वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w20 मे पृ. ८-११
  • अंताच्या समयी लढणारे दोन राजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंताच्या समयी लढणारे दोन राजे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • अंताच्या समयी “उत्तरेचा राजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • आज “उत्तरेचा राजा” कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • जागतिक साम्राज्यांची दीर्घ वाटचाल आता संपण्याच्या बेतात आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
w20 मे पृ. ८-११

अंताच्या समयी लढणारे दोन राजे

या तक्त्यात दिलेल्या काही भविष्यवाण्यांमधल्या घटना एकाच वेळी पूर्ण झाल्या आहेत. या सर्व भविष्यवाण्यांवरून आपल्याला खातरी पटते की आपण ‘अंताच्या समयी’ जगत आहोत.—दानी. १२:४.

१८७० पासून आजपर्यंत उत्तरेच्या राजाबद्दलच्या आणि दक्षिणेच्या राजाबद्दलच्या भविष्यवाण्या आणि या भूमिका कोणी बजावल्या हे दाखवणारा तक्‍ता
  • पहिल्या तक्त्यात, अंताच्या समयी एकाच वेळी पूर्ण होणाऱ्‍या काही भविष्यवाण्या दाखवल्या आहेत. आणि या १८७० पासून १९१८ पर्यंतच्या काळादरम्यान पूर्ण झाल्या. १९१४ पासून पुढच्या वर्षांना अंताचा समय म्हटलं आहे. भविष्यवाणी १: सात डोकी असलेला जंगली पशू, तक्त्यात दाखवलेल्या सगळ्यात पहिल्या वर्षाच्या आधी दाखवला आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी, या पशूच्या सातव्या डोक्याला जखम होते. १९१७ पासून पुढे सातव्या डोक्याची जखम भरून येते आणि तो पशू बरा होतो. भविष्यवाणी २: उत्तरेचा राजा कोण हे १८७१ पासून आणि दक्षिणेचा राजा कोण हे १८७० पासून स्पष्ट होऊ लागलं. १८७१ मध्ये उत्तरेचा राजा जर्मनीच्या रूपात पुन्हा समोर येतो. सुरुवातीला ग्रेट ब्रिटन हा दक्षिणेचा राजा होता, पण १९१७ मध्ये ब्रिटन-अमेरिका महासत्तेने त्याची जागा घेतली. भविष्यवाणी ३: १८७० च्या दशकापासून पुढे चार्ल्स टी. रस्सल आणि त्यांचे साथीदार ‘निरोप्या’ असल्याचं स्पष्ट झालं. १८८० च्या दशकाच्या सुरुवातीला, ‘झायन्स वॉच टावरने’ आपल्या वाचकांना प्रचाराचं काम करण्याचं प्रोत्साहन दिलं. भविष्यवाणी ४: १९१४ पासून कापणीचा काळ सुरू झाला. गव्हापासून जंगली गवत वेगळं करण्यात येतं. भविष्यवाणी ५: १९१७ पासून, लोखंडाची आणि मातीची पावलं कोण हे कळतं. तक्त्यात हेसुद्धा दाखवण्यात आलं आहे: १९१४ पासून १९१८ पर्यंत जगभरात घडलेल्या घटना, पहिलं महायुद्ध. यहोवाच्या लोकांच्या छळाच्या घटना: १९१४ पासून १९१८ पर्यंत, ब्रिटन आणि जर्मनी इथल्या बायबल विद्यार्थ्यांना तुरुंगात टाकलं जातं. १९१८ मध्ये, अमेरिकेतल्या मुख्यालयात असलेल्या बांधवांना तुरुंगात टाकलं जातं.
    भविष्यवाणी १.

    वचनं प्रकटी. ११:७; १२:१३, १७; १३:१-८, १२

    भविष्यवाणी ‘जंगली पशूने’ अनेक शतकं पृथ्वीवर राज्य केलं आहे. अंताच्या समयी त्याच्या सातव्या डोक्याला जखम होते. पण नंतर ती जखम बरी होते आणि “सगळे जग” त्या जंगली पशूमागे जाते. “जे उरले आहेत . . . त्यांच्यासोबत युद्ध करायला” सैतान या पशूचा वापर करतो.

    पूर्णता जलप्रलयानंतर यहोवाच्या विरोधात असलेल्या सरकारांनी लोकांवर राज्य केलं आहे. अनेक शतकानंतर, या सरकारांपैकी एक असलेलं ब्रिटन सरकार पहिल्या महायुद्धादरम्यान कमजोर झालं. पुढे अमेरिकेसोबत मैत्री केल्यानंतर ब्रिटन पुन्हा ताकदवान बनलं. खासकरून अंताच्या समयी देवाच्या सेवकांचा छळ करण्यासाठी सैतान पृथ्वीवरच्या सर्व सरकारांचा वापर करत आहे.

  • भविष्यवाणी २.

    वचनं दानी. ११:२५-४५

    भविष्यवाणी अंताच्या समयी एकमेकांपेक्षा वरचढ होण्यासाठी उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा हे आपसात लढतात.

    पूर्णता जर्मनीने ब्रिटन आणि अमेरिकेसोबत युद्ध लढलं. १९४५ मध्ये सोव्हियत संघ आणि त्याचे मित्र राष्ट्रं हे उत्तरेचा राजा बनले. मग १९९१ मध्ये सोव्हियत संघ कोसळला. त्यानंतर रशिया व त्याचे मित्र राष्ट्रं हे उत्तरेचा राजा बनले.

  • भविष्यवाणी ३.

    वचनं यश. ६१:१; मला. ३:१; लूक ४:१८

    भविष्यवाणी मसीही राज्य स्थापित होण्याआधी यहोवा “मार्ग तयार करण्यासाठी” त्याचा “निरोप्या” पाठवतो. हा निरोप्या किंवा गट “दीनांस शुभवृत्त” सांगायला सुरुवात करतो.

    पूर्णता १८७० पासून बंधू रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी बायबलचा खोलवर अभ्यास करायला सुरुवात केली. बायबल नेमकं काय शिकवतं हे त्यांना माहीत करून घ्यायचं होतं. मग १८८१ मध्ये त्यांना जाणीव झाली की देवाच्या सेवकांनी प्रचार करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी ‘१,००० प्रचारक हवेत’ आणि ‘प्रचार करण्यासाठी अभिषिक्‍त’ असे लेख प्रकाशित केले.

  • भविष्यवाणी ४.

    वचनं मत्त. १३:२४-३०, ३६-४३

    भविष्यवाणी एक शत्रू गव्हाच्या शेतात जंगली गवताचं बी पेरतो. दोघांना सोबत वाढू दिलं जातं. जंगली गवतामुळे गहू कमी दिसू लागतात. पण नंतर कापणीच्या वेळी जंगली गवताला गव्हापासून वेगळं करण्यात येतं.

    पूर्णता खरे ख्रिस्ती आणि खोटे ख्रिस्ती यांमधला फरक १८७० पासून स्पष्ट होऊ लागला. अंताच्या समयी खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खोट्या ख्रिश्‍चनांपासून वेगळं करण्यात येईल आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मंडळीत आणलं जाईल.

  • भविष्यवाणी ५.

    वचनं दानी. २:३१-३३, ४१-४३

    भविष्यवाणी वेगवेगळ्या धातूंनी बनलेल्या पुतळ्याची पावलं लोखंडाची आणि मातीची बनली आहेत.

    पूर्णता माती ही ब्रिटन-अमेरिका महासत्ता राज्य करत असलेल्या सामान्य जनतेला सूचित करते. हे लोक सरकाराच्या विरोधात बंड करतात. या लोकांमुळे लोखंडाची ताकद कमी होते, म्हणजेच ब्रिटन-अमेरिका महासत्ता आपली ताकद पूर्णपणे वापरू शकत नाही.

  • दुसऱ्‍या तक्त्यात, अंताच्या समयी एकाच वेळी पूर्ण होणाऱ्‍या काही भविष्यवाण्या दाखवल्या आहेत. आणि या १९१९ पासून १९४५ पर्यंतच्या काळादरम्यान पूर्ण झाल्या. १९४५ पर्यंत, जर्मनी उत्तरेचा राजा होता. तर ब्रिटन-अमेरिका महासत्ता दक्षिणेचा राजा बनला. भविष्यवाणी ६. १९१९ मध्ये, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पुन्हा स्थापन केलेल्या मंडळीत एकत्र करण्यात येतं. १९१९ पासून, मोठ्या प्रमाणात प्रचाराचं कार्य सुरू होतं आणि ते पुढे चालू राहतं. भविष्यवाणी ७: १९२० मध्ये, राष्ट्रं संघाची स्थापना होते आणि दुसऱ्‍या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत तो अस्तित्वात राहतो. तक्त्यात हेसुद्धा दाखवण्यात आलं आहे: भविष्यवाणी १, सात डोकी असलेला जंगली पशू; अजूनही अस्तित्वात आहे. भविष्यवाणी ५, लोखंडाची आणि मातीची पावलं; अजूनही अस्तित्वात आहे. १९३९ पासून १९४५ पर्यंत जगात घडलेल्या घटना, दुसरं महायुद्ध. यहोवाच्या लोकांच्या छळाच्या घटना: जर्मनीमध्ये १९३३ पासून १९४५ पर्यंत, ११,००० हून अधिक साक्षीदारांना तुरुंगात टाकण्यात आलं. ब्रिटनमध्ये सन १९३९ पासून १९४५ पर्यंत, जवळजवळ १,६०० साक्षीदारांना तुरुंगात टाकलं जातं. अमेरिकेत १९४० पासून १९४४ पर्यंत, साक्षीदारांवर २,५०० पेक्षा जास्त वेळा जमावाने हल्ले केले.
    भविष्यवाणी ६.

    वचनं मत्त. १३:३०; २४:१४, ४५; २८:१९, २०

    भविष्यवाणी “गहू” “कोठारांत जमा” केलं जातं. “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांना ‘सेवकांवर’ नेमलं जातं. ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ “सर्व जगात घोषित” करायला सुरुवात होते.

    पूर्णता १९१९ मध्ये विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला देवाच्या लोकांवर नेमण्यात येतं. तेव्हापासून, बायबल विद्यार्थी जास्तीत जास्त प्रचार करायला सुरू करतात. आज यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रचार करत आहेत आणि १,००० पेक्षा जास्त भाषेत बायबलवर आधारित साहित्यं प्रकाशित करत आहेत.

  • भविष्यवाणी ७.

    वचनं दानी. १२:११; प्रकटी. १३:११, १४, १५

    भविष्यवाणी दोन शिंगं असलेला जंगली पशू पृथ्वीवरच्या लोकांना, सात डोकी असलेल्या “जंगली पशूची मूर्ती” बनवायला सांगतो आणि त्या मूर्तीमध्ये “श्‍वास” फुंकतो.

    पूर्णता ब्रिटन-अमेरिका महासत्ता पुढाकार घेऊन लीग ऑफ नेशन्स म्हणजे राष्ट्र संघ बनवते. पुढे दुसरी राष्ट्रंही या संघाला पाठिंबा देतात. मग कालांतराने उत्तरेचा राजा हासुद्धा या संघाला पाठिंबा देतो, पण ते फक्‍त १९२६ पासून ते १९३३ पर्यंतच. लोकांना वाटत होतं की राष्ट्रं संघ जगात शांती आणेल, पण हे फक्‍त देवाचं राज्यच आणू शकतं. आज संयुक्‍त राष्ट्र संघाबद्दलही लोक असाच विचार करतात.

  • तिसऱ्‍या तक्त्यात, अंताच्या समयी एकाच वेळी पूर्ण होणाऱ्‍या काही भविष्यवाण्या दाखवल्या आहेत. आणि या १९४५ पासून १९९१ पर्यंतच्या काळादरम्यान पूर्ण झाल्या. १९९१ पर्यंत, सोव्हियत संघ आणि त्याचे मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा होता. आणि त्यानंतर रशिया व त्याचे मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा बनला. ब्रिटन-अमेरिका महासत्ता हा दक्षिणेचा राजा बनला. भविष्यवाणी ८: अणूबॉम्बमुळे एकाएकी उठलेला धुराचा लोट, धुराचा हा लोट ब्रिटन-अमेरिका महासत्तेने घडवून आणलेल्या विध्वंसाला सूचित करतो. भविष्यवाणी ९. १९४५ मध्ये, राष्ट्रं संघाच्या जागी संयुक्‍त राष्ट्र संघाची स्थापना होते. तक्त्यात हेसुद्धा दाखवलं आहे: भविष्यवाणी १, सात डोकी असलेला जंगली पशू; अजूनही अस्तित्वात आहे. भविष्यवाणी ५, लोखंडाची आणि मातीची पावलं; अजूनही अस्तित्वात आहे. भविष्यवाणी ६, १९४५ मध्ये प्रचारकांची संख्या १,५६,००० हून अधिक. १९९१ मध्ये, प्रचारकांची संख्या ४२,७८,००० हून अधिक. यहोवाच्या लोकांच्या छळाच्या घटना: १९४५ पासून १९५० च्या दशकापर्यंत सोव्हियत संघात, हजारो साक्षीदारांना हद्दपार करून साइबीरियात पाठवण्यात आलं.
    भविष्यवाणी ८.

    वचनं दानी. ८:२३, २४

    भविष्यवाणी एक क्रूर राजा “विलक्षण नाश” आणतो.

    पूर्णता ब्रिटन-अमेरिका महासत्ता हिने खूप लोकांना मारून टाकलं आणि भरपूर नुकसान केलं. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धात अमेरिकेने त्याच्या व ब्रिटनच्या शत्रूवर दोन अणूबॉम्ब टाकले. यामुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव गेला आणि नुकसानही झालं.

  • भविष्यवाणी ९.

    वचनं दानी. ११:३१; प्रकटी. १७:३, ७-११

    भविष्यवाणी दहा शिंग असलेला “गडद लाल” रंगाचा एक जंगली पशू अथांग डोहातून बाहेर येतो. तो आठवा राजा आहे. दानीएलच्या पुस्तकात या राजाला “विध्वंसमूलक अमंगलाची” म्हणजेच उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट म्हटलं आहे.

    पूर्णता दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान राष्ट्र संघ निष्क्रिय झाला. मग युद्धानंतर संयुक्‍त राष्ट्र संघाची “स्थापना” झाली. राष्ट्र संघासारखं संयुक्‍त राष्ट्र संघही जगभरात शांती आणेल असं लोकांना वाटलं, पण खरंतर देवाचं राज्यच जगभरात शांती आणू शकतं. संयुक्‍त राष्ट्र संघ धर्मांवर हल्ला करेल.

  • चौथा तक्‍ता, अंताच्या समयी एकाच वेळी पूर्ण होणाऱ्‍या काही भविष्यवाण्या दाखवल्या आहेत. आणि या आजपासून हर्मगिदोनपर्यंतच्या आहेत. रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा आहे. ब्रिटन-अमेरिका महासत्ता दक्षिणेचा राजा आहे. भविष्यवाणी १०: जगातले मोठमोठे अधिकारी ‘शांती आणि सुरक्षेची’ घोषणा करतात. त्यानंतर, मोठं संकट सुरू होतं. भविष्यवाणी ११: राष्ट्रं खोट्या धार्मिक संस्थांवर हल्ला करतात. भविष्यवाणी १२: जगातली सरकारं देवाच्या लोकांवर हल्ला करतात. उरलेल्या अभिषिक्‍त जनांना स्वर्गात घेतलं जातं. भविष्यवाणी १३: हर्मगिदोन. पांढऱ्‍या घोड्यावर बसलेला स्वार आपला विजय पूर्ण करतो. सात डोकी असलेल्या जंगली पशूचा नाश केला जातो; भल्या मोठ्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांचा चुराडा केला जातो. तक्त्यात हेही दाखवण्यात आलं आहे: भविष्यवाणी १, सात डोकी असलेला जंगली पशू, हर्मगिदोनपर्यंत अस्तित्वात राहतो. भविष्यवाणी ५, लोखंडाची आणि मातीची पावलं; हर्मगिदोनपर्यंत अस्तित्वात राहील. भविष्यवाणी ६, आज प्रचारकांची संख्या ८५,८०,००० हून अधिक आहे. यहोवाच्या लोकांच्या छळाच्या घटना: २०१७ मध्ये, रशियाच्या अधिकाऱ्‍यांनी साक्षीदारांना तुरुंगात टाकलं आणि त्यांच्या शाखा कार्यालयाच्या इमारती जप्त केल्या.
    भविष्यवाणी १० आणि ११.

    वचनं १ थेस्सलनी. ५:३; प्रकटी. १७:१६

    भविष्यवाणी “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी राष्ट्रं घोषणा करतील आणि “दहा शिंगे” व “जंगली पशू” सोबत मिळून ‘वेश्‍येवर’ हल्ला करतील. त्यानंतर राष्ट्रांचा नाश करण्यात येईल.

    पूर्णता राष्ट्रं दावा करतील की त्यांना जगभरात शांती आणि सुरक्षा आणण्यात यश मिळालं आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाचा भाग असलेले राष्ट्रं खोट्या धार्मिक संघटनांचा नाश करतील. ही मोठ्या संकटाची सुरुवात असेल. आणि मोठ्या संकटाच्या शेवटी येशू सैतानाच्या जगाचा हर्मगिदोनच्या युद्धात नाश करेल.

  • भविष्यवाणी १२.

    वचनं यहे. ३८:११, १४-१७; मत्त. २४:३१

    भविष्यवाणी गोग देवाच्या लोकांवर हल्ला करेल. मग स्वर्गदूत “निवडलेल्या लोकांना” गोळा करतील.

    पूर्णता उत्तरेचा राजा इतर सरकारांसोबत मिळून देवाच्या लोकांवर हल्ला करेल. हल्ला झाल्याच्या काही काळानंतर उरलेल्या अभिषिक्‍त जनांना स्वर्गात घेतलं जाईल.

  • भविष्यवाणी १३.

    वचनं यहे. ३८:१८-२३; दानी. २:३४, ३५, ४४, ४५; प्रकटी. ६:२; १६:१४, १६; १७:१४; १९:२०

    भविष्यवाणी “पांढरा घोडा” यावर बसलेला स्वार गोग आणि त्याच्या सैन्याचा विनाश करून “विजय पूर्ण” करतो. जंगली पशूला “गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात” टाकण्यात येतं आणि पर्वतातून निघालेला दगड पुतळ्याचा चुराडा करतो.

    पूर्णता देवाच्या राज्याचा राजा म्हणजे येशू देवाच्या लोकांचा बचाव करेल. येशू, त्याचे १,४४,००० सहराजे आणि स्वर्गदूत देवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करतील. यामुळे सैतानाच्या जगाचा नाश होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा