१०-१६ जानेवारी
शास्ते १७-१९
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
शास १९:१८—२०१३ मध्ये नवे जग भाषांतराची इंग्रजीतली सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्यातल्या शास्ते १९:१८ या वचनात देवाचं नाव का टाकण्यात आलं? (टेहळणी बुरूज१५ १२/१५ १० ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास १७:१-१३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: प्रार्थनेमुळे मदत होते—यश ४८:१७, १८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि धडा १ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—मम्मीपप्पांचं ऐका: (१० मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: मम्मीने सांगितलेली कोणती गोष्ट केतनने ऐकली नाही? मग केतनने त्याची चुक कशी सुधारली? तुम्ही मम्मीपप्पांचं का ऐकलं पाहिजे?
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १५, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४९ आणि प्रार्थना