे कोणी तुम्हाला म्हटल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल? चांगल्या स्थितीत ठेवलेली तुमची नखे तुम्ही आपखुषीने पुढे करून दाखवाल का? की ती लगेच पाठीमागे लपवाल? कदाचित नखे लपविण्यासारखे कारणही तुमच्यापाशी असेल. कदाचित, ते विद्रूप दिसत असतील किंवा मग तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय असेल. आपल्या नखांच्या आश्‍चर्यकारक रचनेचे ज्ञान, त्यांच्या मोलाची अधिक जाण राखण्यास आपली मदत करील व त्यांची उत्तम निगा घेण्यासही आपल्याला उत्तेजित करू शकेल.

तुमची नखे मुख्यतः, केराटिन नामक तंतुमय प्रथिन असलेल्या कठीण निर्जीव पेशींची बनलेली असतात. नखांची वाढ, बोटाबोटांत व व्यक्‍तीव्यक्‍तींत भिन्‍न असते. नखे दरमहा सरासरी, सुमारे ०.१२ इंच वाढतात. नखे केव्हाही कापली नाहीत तर ती बरीच वाढू शकतात. गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्‌र्स १९९८ यानुसार, भारतातील एका मनुष्याने आपल्या डाव्या हाताची पाच नखे एकूण २४१ इंच वाढवली. त्याच्या अंगठ्याचे नख ५५ इंच मोठे होते.

जटिल संरचना

पहिली नजर टाकताच तुम्हाला असे वाटेल जणू नख हे केवळ एक तुकडा अर्थात नखपट्टिका आहे. तुम्हाला कदाचित हे जाणून आश्‍चर्य वाटेल, की नखाचे प्रमुख असे अनेक सदृश्‍य आणि अदृश्‍य भाग असतात. नखांच्या संरचनेचा आपण अधिक जवळून अभ्यास करू या.

१. नखपट्टिका. ही कठीण संरचना असून त्यालाच आपण बहुधा नख म्हणतो. नखपट्टिकेचे दोन थर असतात, वरचा थर आणि खालचा थर. या दोन्ही भागांतील पेशींची मांडणी भिन्‍न स्वरूपाची असून त्यांची वाढही भिन्‍न गतीने होते. वरचा पृष्ठभाग मऊ असतो, तर आतल्या पृष्ठभागास समांतर रेषा असून नखाखालच्या त्वचेवर असणाऱ्‍या कडांना या रेषा अनुरूप असतात. प्रत्येक व्यक्‍तीतील या कडा अनोख्या असतात व ओळख पटण्यास त्या सहायक ठरू शकतात.

२. नखचंद्र. नखपट्टिकेच्या बुडाशी जी अर्धचंद्राकृती पांढरी जागा दिसते त्यास नखचंद्र म्हणतात. सगळ्यांच्याच नखांवरचे हे नखचंद्र दिसतेच असे नाही. नखपट्टिकेच्या मूळापाशी जीवित पेशी असलेल्या ज्या लहान जागेतून नखाची वाढ होते त्यास आधारद्रव्य म्हणतात. नख-संस्थेचा हा सर्वात प्रमुख भाग आहे. नखचंद्र, नख आधारद्रव्याचा शेवटचा भाग असल्यामुळेच जीवित नखाचा तो सदृश्‍य भाग होय. नखपट्टिकेचा उर्वरित भाग निर्जीव पेशींचा बनलेला असतो.

३. नख दुमड, समीपस्थ व बाजूचे. हे नखपट्टिकेच्या सभोवतालच्या त्वचेला उल्लेखित करते. या त्वचेस नख दुमड (नेल फोल्ड) असे म्हटले जाते कारण नखपट्टिकेपाशी तिचा शेवट होत नाही तर ती आतल्या बाजूला दुमडली जाते आणि वर येणाऱ्‍या नखपट्टिकेस झाकते. ही त्वचा दुमड, नखाच्या सभोवतालच्या जागांचे संरक्षण करते व त्यांना आधार देते.

४. एपोनिखियम. नखपट्टिकेच्या बुडापाशी शेवट होत असल्याचा भास होणारी त्वचेची सूक्ष्म पट्टी म्हणजेच एपोनिखियम. कधीकधी, त्याचा उल्लेख बाह्‍यत्वचा असाही केला जातो.

५. बाह्‍यत्वचा. एपोनिखियमच्या खाली थोडीशी वाढलेली त्वचा असते, जी खरी बाह्‍यत्वचा होय. पृष्ठीय नखपट्टिकेच्या पृष्ठभागास चिकटणाऱ्‍या व गळून पडणाऱ्‍या त्वचेचा हा रंगहीन थर होय.

६. मोकळे अग्र. बोटाच्या टोकापासून पुढे वाढणाऱ्‍या नखपट्टिकेच्या भागास मोकळे अग्र म्हणतात.

७. हायपोनिखियम. नखाच्या मोकळ्या अग्राच्या खाली आढळणारी ही ऊती नखाखालच्या त्वचेचे संसर्गापासून संरक्षण करणारे एक पाणबंद सील तयार करते.

त्यांचा उपयोग

आपली नखे, अनेक कारणांसाठी उपयोगी आहेत; उदाहरणार्थ खाजवण्यासाठी. तसेच संत्र सोलण्यासाठी, एखादी गाठ सोडण्यासाठी किंवा मग लहानसहान वस्तू हाताळण्यासाठी देखील ती अतिशय उपयुक्‍त आहेत. यांशिवाय, नखांमुळे बोटांच्या संवेदनशील आणि नाजूक टोकांना आधार व संरक्षण मिळते.

सौंदर्यामध्ये नखांनाही एक महत्त्वपूर्ण स्थान असते याकडे डोळेझाक करून कसे चालेल. आपली नखे टापटीपीच्या चांगल्या—अथवा वाईट सवयी प्रकट करतात. सर्वसामान्य हावभाव करण्यात ती महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात आणि त्यांची उत्तम काळजी घेतल्यास ती आपल्या हातांची शोभा वाढवू शकतात. त्यांच्याशिवाय, आपल्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आले असते आणि आपले हातही अपुरे-अपुरे वाटले असते.

योग्य काळजी घेतल्यास ती मजबूत होतात

आपल्या आश्‍चर्यकारक शरीराचे एक अंग म्हणून त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्‍यक आहे. तुम्हाला नखाचे काही गंभीर विकार जडले असल्यास डॉक्टरांना दाखवणे जरूरीचे आहे. खरे तर, तुमच्या बोटांच्या टोकांवर काही शारीरिक समस्येची चिन्हे आढळतील. होय, केवळ नखांना पाहून काही शारीरिक दुखण्यांचे निदान केले जाऊ शकते असेही म्हणतात.

अतिरिक्‍त प्रमाणात कॅल्शियम किंवा जीवनसत्वे घेतल्याने नखे मजबूत होतील का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना, नखांच्या विषयावर संशोधन करणारे स्टॉकहोम, स्वीडनच्या कारोलिनस्का संस्थेतील प्राध्यापक बो फॉर्सलिंड यांनी सावध राहा! नियतकालिकास सांगितले: “त्या दृष्टिकोनास पुष्टी देणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. सामान्य नखांमधील कॅल्शियमच्या अंशाचे परीक्षण केले तेव्हा, या घटकाचे केवळ अल्पांश आढळले.”

जी गोष्ट तुमच्या नखांना निश्‍चितार्थाने मजबूत व लवचीक ठेवण्यास साह्‍य करते ती म्हणजे, पाणी. आधी उल्लेखिल्याप्रमाणे, नखांमध्ये केराटीन असते. लवचीक राहण्यासाठी केराटीनच्या धाग्यांना पाण्याची गरज असते. प्राध्यापक फॉर्सलिंड एक उदाहरण देतात: “तुम्ही पहिल्यांदा तुमच्या नखाचा एखादा तुकडा कापून टाकता त्यावेळी तो लवचीक असेल पण कापलेला तोच तुकडा रातोरात शुष्क झाल्यामुळे अगदी सहज तुटेल.” ओलावा तुमच्या नखांना लवचीक व मजबूत ठेवू शकतो. पण हा ओलावा येतो कोठून? नखपट्टिका कठीण वाटत असली तरीही ती अनुप्रवेशनीय असते. नखाखालच्या त्वचेवरील आर्द्रता नखपट्टिकेतून पृष्ठभागावर येते आणि तेथे तिचे बाष्पीभवन होते. नखे शुष्क होऊ नयेत व ती मजबूत राहावीत यासाठी काय केले जाऊ शकते? प्राध्यापक फॉर्सलिंड म्हणतात: “नखांना दररोज तेलाने मालिश करणे फायदेकारक ठरेल.”

त्यांच्या वाढीची व शोभेची निगा

नखाची वाढ आधारद्रव्यातून होत असल्यामुळे नखाच्या या भागाची उचित काळजी घेणे आवश्‍यक आहे. क्रीम किंवा तेलाने नियमितपणे मालिश करून आधारद्रव्यास उत्तेजित केल्याने नखपट्टिकेला लाभ होऊ शकतो. या शिवाय, नखांच्या मोकळ्या अग्राखाली तेलाचा थेंब सोडणेही सहायक असू शकते कारण त्यामुळे नखे शुष्क होणार नाहीत.

तुम्ही ज्याप्रकारे नखांना आकार देता किंवा ती कापता त्यामुळे देखील ती मजबूत किंवा दुबळी होऊ शकतात. असा सल्ला दिला जातो, की नखांना आकार देताना कडांपासून आकार देत देत मध्ये यावे. कडा घासून टाकल्यास नख दुबळे होऊन जाईल हे लक्षात असू द्या. यामुळे नख टोकदार होईल आणि बाजूने त्यास कोणताही आधार नसल्यामुळे हा सर्वात दुबळा आकार सिद्ध होईल. मजबूत लहान नखांसाठी असा सल्ला दिला गेला आहे, की तुम्ही तुमची नखे बाजूंनी सुमारे १/१६ इंच सरळ वाढवावीत आणि मग तुमच्या बोटाच्या टोकाच्या आकारानुसार त्यास गोलाकार द्यावा.

काही स्त्रियांना आपली नखे आणखीन थोडीशी वाढवायला कदाचित आवडत असेल. पण, येथे एक इशारेवजा संदेश आहे. नखे फारच लांब असल्यास ती अनावश्‍यक लक्ष वेधून घेऊ शकतात, शिवाय सर्वसामान्य कामे करण्यात अडचण निर्माण करू शकतात. यास्तव, तुमची नखे किती लांब असावीत यासंबंधी एक संतुलित दृष्टिकोन बाळगा. असे केल्यास, तुमची नखे एक मोलवान ठेवा असू शकतील आणि इतरांवरही ती एक उत्तम छाप पाडतील.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कोणत्याही टोकदार साधनाने नखे कोरू नयेत. यामुळे नखाच्या मोकळ्या अग्राखाली असलेल्या हायपोनिखियमला, अर्थात ऊतीला हानी पोहंचू शकते. ही ऊती एक घट्ट सिल तयार करून खालून नखाचे संरक्षण करत असते. या जागेला धक्का पोहंचल्यास नखाखालच्या त्वचेपासून नख वेगळे होऊन संसर्ग होऊ शकतो. नखांखालची जागा स्वच्छ करण्यासाठी एखादा नरम ब्रश वापरा.

थोड्याफार प्रमाणात मजबूत आणि निरोगी नखे आनुवंशिकतेचा परिणाम असतात. म्हणूनच काही लोकांच्या नखपट्टिका मजबूत व लवचीक असतात तर इतरांच्या शुष्क असून सहज तुटतात. तुमची नखे कशीही असोत, सुमाराची व नियमित स्वरूपाची काळजी घेतल्याने तुम्ही त्यांचे स्वरूप बदलू शकता. नख-संस्थेची संरचना, कार्य आणि योग्य निगा समजून घेतल्याने हे सगळे उत्तम प्रकारे कसे करता येईल याची समजही तुम्हाला मिळेल. अशा माहितीचा डोळसपणे उपयोग केल्याने उत्तम परिणाम निष्पन्‍न होतील.

हाताची नखे खरोखरच मानवी शरीराचे एक चमत्कृत अंग आहे. त्यांची संरचना व कार्ये त्यांच्यामागे असणाऱ्‍या कल्पक बुद्धीची साक्ष देतात. प्राचीन काळच्या दावीद राजाने विनम्रपणे आपल्या निर्मात्याची प्रशंसा केली; स्तोत्र १३९:१४ येथे ती नमूद केलेली आहे: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”

[Diagram on page 23]

(For fully formatted text, see publication)

१. नखपट्टिका;

२. नखचंद्र;

३. नख दुमड, समिपस्थ व बाजूचे;

४. एपोनिखियम;

५. बाह्‍यत्वचा;

६. मोकळे अग्र;

७. हायपोनिखियम;

८. आधारद्रव्य;

९. नखाखालची त्वचा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा