वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 सप्टेंबर पृ. १४-१५
  • २८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 सप्टेंबर पृ. १४-१५

२८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर

स्तोत्रं १०३-१०४

गीत ३० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो”

(१० मि.)

यहोवा करुणामय देव असल्यामुळे तो समजूतदारपणा दाखवतो (स्तो १०३:८; टेहळणी बुरूज२३.०७ २१ ¶५)

आपण चुका करतो तेव्हा तो आपल्याकडे पाठ फिरवत नाही (स्तो १०३:९, १०; टेहळणी बुरूज२३.०९ ६-७ ¶१६-१८)

आपल्याला जे जमणार नाही, त्याची अपेक्षा तो आपल्याकडून कधीच करत नाही (स्तो १०३:१४; टेहळणी बुरूज२३.०५ २६ ¶२)

पत्नी आपल्या भावना पतीसमोर मोकळ्या करत असताना पती लक्ष देऊन ऐकत आहे.

स्वतःला विचारा, ‘मी माझ्या जोडीदारासोबत जसं वागतो त्यातून यहोवासारखा समजूतदारपणा दिसून येतो का?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०४:२४​—नवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करण्याच्या यहोवाच्या ताकदीबद्दल या वचनातून काय शिकायला मिळतं? (यहोवा के करीब  ५५ ¶१८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १०४:१-२४ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ३ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास करायला तयार झालेल्या व्यक्‍तीसोबत चला, बायबलमधून शिकू या!  या व्हिडिओवर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ९)

६. भाषण

(५ मि.) शिष्य बनवा  आणखी माहिती क मुद्दा ६​—विषय: पती “जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम” केलं पाहिजे. (शिकवणे  अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

गीत ४४

७. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत आहेत का?

(१५ मि.) चर्चा.

आपण जेव्हा यहोवाला आपलं सगळ्यात चांगलं ते देतो तेव्हा त्याला आनंद होतो. आणि त्यासोबतच आपल्यालाही आनंद होतो. (स्तो ७३:२८) पण असं करताना आपण आपल्या मर्या़दांचा विचार न केल्यामुळे विनाकारण चिंता आणि निराशा येऊ शकते.

“स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा करू नका” या व्हिडिओत दाखवलेली तरुण बहीण

स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा करू नका  हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  • यहोवा आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? (मीख ६:८)

  • “स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा करू नका” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एक तरुण बहीण आणखी एका बहीणीसोबत हॉटेलमध्ये एका बायबल विद्यार्थीनीला प्रोत्साहन देत आहे.
  • आपलं ध्येय गाठताना जास्त चिंता न करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तरुण बहिणीला कशामुळे मदत झाली?

आपण आपल्या मर्यादा कशा ओळखू शकतो?

  • दुसऱ्‍यांसोबत तुलना करू नका. (गल ६:४) दुसरे जे करतात त्याचा तुम्ही जे करत आहात किंवा जे करायचा विचार करत आहात त्यावर परिणाम होऊ देऊ नका. दुसऱ्‍या शब्दात इतरांसोबत स्वतःची तुलना करू नका. असं होऊ शकतं, की तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा किंवा तुमच्यासारखीच घरची परिस्थिती असणाऱ्‍यांपेक्षा तुम्ही कदाचित कमी किंवा जास्त सेवा करत असाल

  • नवनवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा. (रोम १२:१; १कर ७:३१) तुम्हाला सुरुवातीला कदाचित सेवा करायची एखादी पद्धत जमणार नाही किंवा त्यात मजा येणार नाही, असं वाटेल. पण तरी घाबरू नका, ती करून पाहा.​—मला ३:१०

  • छोटी-छोटी ध्येयं ठेवा; तुम्हाला किती जमतंय ते जाणून घ्या. उदाहरणार्थ, तुम्हाला पायनियर सेवा करायला जमेल का? हे जाणून घ्यायला तुम्ही प्रचारात जास्त वेळ देऊ शकता का किंवा सहायक पायनियर सेवा करू शकता का? किंवा तुम्ही वर्षभरासाठी पायनियर सेवा करून पाहू शकता का? पण जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही पायनियर सेवा करू शकत नाही किंवा जरी केली तरी एक वर्षापेक्षा जास्त करू शकणार नाही, तरी तुम्ही गाठलेल्या छोट्या-छोट्या ध्येयांचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.​—उप ६:९

  • परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार राहा. आपली परिस्थिती बदलत राहते आणि त्यामुळे आपल्या मर्यादाही बदलत असतात. तेव्हा आपल्या ध्येयांचं वेळोवेळी परीक्षण करा

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. १७ ¶८-१२, पान १३७ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा