वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जानेवारी पृ. १०-११
  • १०-१६ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जानेवारी पृ. १०-११

१०-१६ फेब्रुवारी

स्तोत्रं १४७-१५०

गीत १२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

स्तोत्रकर्ता चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहून यहोवाची स्तुती करतोय. जवळच यरुशलेमचं मंदीर आहे.

१. याहची स्तुती करण्यासाठी आपल्याकडे बरीच कारणं आहेत

(१० मि.)

त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे (स्तो १४७:३, ४; टेहळणी बुरूज१७.०७ १८ ¶५-६)

त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि आपल्याला मदत करण्यासाठी तो त्याच्या ताकदीचा वापर करतो (स्तो १४७:५; टेहळणी बुरूज१७.०७ १८ ¶७)

तो आपल्याला त्याच्या संघटनेचा भाग व्हायचा बहुमान देतो (स्तो १४७:१९, २०; टेहळणी बुरूज१७.०७ २१ ¶१८)


स्वतःला विचारा, ‘यहोवाची स्तुती करण्यासाठी मला आणखी कोणत्या गोष्टींमुळे प्रेरणा मिळते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १४८:१, १०—यहोवाने निर्माण केलेल्या काही पक्ष्यांच्या बाबतीत तुम्हाला कोणती गोष्ट विशेष वाटते? (यहोवा के करीब अध्या. ५ ¶१६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १४८:१–१४९:९ (शिकवणे अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक तुम्हाला सांगतो की त्याला एक गंभीर आजार आहे. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडच्या सभेमध्ये तुम्हाला जे शिकायला मिळालं, त्यातली एखादी गोष्ट समोरच्या व्यक्‍तीला सांगण्याची संधी शोधा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज१९.०३ १० ¶७-११—विषय: येशूचं ऐका—आनंदाचा संदेश सांगा. चित्र पाहा. (शिकवणे अभ्यास १४)

एक जोडपं समुद्र किनाऱ्‍यावर एका माणसाला प्रचार करतंय.

ख्रिस्ती जीवन

गीत १५९

७. वार्षिक सेवा अहवाल

(१५ मि.) चर्चा.

शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाची घोषणा वाचल्यानंतर, ‘जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२४ सालचा सेवा वर्ष अहवाल’ यातल्या काही ठळक गोष्टी प्रचारकांना विचारा. मागच्या सेवा वर्षादरम्यान प्रचारात चांगले अनुभव आलेल्या काही भाऊबहिणींची मुलाखत घ्या. या प्रचारकांना आधीच निवडलं जावं.

जगातल्या वेगवेगळ्या भागातले भाऊबहीण प्रचार करत आहेत. ट्रॉली वापरून, व्हिडिओ कॉल करून, घरोघरी जाऊन आणि इतर मार्गांनी ते प्रचार करत आहेत.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २२ ¶७-१४, पान १७४, १७७ वरच्या चौकटी

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा