वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. ७
  • प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • खास अधिवेशने यहोवाचा सन्मान करतात
    आमची राज्य सेवा—१९९०
  • संमेलनांमध्ये हर्ष व देवाची स्तुती करणे
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • यहोवाचे साक्षीदार आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवीत आहेत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. ७

ख्रिस्ती जीवन

प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं

आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले पाहुणे एकत्र फोटो काढत आहेत.

अधिवेशनांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला इतका आनंद का होतो? कारण या अधिवेशनांमुळे प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपल्यालाही यहोवाच्या हजारो उपासकांसोबत यहोवाची उपासना करायची संधी मिळते. तिथे आपल्याला यहोवाबद्दल खूप काही शिकायला मिळतं. तिथे आपल्याला आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवता येतो. या सगळ्या गोष्टींबद्दल मनापासून कदर असल्यामुळे, आपण अधिवेशनाचा एकही दिवस चुकवत नाही.

अशा प्रकारे आपल्याला एकत्र येण्याची संधी मिळते, तेव्हा आपण फक्‍त स्वतःला कसा फायदा होईल याचाच नाही, तर आपल्या भाऊ-बहिणींनाही कसा फायदा होईल, याचाही विचार केला पाहिजे. (गल ६:१०; इब्री १०:२४, २५) आपण रस्ता अडवून उभं राहू नये किंवा गरजेपेक्षा जास्त जागा राखून ठेवू नये. अशा प्रकारे आपण दाखवून देतो की आपल्याला भाऊबहिणींची काळजी आहे. (फिलि २:३, ४) अधिवेशनात आपल्याला नवीन मित्र बनवता येतात. म्हणून आपण कार्यक्रम सुरु होण्याआधी, ब्रेकमध्ये आणि कार्यक्रम संपल्यानंतर निदान एका तरी अनोळखी भाऊ-बहिणीशी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. (२कर ६:१३) अधिवेशात ज्यांच्याशी आपली ओळख झाली आहे, ते आपले कायमचे मित्र असतील! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नवीन लोक पाहतील की आपण एकमेकांशी किती प्रेमाने वागतो, तेव्हा तेही कदाचित आपल्यासोबत यहोवाची उपासना करायचा निर्णय घेतील.—योह १३:३५.

“प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं या व्हिडिओतलं एक दृष्य. स्थानिक भाऊ-बहीण आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहेत.

    २०१९ च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांसाठी दुसऱ्‍या देशातून आलेल्या पाहुण्यांना भाऊ-बहिणींनी कसं प्रेम दाखवलं?

  • “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं या व्हिडिओतलं एक दृष्य. स्थानिक भाऊ-बहीण आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत मिळून फोटो काढत आहेत.

    यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि एकता इतकी विशेष का आहे?

  • “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं या व्हिडिओतलं एक दृष्य. कोरियन भाऊ-बहिणींच्या एका गटाने आपल्या हातात ‘वेलकम’ अक्षरं असलेला बोर्ड धरला आहे. आणि ते हात हलवून अधिवेशनासाठी येणाऱ्‍या लोकांचं स्वागत करत आहेत.

    नियमन मंडळाच्या सदस्यांनी ख्रिस्ती प्रेमाच्या कोणत्या पैलूंवर जोर दिला?

  • “प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं या व्हिडिओतलं एक दृष्य. एका लहान मुलीच्या हातात नुकतंच मिळालेलं ‘नवे जग भाषांतर’ आहे आणि ती हसऱ्‍या चेहऱ्‍याने आपल्याकडे पाहत आहे.

    अधिवेशनात तुम्ही कोण-कोणत्या मार्गांनी प्रेम व्यक्‍त करू शकता?

    जर्मनी आणि दक्षिण कोरियामध्ये विरोध असतानाही ख्रिस्ती प्रेम कसं टिकून राहिलं?

  • आपला काय निर्धार असला पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा