वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. ७
  • ‘परके देव फेकून द्या’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘परके देव फेकून द्या’
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • फक्‍त यहोवाचीच उपासना करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • याकोब आणि एसावचं भांडण मिटलं
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. ७
एक माणूस भूतविद्येशी संबंधित असलेली मण्यांची माळ फेकत आहे.

ख्रस्ती जीवन

‘परके देव फेकून द्या’

याकोबच्या काळात, खरंतर यहोवाने मूर्तिपूजा न करण्याबद्दलचा नियम अजून दिलेला नव्हता. तरीसुद्धा याकोबला माहीत होतं, की आपण फक्‍त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. (निर्ग २०:३-५) म्हणून जेव्हा, यहोवाने याकोबला बेथेलला परत जायला सांगितलं, तेव्हा त्याने त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांना आपापल्या मूर्ती टाकून द्यायला सांगितलं. मग त्याने त्या सगळ्या मूर्ती, तसंच कानातली कुंडले जमिनीत पुरून टाकली. कदाचित ही कुंडले दुष्ट शक्‍तीपासून रक्षण व्हावं म्हणून घातली जात असावीत. (उत्प ३५:१-४) याकोबने जे केलं, त्यामुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल.

आज आपल्या काळातसुद्धा, आपण फक्‍त यहोवाचीच उपासना कशी करू शकतो? सगळ्यात आधी, आपण मूर्तिपूजा किंवा भूतविद्येशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. जसं की, जादूटोण्याशी संबंधित असलेल्या वस्तू आपल्याजवळ असतील तर त्या फेकून दिल्या पाहिजेत. तसंच, आपण कोणत्या गोष्टींनी स्वतःची करमणूक करतो, याचाही आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, स्वतःला विचारा: ‘भूतप्रेत, जादूटोणा किंवा अनैसर्गिक शक्‍तींबद्दल असलेली पुस्तकं किंवा चित्रपट मला आवडतात का? मी करमणुकीसाठी ज्या गोष्टी वाचतो किंवा पाहतो त्यांत जादूटोणा, मंत्रतंत्र यांसारख्या गोष्टी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वापरल्या जातात का?’ यहोवाला ज्या गोष्टींची घृणा वाटते त्यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.—स्तो ९७:१०.

“सैतानाचा विरोध करा”  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एक बाळ बिछान्यावर झोपलं आहे, त्याच्या मनगटावर गंडादोरा बांधला आहे. आणि मागे बाळाची आई, बायबल अभ्यास घेणाऱ्‍या एका जोडप्यासोबत बोलत आहे.

    बायबल अभ्यास करणाऱ्‍या पलेसा नावाच्या एक स्त्रीच्या जीवनात कोणती समस्या आली?

  • एक जोडपं त्यांच्या बायबल विद्यार्थिनीसोबत दोन वडिलांना मदतीसाठी भेटत आहेत.

    भूतविद्येशी संबंधित असलेल्या समस्यांच्या बाबतीत मंडळीतल्या वडिलांची मदत घेणं का चांगलं आहे?

  • बायबल विद्यार्थिनी तिच्या बाळाच्या हातातला दोरा गॅसवर जाळत आहे.

    सैतानाचा विरोध करा आणि देवाच्या जवळ या.—याक ४:७, ८

    यहोवाचं संरक्षण हवं असेल, तर आपण कोणत्या गोष्टींशी पूर्णपणे संबंध तोडून टाकला पाहिजे?

  • पलेसाने कोणतं पाऊल उचललं?

  • तुम्ही राहता त्या ठिकाणी दुरात्म्यांच्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा