वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp22 क्र. १ पृ. ३
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • लवकरच द्वेष कायमचा संपेल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
wp22 क्र. १ पृ. ३
कोलाज: आपला किती द्वेष केला जातोय यावर विचार करून एक माणूस खूप चिंतेत आणि त्रासात आहे. १. हातात फोन असलेली स्त्री त्या माणसाची काहीच किंमत नाहीए असं दाखवतीए. २. आणखी एक स्त्री त्याच्याकडे खालच्या नजरेने बघतीए. ३. पेपर वाचणारा माणूस त्याच्याकडे तिरस्काराने बघतोय. ४. एक व्यक्‍ती टिव्हीवर बातम्या देतोय.

आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!

तुमचा कधी द्वेष करण्यात आला आहे का?

कदाचित नसेल. पण तुम्ही इतरांना कोणत्या न्‌ कोणत्या मार्गाने द्वेष व्यक्‍त करताना पाहिलं असेल. कारण सहसा बातम्यांमध्ये आपल्याला हेच पाहायला आणि ऐकायला मिळतं, की वेगळ्या देशातून असल्यामुळे, वेगळ्या वर्णाचे असल्यामुळे, समलैंगिक असल्यामुळे किंवा वेगळ्या जातीचे असल्यामुळे लोकांचा द्वेष केला जातो. आणि म्हणूनच, बऱ्‍याच देशातली सरकारंसुद्धा आज याबाबतीत बरेच कायदे लागू करायचा प्रयत्न करत आहेत.

खरंतर, द्वेषामुळे द्वेष वाढतो. द्वेषाला बळी पडलेले लोक सहसा इतरांचा बदला घ्यायचा प्रयत्न करतात आणि अशाप्रकारे हे चक्र चालूच राहतं.

तुम्ही कदाचित काही गोष्टी अनुभवल्या असतील. कदाचित तुमच्याबद्दल गैरसमज झाला असेल, तुमचा अपमान, थट्टा किंवा निंदा करण्यात आली असेल किंवा मग तुम्हाला धमक्याही देण्यात आल्या असतील. पण द्वेषामुळे यापेक्षाही जास्त भयानक गोष्टी घडतात. जसं की, आक्रमक होऊन केलेली क्रूर कृत्यं, गुंडगिरी, दंगली, छळ, बलात्कार, खून आणि इतकचं नाही तर कधीकधी जातिसंहारही केला जातो.

या मासिकात आपल्याला पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील आणि त्यामुळे आपल्याला समजेल, की आपण द्वेषावर विजय कसा मिळवू शकतो.

  • लोक एकमेकांचा द्वेष का करतात?

  • द्वेषाचं चक्र आपण कसं थांबवू शकतो?

  • लोक एकमेकांचा द्वेष करणार नाहीत अशी वेळ कधी येईल का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा