वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १६
  • स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधी पाळण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनतीवर यहोवा आशीर्वाद देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • स्मारकविधीच्या काळात तुमचा आनंद द्विगुणित करा!
    आमची राज्य सेवा—२०१४
  • स्मारकविधीचा काळ—क्षेत्र सेवेत जास्त सहभाग घेण्याची संधी!
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १६

ख्रिस्ती जीवन

स्मारकविधीच्या काळात आपली सेवा वाढवण्यासाठी ध्येयं ठेवा

यहोवाचे लोक दर वर्षी होणाऱ्‍या स्मारक विधीला सोबत मिळून उपस्थित राहायची वाट पाहत असतात. स्मारकविधीच्या आधीच्या आणि नंतरच्या आठवड्यात खंडणीच्या सुंदर भेटीबद्दल यहोवाची स्तुती करण्याची आणि त्याचे आभार मानण्याची खास संधी आपल्याकडे असते. (इफि १:३, ७) उदाहरणार्थ, आपण लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देण्यासाठी खूप मेहनत घेतो. काही जण मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान ३० किंवा ५० तासांची साहाय्यक पायनियर सेवा करण्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य ते फेरबदल करतात. या वर्षी होणाऱ्‍या स्मारकविधीच्या काळात तुम्हालाही तुमची सेवा वाढवायची इच्छा आहे का? मग त्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

आधीपासून चांगली योजना केली तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. (नीत २१:५) त्यामुळे लवकरच येणाऱ्‍या स्मारकविधीसाठी आपण आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. म्हणून स्मारविधीच्या काळात सेवा वाढवण्यासाठी आणि तुम्ही ठेवलेली ध्येयं गाठण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. आणि मग तुमच्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद द्यावा म्हणून त्याला प्रार्थना करा.​—१यो ५:१४, १५.

स्मारकविधीच्या काळात तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी आपली सेवा वाढवू शकता?

ध्येयं

ही ध्येयं पूर्ण करण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा