वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 मार्च पृ. १४-१५
  • २७ एप्रिल–३ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ एप्रिल–३ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 मार्च पृ. १४-१५

२७ एप्रिल–३ मे

यशया ५६-५७

गीत १२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवा आपला देव आहे याचा आपल्याला आनंद आहे

(१० मि.)

मूर्तींची उपासना करणारे मदतीसाठी जेव्हा मूर्तींना हाक मारतील तेव्हा त्या त्यांना वाचवू शकणार नाहीत (यश ५७:१३; यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १८ ¶१४-१६)

जे यहोवाची उपासना करत नाहीत त्यांच्यात शांती आणि एकता नसते. (यश ५७:२०; टेहळणी बुरूज१८.०६ ७ ¶१६; इन्साइट “पृथ्वी” ¶२१)

दुष्टांना कधीच शांती मिळत नसते (यश ५७:२१; इन्साइट “शांती” ¶३)

प्रचाराच्या क्षेत्रात दोन बहिणी आनंदाने मिळून प्रचारकाम करत आहेत.

यावर विचार करा: यहोवासोबत जवळचं नातं असल्यामुळे मला चांगलं जीवन कसं जगता येतंय?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ५६:६, ७—ही भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे? (टेहळणी बुरूज०७ २/१ १० ¶३; टेहळणी बुरूज०६ ११/१ २८ ¶१)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ५६:४-१२ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुम्ही अलीकडच्या सभेमध्ये शिकलेली गोष्ट समोरच्या व्यक्‍तीला सांगा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)

५. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख ९०—विषय: एखाद्या धार्मिक संघटनेचा भाग असणं गरजेचं आहे का? (शिकवणे अभ्यास १६)

६. शिष्य बनवण्यासाठी

(४ मि.) कायम आनंद घ्या! धडा १९ मुद्दा ४ (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत ५८

७. यहोवाबद्दल इतरांना सांगायचं कधीच सोडू नका

(१५ मि.) चर्चा.

फक्‍त यहोवाच आपलं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, आपल्या जीवनाला उद्देश देऊ शकतो आणि खरी आशा देऊ शकतो. पण बायबलच्या शिकवणींमुळे किती फायदा होतो हे अनेकांना माहीत नसल्यामुळे ते आनंदाचा संदेश ऐकत नाहीत. असं असलं तरी, आपण निराश का होऊ नये आणि प्रचार करायचं का सोडू नये याची काही कारणं खाली दिली आहेत.—उप ११:६.

  • लोक घर बदलतात. आधी आवड न दाखवलेली व्यक्‍ती आता घर सोडून गेली असेल आणि तिच्या जागी आता दुसरी व्यक्‍ती राहत असेल. कदाचित ती आपला संदेश ऐकायला तयार असेल

  • यावेळी दुसरी एखादी व्यक्‍ती दार उघडेल. कदाचित एखादी वृद्ध व्यक्‍ती, मोठी झालेली मुलं, घरातली दुसरी व्यक्‍ती किंवा तिथे आलेले पाहुणे दार उघडतील

  • लोक बदलतात. (१ती १:१३) जागतिक घडामोडींमुळे किंवा वैयक्‍तिक परिस्थितीमुळे काही जण बायबलच्या संदेशात आवड दाखवतील

  • आपण हार मानत नाही त्यावरून आपलं यहोवावर प्रेम असल्याचं दिसून येतं.—लूक ६:४५; १यो ५:३

‘यहोवा ”‏आपल्या कोणापासूनही दूर नाही”‏’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एक बहीण कॉफी शॉपमध्ये एका स्त्रीला पत्रिका देत आहे.

यहोवा “आपल्या कोणापासूनही दूर नाही” हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • कितीही समस्या आल्या तरी हार न मानता प्रचार करण्याच्या बाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळालं?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ८०-८१

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत २८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा