तुम्ही अमेरिकेतील पंथ आहात का?
आमचे जागतिक मुख्यालय अमेरिकेत आहे, पण आम्ही अमेरिकेतील कुठल्याही पंथाचे नाही कारण:
काहींच्या मते, पंथ म्हणजे एका प्रस्थापित धर्मापासून वेगळा झालेला गट. पण, यहोवाचे साक्षीदार कोणत्याही धार्मिक गटातून वेगळे झालेले नाहीत. याउलट आम्हाला असे वाटते, की आम्ही पहिल्या शतकात अस्तित्वात असलेल्या ख्रिस्ती धर्माची पुनःस्थापना केली आहे.
यहोवाचे साक्षीदार जगभरात २३० पेक्षा अधिक देशांत आणि राष्ट्रांत आवेशाने आपले ख्रिस्ती सेवाकार्य करत आहेत. जगाच्या पाठीवर आम्ही कोठेही राहत असलो, तरी आमच्या जीवनात आम्ही यहोवा देवाला व येशू ख्रिस्ताला प्रथम स्थानी ठेवतो; अमेरिकी सरकारला किंवा इतर कोणत्याही मानवी सरकारला नव्हे.—योहान १५:१९; १७:१५, १६.
आमच्या सर्व शिकवणी बायबलवर आधारित आहेत; अमेरिकेतील कोणत्याही धर्मगुरूच्या लिखाणांवर त्या आधारित नाहीत.—१ थेस्सलनीकाकर २:१३.
आम्ही केवळ येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतो, कोणत्याही मानवी पुढाऱ्याचे नव्हे.—मत्तय २३:८-१०.