वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 मार्च पृ. ३२
  • खंडणीच्या आधी पापांची क्षमा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणीच्या आधी पापांची क्षमा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • येशूच्या बलिदानामुळे ‘बऱ्‍याच जणांसाठी’ खंडणी कशी देण्यात आली?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 मार्च पृ. ३२

बायबलमधले वाक्यांश

खंडणीच्या आधी पापांची क्षमा

येशूने आपल्या रक्‍ताद्वारे जे खंडणी बलिदान दिलं, त्याच्या आधारावरच आपल्याला पापांची क्षमा होऊ शकते. (इफिस. १:७) तरीसुद्धा बायबल म्हणतं, की देवाने “पूर्वीच्या काळात घडलेल्या पापांची धीराने क्षमा”  केली. म्हणजे येशूने खंडणी देण्याआधीच  देवाने पापांची क्षमा केली. (रोम. ३:२५) पण यहोवा हे कसं करू शकत होता? आणि असं करणं त्याच्या न्यायिक स्तरांनुसार होतं का?

यहोवाने अशी भविष्यवाणी केली, की तो एक “संतती” पुरवेल आणि विश्‍वासू मानवांना वाचवण्यासाठी ही संतती खंडणी देईल. तेव्हा ही खंडणी जणू यहोवाच्या दृष्टिकोनातून तेव्हाच दिल्यासारखी होती. (उत्प. ३:१५; २२:१८) कारण यहोवाला या गोष्टीची पूर्ण खातरी होती, की पुढे त्याचा एकुलता एक मुलगा योग्य वेळ आल्यावर स्वतःहून त्याचं जीवन खंडणी म्हणून देईल. (गलती. ४:४; इब्री १०:७-१०) देवाचा प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर असताना खंडणी पुरवण्याआधीच येशूकडे एखाद्याच्या पापांची क्षमा करायचा अधिकार होता. अशा प्रकारे त्याने पुढे देण्यात येणाऱ्‍या बलिदानाचे फायदे विश्‍वासू लोकांना आधीच होऊ दिले.​—मत्त. ९:२-६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा