वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 नोव्हेंबर पृ. १२-१३
  • २३-२९ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 नोव्हेंबर पृ. १२-१३

२३-२९ डिसेंबर

स्तोत्र ११९:१२१-१७६

गीत ३१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपण स्वतःहून दुःख ओढवून घ्यायचं कसं टाळू शकतो?

(१० मि.)

देवाच्या आज्ञांवर प्रेम करा (स्तो ११९:१२७; टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५-६)

वाईट गोष्टींचा द्वेष करा (स्तो ११९:१२८; अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४ ३३ ¶१२)

यहोवाचं ऐका आणि ‘अनुभव नसलेल्यांकडून’ ज्या चुका होतात त्या टाळा (स्तो ११९:१३०, १३३; नीत २२:३)

सोन्याच्या नाण्यांच्या आणि विटांच्या शेजारी एक बायबल उघडून ठेवलंय.

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या आज्ञा पाळायला किंवा वाईट गोष्टींचा द्वेष करायला मला स्वतःमध्ये कोणत्या सुधारणा कराव्या लागतील?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ११९:१६०—या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्याला कशाची खातरी असली पाहिजे? (टेहळणी बुरूज२३.०१ २ ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ११९:१२१-१५२ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला आवडतील असे विषय jw.org वर कसे शोधायचे ते सांगा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) नियमितपणे सभेला न येणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्याबरोबर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १२१

७. पैशांमुळे अनावश्‍यक दुःख ओढवून घेऊ नका

(१५ मि.) चर्चा.

जे पैशांच्या मागे लागतात ते “स्वतःला पुष्कळ दुःखांनी भोसकून” घेतात. (१ती ६:९, १०) आपण पैशावर प्रेम केलं आणि त्याच्याच मागे लागलो, तर आपल्याला दुःखांचा सामना करावा लागेल. त्यांपैकी काही म्हणजे:

  • यहोवासोबत आपल्याला एक घट्ट नातं जोडता येणार नाही.—मत्त ६:२४

  • आपण कधीच समाधानी होणार नाही.—उप ५:१०

  • खोटं बोलणं, चोरी करणं आणि विश्‍वासघात करणं यांसारख्या नैतिक रित्या चुकीच्या असलेल्या गोष्टींना आपण लगेच बळी पडू. (नीत २८:२०) त्यामुळे आपल्याला दोषीपणाच्या भावनेला तोंड द्यावं लागेल, आपलं नाव खराब होईल आणि आपण देवाची मर्जी गमावून बसू

“पैशांचा विचारपूर्वक वापर करा” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. एका तरुण मुलाच्या हातात पिगी बँक दिसते.

इब्री लोकांना १३:५ वाचा आणि या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • पैशाबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपण विनाकारण स्वतःवर दुःख ओढवून घ्यायचं टाळू शकतो? आणि असा दृष्टिकोन आपण का बाळगला पाहिजे?

कदाचित पैशावर आपलं प्रेम नसेल. पण आपण जर त्याचं योग्य नियोजन केलं नाही, तर आपण स्वतःवर अनावश्‍यक दुःख ओढवून घेऊ शकतो.

पैशांचा विचारपूर्वक वापर करा बोर्डवरचं कार्टून दाखवा. मग विचारा:

    “पैशांचा विचारपूर्वक वापर करा” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी त्यांच्या गरजेच्या आणि त्यांना हव्या असणाऱ्‍या गोष्टींची यादी बनवत आहेत. तसंच प्रत्येक वस्तूची किंमत किती आहे हेसुद्धा ते लिहत आहेत. मुलाच्या यादीत हेडफोन्स, बूट, खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि ट्रेनची टिकीटं आहेत. मुलीच्या यादीत पर्स, घड्याळ, खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि इंधन आहे.
  • आपण एक बजेट का बनवलं पाहिजे आणि ते कसं करता येईल?

  • “पैशांचा विचारपूर्वक वापर करा” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. एक तरुण मुलगी पाऊस पडत असताना दोन छत्र्या विकत घेत आहे. एक छत्री तिच्यासाठी आहे आणि दुसरी तिच्या भावासाठी आहे. तिच्या भावाने त्याच्या पैशाने आईस्क्रीम घेतलंय.
  • पैशांची थोडी बचत करणं का चांगलं आहे?

  • “पैशांचा विचारपूर्वक वापर करा” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. एका तरुण भावाचा हात कार्टुनसारख्या दिसणाऱ्‍या क्रेडिट कार्डसोबत हातकडीत अडकलाय आणि स्त्रियांच्या वेशात असलेलं दुसरं एक क्रेडिट कार्ड त्या मुलावर हसतंय.
  • आपण विनाकारण कर्ज घेणं का टाळलं पाहिजे?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २० ¶१-७ आणि भाग ७

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १०१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा