वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ९
  • तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • आपली अधिकृत वेबसाईट —वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
  • विचार करून मित्र निवडा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • कसे मिळवाल खरे मित्र?
    सावध राहा!—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ९

ख्रिस्ती जीवन

तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?

खऱ्‍या मित्रांमध्ये एक जवळीक असते आणि ते एकमेकांचा आदर करतात. उदाहरणार्थ, दावीद आणि योनाथान यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. दावीदने गल्याथला मारलं, तेव्हापासून ते चांगले मित्र बनले. (१शमु १८:१) त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांमुळे ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकले. आपण समोरच्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे ओळखत असू तर आपली तिच्याशी घट्ट मैत्री होऊ शकते. एखाद्या व्यक्‍तीला जाणून घेण्यासाठी सहसा वेळ द्यावा लागतो आणि स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. पण इंटरनेटमुळे मित्र बनवणं आज फार सोपं झालं आहे. इंटरनेटवर सहसा लोक आपली ओळख लपवतात. ते खरोखर कशा प्रकारची व्यक्‍ती आहेत हे आपल्याला लगेच कळत नाही. म्हणून, जर तुम्ही ऑनलाईन मित्र निवडत असाल तर ते विचार करून निवडा. एखाद्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत नसाल, तर त्याने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट नाकारायला घाबरू नका. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला वाईट वाटेल असा विचार करू नका. इंटरनेटवर मैत्री करायचे बरेचसे धोके आहेत, हे पाहून काही जणांनी सोशल मिडियाचा वापर न करायचं ठरवलं आहे. पण तुम्ही जर सोशल मिडियाचा वापर करायचं ठरवत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा  हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • “सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एका मुलीला स्वतःचे फोटो टीवीवर पाहून आश्‍चर्याचा धक्का बसला आहे आणि ती घाबरली आहे.

    फोटो आणि कमेंट्‌स इंटरनेटवर टाकण्याआधी आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

  • “सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. तराजूत एका बाजूला एका मुलीचे सुंदर फोटो आहेत तर दुसर्‌या बाजूला नाणी ठेवली आहेत. पण फोटोचं वचन नाण्यांपेक्षा जास्त आहे.

    ऑनलाईन मित्र निवडताना आपण काळजी का घेतली पाहिजे?

  • ‘सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. दादागीरी करणारे दोन मुलं एका मुलाला सोशल मिडियावरची पोस्ट दाखवत आहे आणि तो मुलगा त्याचे डोळे बंद करत आहे.

    सोशल मिडियावर आपण किती वेळ घालवणार आहोत हे आपण आधीच का ठरवलं पाहिजे?—इफि ५:१५, १६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा