वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. ४-५
  • स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • ख१२-क येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग १)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख१२-ख येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • २०२३ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • २०२२ च्या स्मारकविधीसाठी असलेला बायबल वाचनाचा आराखडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. ४-५

ख्रिस्ती जीवन

स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?

या वर्षापासून ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असेल. कारण या वर्षापासून स्मारकविधीचा दिवस शनिवारी किंवा रविवारी येत असेल, तर जाहीर भाषण आणि टेहळणी बुरूज  अभ्यासाची सभा घेतली जाणार नाही. आणि हे दिवस सोडून जर इतर दिवशी स्मारकविधी येत असेल, तर त्या आठवड्याची जीवन आणि सेवाकार्य सभा घेतली जाणार नाही. मग या वेळेचा तुम्हाला सर्वात चांगला उपयोग करता येईल का? पहिल्या शतकात ज्या प्रकारे या खास समारंभासाठी काही व्यावहारिक योजना करण्यात आल्या, त्याच प्रकारे आपणही करू शकतो. (लूक २२:७-१३; आपली राज्य सेवा ३/१५ पृ. १) या खास प्रसंगासाठी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे, आपली उत्सुकता वाढवली पाहिजे. मग त्यासाठी आपण अजून काय करू शकतो?

  • या समारंभाला उपस्थित राहणं का महत्त्वाचं आहे यावर विचार करा.​—१कर ११:२३-२६

  • यहोवासोबत असणाऱ्‍या तुमच्या नात्याचा प्रार्थनापूर्वक विचार करा.​—१कर ११:२७-२९; २कर १३:५

  • स्मारकविधीबद्दल असणारे लेख वाचा आणि त्यावर मनन करा.​—योह ३:१६; १५:१३

काही प्रचारक शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा  यामध्ये असणाऱ्‍या स्मारकविधीच्या बायबल वाचनाचा भाग वाचून त्यावर मनन करतात. इतरजण सोबत दिलेल्या तक्त्यातल्या बायबल अहवालांचं वाचन करतात. तर काही जण टेहळणी बुरूज  मासिकात स्मारकविधीबद्दल आणि यहोवाने व येशूने दाखवलेल्या प्रेमाबद्दल सांगणाऱ्‍या लेखांची उजळणी करतात. यांपैकी कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता. पण यामुळे यहोवाशी आणि त्याच्या पुत्राशी असलेलं तुमचं नातं घनिष्ठ होवो, हीच इच्छा!

येशूचा पृथ्वीवरील जीवनाचा शेवटचा आठवडा (भाग १ आणि २)
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा