वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 मार्च पृ. ३२
  • आरशाचा चांगला वापर करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आरशाचा चांगला वापर करा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • मी कशी दिसते यावर मी इतका का विचार करते?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • तुमच्या स्वरूपाकडे एक नजर
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • यहोवाला हवं तसं मी बनेन!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 मार्च पृ. ३२

अभ्यासासाठी टीप

आरशाचा चांगला वापर करा!

याकोबने बायबलची तुलना आरशासोबत केली. या आरशामुळे आपल्याला आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे समजतं. (याको. १:२२-२५) मग आपण बायबलचा आरशासारखा वापर कसा करू शकतो?

लक्ष देऊन वाचा. आपण जर आरशात फक्‍त वरवर पाहिलं, तर एखादा डाग आपल्याला दिसणार नाही. त्याच प्रकारे आपण जर बायबल घाईघाईत वाचलं, तर आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आपल्यातल्या ज्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत त्या आपल्याला बदलता येणार नाहीत. म्हणून आपण देवाचं वचन लक्ष देऊन वाचलं पाहिजे.

इतरांपेक्षा स्वतःकडे जास्त लक्ष द्या. आपण जर आरसा तिरका पकडला, तर आपल्याला आपले नाही तर दुसऱ्‍यांचे दोष दिसतील. त्याच प्रकारे, आपण जेव्हा बायबल वाचू तेव्हा कदाचित आपल्याला इतरांचे दोष दिसतील. पण जर आपण असं केलं तर आपल्याला आपले दोष सुधारता येणार नाहीत.

समजूतदारपणा दाखवा. आपण जर आपल्या दोषांकडे जास्त लक्ष दिलं तर आपण निराश होऊ शकतो. त्यामुळे बायबल वाचताना आपण समजूतदारपणा दाखवू शकतो. यहोवा आपल्याकडून जी अपेक्षा करतो, त्यापेक्षा जास्त अपेक्षा आपण स्वतःकडून करणार नाही.—याको. ३:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा