देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण ७-९
मोजता येणार नाही इतक्या मोठ्या लोकसमुदायावर यहोवाचा आशीर्वाद
७:९, १४-१७
यहोवा मोठ्या लोकसमुदायाला आशीर्वाद का देतो?
कारण ते यहोवाच्या “राजासनासमोर” उभे आहेत, म्हणजेच ते यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराला पूर्ण पाठिंबा देत आहेत
कारण त्यांनी “शुभ्र झगे” घातले आहेत, म्हणजेच ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे ते यहोवाच्या नजरेत शुद्ध आणि नीतिमान ठरले आहेत
कारण ते “रात्रंदिवस त्याची पवित्र सेवा करत आहेत,” म्हणजेच ते सातत्याने आणि परिश्रमपूर्वक यहोवाची उपासना करत आहेत
मोठ्या लोकसमुदायाचा भाग होण्यासाठी मी काय केलं पाहिजे?