अभ्यासासाठी विषय
विश्वासू लोक दिलेलं वचन पाळतात
शास्ते ११:३०-४० वाचा. मग इफ्ताह आणि त्याच्या मुलीने यहोवाला दिलेलं वचन कसं पाळलं हे जाणून घ्या.
संदर्भ लक्षात घ्या. विश्वासू इस्राएली लोक यहोवाला दिलेल्या वचनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे? (गण. ३०:२) इफ्ताह आणि त्याच्या मुलीने यहोवावर विश्वास असल्याचं कसं दाखवलं?—शास्ते ११:९-११, १९-२४, ३६.
सखोल संशोधन करा. इफ्ताहने यहोवाला कोणतं वचन दिलं आणि ते वचन देऊन त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (टेहळणी बुरूज१६.०४ ७ ¶१२) दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी इफ्ताह आणि त्याच्या मुलीने कोणते त्याग केले? (टेहळणी बुरूज१६.०४ ८-९ ¶१४-१६) आज आपण यहोवाला कोणती वचनं देतो?—टेहळणी बुरूज१७.०४ ५-८ ¶१०-१९.
तुम्हाला काय शिकायला मिळतंय यावर विचार करा. स्वतःला विचारा:
‘समर्पणाचं वचन पाळत राहण्यासाठी मला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?’ (टेहळणी बुरूज२०.०३ १३ ¶२०)
‘यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करायला मला कोणते त्याग करता येतील?’
‘लग्नाच्या वेळी माझ्या जोडीदाराला दिलेलं वचन पाळत राहायला मला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?’ (मत्त. १९:५, ६; इफिस. ५:२८-३३)