वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जानेवारी पृ. १४-१५
  • २४ फेब्रुवारी-२ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४ फेब्रुवारी-२ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जानेवारी पृ. १४-१५

२४ फेब्रुवारी–२ मार्च

नीतिवचनं २

गीत ३५ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपल्याला वैयक्‍तिक अभ्यासाची उत्सुकता का असली पाहिजे?

(१० मि.)

सत्याबद्दल आदर दाखवण्यासाठी (नीत २:३, ४; टेहळणी बुरूज२२.०८ १९ ¶१६)

चांगले निर्णय घेण्यासाठी (नीत २:५-७; टेहळणी बुरूज२२.१० १९ ¶३-४)

विश्‍वास मजबूत करण्यासाठी (नीत २:११, १२; टेहळणी बुरूज१६.०९ २३ ¶२-३)

एक इस्राएली माणूस गुहेत आपली कुऱ्‍हाड चालवतोय.

स्वतःला विचारा, ‘मी स्वतःला नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करण्याची सवय कशी लावू शकतो?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २:४-६—वैयक्‍तिक अभ्यासाची कोणती पद्धत तुम्हाला प्रभावी वाटते? (टेहळणी बुरूज२२.०८ १९ ¶१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २:१-२२ (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. विवाहित जोडप्यासाठी उपयोगी माहिती jw.org वर कशी शोधायची हे घरमालकाला दाखवा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. मागच्या भेटीत समोरच्या व्यक्‍तीने ज्या विषयात आवड दाखवली होती, त्याबद्दलचं एक मासिक तिला द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा ८—विषय: पती-पत्नीने एकमेकांना विश्‍वासू राहिलं पाहिजे. (शिकवणे अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

गीत ९६

७. तुम्हाला गुप्त खजिना शोधायला आवडेल का?

(१५ मि.) चर्चा.

मुलांनो, तुम्हाला गुप्त खजिना शोधायला आवडेल का? असं असेल, तर बायबल तुम्हाला एक खूप मौल्यवान खजिना शोधायचं आमंत्रण देतं. तो खजिना म्हणजे देवाचं ज्ञान! (नीत २:४, ५) मग तुम्ही हा खजिना कसा शोधू शकता? त्यासाठी तुम्हाला नियमितपणे बायबल वाचावं लागेल आणि त्यात दिलेल्या घटनांचा खोलवर अभ्यास करावा लागेल. असं केल्यामुळे तुम्हाला खूप मज्जा येईल आणि बरंच शिकायलाही मिळेल.

  • बायबल वाचत असताना तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता? (टेहळणी बुरूज२४.०२ ३२ ¶२-३)

  • या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनांचा वापर करू शकता?

एका मुलाने सफरीवर जाणाऱ्‍याचे कपडे घातलेत. तो उत्सुकतेने खजिन्याची पेटी उघडतोय.

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या, या व्हिडिओ मालिकेमुळे तुम्हाला बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर मनन कसं करायचं, हे समजायला मदत होईल.

एक तरुण मुलगा “वॉज लाईफ क्रियेटेड” या माहितीपत्रिकेतून वैयक्‍तिक बायबल अभ्यास करतोय.

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—हाबेल हा व्हिडिओ दाखवा.

उत्पत्ती ४:२-४ आणि इब्री लोकांना ११:४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • हाबेलने कसं दाखवून दिलं की तो यहोवाचा मित्र होता?

  • हाबेलने यहोवावरचा विश्‍वास कसा मजबूत केला?

  • तुम्ही तुमचा विश्‍वास कसा मजबूत करू शकता?

टीप

बायबलमध्ये एखादी घटना वाचत असताना त्यामधल्या लोकांबद्दल, ठिकाणांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल थोडं संशोधन करा; मग त्याबद्दल तुम्हाला बरंच माहीत आहे, असं वाटत असलं तरीही. अशा प्रकारे बायबल अभ्यास केल्यामुळे त्या घटना तुमच्यापुढे जिवंत होतील!

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २३ ¶१-८ आणि भाग ८

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १०२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा