वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 मे पृ. १५-१६
  • ३० जून–६ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० जून–६ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 मे पृ. १५-१६

३० जून–६ जुलै

नीतिवचनं २०

गीत १३१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?

(१० मि.)

डेटींगबद्दल आपण यहोवाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे (नीत २०:२४, २५; टेहळणी बुरूज२४.०५ २६-२७ ¶३-४)

डेटींग सुरू करण्याआधी समोरच्या व्यक्‍तीला जाणून घ्यायचा प्रयत्न करा (नीत २०:१८; टेहळणी बुरूज२४.०५ २२ ¶८)

डेटींग करत असताना एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा (नीत २०:५; टेहळणी बुरूज२४.०५ २८ ¶७-८)

भाऊबहीण वेळ घालवण्यासाठी एकत्र जमलेत तिथे एक डेटिंग करणारं जोडपं एकमेकांशी बोलत आहे.

लक्षात ठेवा: लग्न झालं तरच डेटींग यशस्वी रीत्या पार पडली असं म्हणता येणार नाही. उलट डेटींगमुळे दोघांना एक चांगला निर्णय घ्यायला मदत होते; मग तो लग्न करायचा असो किंवा डेटींग थांबवायचा.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २०:२७—“माणसाचा श्‍वास हा यहोवाचा दिवा आहे” याचा काय अर्थ होतो? (इन्साइट-२ १९६ ¶७)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २०:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक सांगतो की तो अलीकडेच परदेशातून इथे राहायला आलाय. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्याला JW लायब्ररी ॲपबद्दल सांगा आणि त्याच्या फोन किंवा टॅबमध्ये ते डाऊनलोड करायला त्याला मदत करा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(४ मि.) प्रात्यक्षिक. कायम आनंद घ्या! धडा २६ मुद्दा १-३—विषय: जगात वाईट गोष्टी आणि दुःख का आहे? (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत ७८

७. इतरांना बायबल अभ्यास करून पाहायचं प्रोत्साहन द्या

(५ मि.) चर्चा.

बायबल अभ्यास करायला आवडेल का असं प्रचारात लोकांना विचारणं, हा आपल्या सेवाकार्याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण जर त्यांच्यासोबत बायबल अभ्यास केला नाही, तर त्यांना येशूचे शिष्य कसं बनता येईल? (रोम १०:१३-१५) घरोघरचं प्रचारकार्य करताना घरमालकाला ‘बायबल अभ्यास करायला आवडेल का’ असं विचारायचा तुम्ही नेहमी प्रयत्न करू शकता का? सर्वात आधी, घरमालकाला कोणत्या विषयात आवड आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मग बायबल अभ्यासामुळे त्याला त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं आणि व्यावहारिक मदत कशी मिळू शकते ते दाखवा.

jw.org वरच्या होम पेजवरची “बायबलवर चर्चा करून पाहा” ही लिंक.

बायबल अभ्यासासाठी विचारायला, jw.org वरची “बायबलवर चर्चा करून पाहा” ही लिंक तुम्हाला मदत करेल.

  • तुम्ही एखाद्याला बायबल अभ्यासाबद्दल विचारायला “बायबलवर चर्चा करून पाहा” या लिंकचा कसा उपयोग करू शकता?

  • तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी लोकांना बायबल अभ्यासासाठी विचारायला कोणत्या पद्धती प्रभावी ठरल्या आहेत?

८. जून महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २८ ¶८-१५

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा