अभ्यासासाठी टीप
वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .
तुमचं एखादं आवडीचं वचन आहे का? त्या वचनामुळे तुम्हाला कदाचित सांत्वन मिळत असेल, वाईट विचारांवर मात करता येत असेल किंवा ते एखाद्याला पाठवावंसं वाटत असेल. (स्तो. ११९:११, १११) पण असं कधी झालंय का, की नेमक्या वेळी तुम्हाला ते वचनच आठवत नाही? खाली दिलेल्या मार्गांमुळे तुम्हाला वचनं लक्षात ठेवायला मदत होऊ शकते.
JW लायब्ररी ॲपचा वापर करा. JW लायब्ररीवर बायबल वाचत असताना तुम्हाला एखादं वचन आवडलं, तर ते आठवणीत ठेवण्यासाठी टॅगचा वापर करून ते सेव (save) करा. म्हणजे तुम्हाला ते नंतर सहज सापडेल.
सहज दिसेल अशा ठिकाणी ते वचन लावून ठेवा. तुम्हाला जे वचन लक्षात ठेवायचंय ते कागदावर लिहा आणि तो कागद सहज दिसेल अशा ठिकाणी चिकटवा. काही जण तो आरशावर लावतात किंवा फ्रिजच्या दारावर लावतात. असेही काही जण आहेत जे त्यांच्या आवडत्या वचनाचा फोटो काढून तो फोनचा किंवा कंप्युटरचा वॉलपेपर म्हणून ठेवतात.
फ्लॅश कार्ड बनवा. कार्डच्या एका बाजूला वचन लिहा आणि दुसऱ्या बाजूला त्या वचनात काय म्हटलंय ते लिहा. वचन लिहिलेली बाजू पाहून वचनात काय लिहिलंय ते आठवायचा प्रयत्न करा किंवा दुसरी बाजू पाहून वचन आठवायचा प्रयत्न करा.