ख्रिस्ती जीवन
पृथ्वीने नदीला गिळून टाकलं
गतकाळात बऱ्याच वेळा जगातल्या अधिकाऱ्यांनी यहोवाच्या लोकांची मदत केली आहे. (एज ६:१-१२; एस्ते ८:१०-१३) आणि आधुनिक काळातसुद्धा आपण पृथ्वीला म्हणजे या व्यवस्थीकरणाच्या समजूतदार अशा मानवी घटकांना, अजगराच्या म्हणजेच सैतानाच्या छळांपासून देवाच्या लोकांचा बचाव करताना पाहिलं आहे. (प्रक १२:१६) यहोवा “संकटांतून मुक्त करणारा देव आहे,” त्यामुळे तो आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी कधी-कधी मानवी शासकांचाही वापर करतो. —स्तो ६८:२०; नीत २१:१.
विश्वासामुळे तुम्हालाही तुरुंगात टाकण्यात आलं असेल तर काय? अशा वेळी यहोवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी शंका मनात कधीही येऊ देऊ नका. (उत्प ३९:२१-२३; स्तो १०५:१७-२०) तर तुम्हाला तुमच्या विश्वासाचं प्रतिफळ नक्की मिळेल अशी खातरी बाळगा. शिवाय, तुमच्या या उदाहरणामुळे जगभरातल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ राहायचं प्रोत्साहनही मिळेल.—फिलि १:१२-१४; प्रक २:१०.
कोरियातल्या बांधवांची तुरुंगातून सुटका हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियातल्या बांधवांना तुरुंगात का टाकण्यात येत होतं?
न्यायालयाच्या कोणत्या निर्णयांमुळे काही बांधवांची तुरुंगातून लवकर सुटका झाली?
जगभरात जे बांधव विश्वासामुळे तुरुंगात आहेत त्यांना आपण कशी मदत करू शकतो?
सध्या अनुभवत असलेल्या स्वातंत्र्याचा आपण कसा वापर केला पाहिजे?
न्यायालयीन खटल्यांमध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे?
मी माझ्या स्वातंत्र्याचा कसा वापर करत आहे?