वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w20 सप्टेंबर पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाचे शांतीचे सरकार
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवाला एकनिष्ठ राहणारे लोक आनंदी असतात!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • अधिकार पदावर असलेल्यांच्या अधीन का असावे?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
w20 सप्टेंबर पृ. ३१
असं दाखवण्यात आलं आहे, की यहोवा एक पाचूच्या राजासनावर बसलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती अनेक देवदूत आहेत. राजासन तेजस्वी प्रकाशाने वेढलेलं आहे.

वाचकांचे प्रश्‍न

उपदेशक ५:८ या वचनात कोणाबद्दल सांगितलं आहे, मानवी अधिकाऱ्‍यांबद्दल की यहोवाबद्दल?

या वचनात असं म्हटलं आहे: “एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.”—उप. ५:८.

या वचनात, मानवी सरकारात जे अधिकाराच्या पदावर आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. पण या वचनावर खोलवर विचार केल्यामुळे यहोवाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि ती जाणून घेतल्यामुळे आपल्याला खूप सांत्वन आणि दिलासा मिळतो.

उपदेशक ५:८ या वचनामध्ये अशा एका अधिकाऱ्‍याबद्दल सांगितलं आहे, जो गरिबांवर जुलूम आणि अन्याय करतो. पण त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍याची त्याच्यावर नजर आहे. आणि या मोठ्या अधिकाऱ्‍यावरही आणखी बरेच मोठे अधिकारी आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मानवी सरकारात असलेले हे सगळे अधिकारी भ्रष्ट असू शकतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना खूप काही सोसावं लागू शकतं.

पण परिस्थिती कितीही वाईट वाटत असली तरी एक गोष्ट जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो. ती म्हणजे, मानवी सरकारात मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्‍यांवरही यहोवाची नजर असते. त्यामुळे आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो आणि आपला भार त्याच्यावर टाकू शकतो. (स्तो. ५५:२२; फिलिप्पै. ४:६, ७) तसंच, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो.”—२ इति. १६:९.

शेवटी, उपदेशक ५:८ या वचनातून आपल्याला काय कळतं? हेच, की मानवी सरकारात प्रत्येक अधिकाऱ्‍यावर नेहमी एक मोठा अधिकारी असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वचनातून यहोवाबद्दल एक मुख्य गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे, यहोवा सर्वोच्च अधिकारी आहे. त्याच्यावर कोणताही मोठा अधिकारी नाही. आज तो त्याच्या मुलाद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे राज्य करत आहे. यहोवा सर्वशक्‍तिशाली देव आहे आणि तो सगळं काही पाहू शकतो. त्याची नजर सगळ्यांवर आहे. तो न्यायी आहे. आणि त्याचा मुलगाही तितकाच न्यायी आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा