वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 ऑगस्ट पृ. ७
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 ऑगस्ट पृ. ७

वाचकांचे प्रश्‍न

२ थेस्सलनीकाकर ३:१४ मध्ये लक्ष ठेवण्याबद्दल जे सांगितलंय ते कोण करतं? मंडळीतले वडील की भाऊबहीण?

प्रेषित पौलने थेस्सलनीकामधल्या ख्रिश्‍चनांना सांगितलं: “या पत्राद्वारे आम्ही जे सांगितलं त्याचं जर कोणी पालन करत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा.” (२ थेस्सलनी. ३:१४) आधी आपण असं म्हणायचो, की या वचनात दिलेला सल्ला वडिलांसाठी आहे. जर एखादी व्यक्‍ती वारंवार सल्ला दिल्यानंतरसुद्धा बायबलच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करत असेल, तर दुसऱ्‍यांना सावध करण्यासाठी वडील एक भाषण द्यायची व्यवस्था करायचे. त्यानंतर मंडळीतले भाऊबहीण त्या व्यक्‍तीसोबत ऊठबस करायचं सोडून द्यायचे.

पण आता आपल्याला ही समज सुधारण्याची गरज आहे. कारण आपल्याला समजलंय, की पौलने दिलेला हा सल्ला मंडळीतल्या भाऊबहिणींसाठी होता. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांना हा निर्णय घ्यायचा होता. म्हणून इतरांना सावध करण्यासाठी आता वडिलांना भाषण द्यायची गरज नाही. हा बदल का करण्यात आला? हा सल्ला देताना प्रेषित पौल नेमकं कशाबद्दल बोलत होता हे आता आपण पाहू.

पौलने सांगितलं, की मंडळीतले काही जण “अव्यवस्थितपणे” वागत होते. त्यांना देवाच्या प्रेरणेने जो सल्ला देण्यात आला होता, त्याचा ते अनादर करत होते. पौलच्या आधीच्या भेटीत त्याने त्यांना असं सांगितलं होतं: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.” तरी काही जण, काम करायची क्षमता असूनसुद्धा स्वतःचा खर्च भागवायला काम करत नव्हते. इतकंच नाही, तर ते इतरांच्या कामात लुडबुड करत होते. मग अशा प्रकारे अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यांशी इतर भाऊबहिणींना कसं वागायचं होतं?—२ थेस्सलनी. ३:६, १०-१२.

अशा अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यांबद्दल पौलने म्हटलं: त्यांच्यावर “लक्ष ठेवा.” यासाठी मूळ भाषेत वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दातून कळतं, की अशा व्यक्‍तीला भाऊबहिणींनी ओळखायचं होतं आणि त्याचा वाईट प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून सावध राहायचं होतं. पौलने हा सल्ला फक्‍त वडिलांनाच नाही, तर संपूर्ण मंडळीला दिला होता. (२ थेस्सलनी. १:१; ३:६) म्हणून एखादा जाणूनबुजून देवाची तत्त्वं मोडतोय असं जर काही भाऊबहिणींना दिसलं, तर ते त्या अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍यासोबत ‘उठणं-बसणं सोडून द्यायचं’ ठरवू शकतात.

ज्याला मंडळीतून काढून टाकलं जातं, त्याच्याशी आपण जसं वागतो, तसंच या व्यक्‍तीसोबतही वागावं, असा याचा अर्थ होतो का? नाही. पौलने म्हटलं: “आपला बांधव म्हणून त्याला समजावत राहा.” म्हणून एखादा ख्रिस्ती अजूनही त्याच्यासोबत सभांमध्ये बोलेल आणि त्याच्यासोबत प्रचारकार्य करेल. पण जेव्हा तो ख्रिस्ती इतर भाऊबहिणींसोबत वेळ घालवेल किंवा करमणूक करेल, तेव्हा कदाचित तो या भावाला किंवा बहिणीला न बोलवायचं निवडेल. का बरं? कारण पौलने म्हटलं: “त्याला लाज वाटावी म्हणून.” अशा प्रकारे त्याच्यावर लक्ष ठेवल्यामुळे कदाचित त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटेल आणि तो त्याचे चुकीचे मार्ग बदलेल.—२ थेस्सलनी. ३:१४, १५.

मग पौलचा हा सल्ला आज आपण कसा लागू करू शकतो? सगळ्यात आधी आपण याची खातरी केली पाहिजे, की एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं वागणं पौलने सांगितल्याप्रमाणे खरंच “अव्यवस्थित” आहे की नाही. पौल इथे अशा भाऊबहिणींबद्दल बोलत नव्हता, जे आपल्या विवेकाप्रमाणे किंवा वैयक्‍तिक आवडीनिवडींप्रमाणे आपल्यापेक्षा वेगळा निर्णय घेतात. तसंच, तो अशा भाऊबहिणींबद्दलही बोलत नव्हता, जे आपल्या भावना दुखावतात. तर, तो अशा भाऊबहिणींबद्दल बोलत होता जे मुद्दामहून देवाने दिलेले स्पष्ट सल्ले मोडतात.

आज जर आपल्या लक्षात आलं, की एखादा भाऊ किंवा बहीण देवाच्या आज्ञा सतत मोडतa आहे, तर त्याच्यासोबत इतर वेळी किंवा करमणुकीच्या वेळी आपण वेळ न घालवण्याचा निर्णय घेऊ. हा एक वैयक्‍तिक निर्णय असल्यामुळे आपण याबद्दल आपल्या घरातल्या लोकांशिवाय इतर कोणालाही सांगणार नाही. पण आपण सभांमध्ये किंवा प्रचारात त्या भावासोबत किंवा त्या बहिणीसोबत वेळ घालवू. पुढे जेव्हा तो त्याचा मार्ग बदलेल, तेव्हा आपण पुन्हा त्याच्यासोबत आधीसारखंच ऊठबस करू.

a उदाहरणार्थ, एखादा भाऊ किंवा बहीण स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी काम करायचं टाळेल, कदाचित बाहेरच्या व्यक्‍तीसोबत डेटींग करेल किंवा कदाचित फुटी पाडणाऱ्‍या, इतरांची बदनामी करणाऱ्‍या गोष्टी पसरवेल किंवा चहाड्या करेल. (१ करिंथ. ७:३९; २ करिंथ. ६:१४; २ थेस्सलनी. ३:११, १२; १ तीम. ५:१३) अशी कामं करत राहणाऱ्‍यांना “अव्यवस्थितपणे वागणारे” म्हणता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा