ख्रिस्ती जीवन
प्रेम खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे—स्वार्थ पाहू नका व चिडू नका
हे का महत्त्वाचं: येशूने शिकवलं की प्रेम हे त्याच्या शिष्यांचं ओळखचिन्ह असेल. (योह १३:३४, ३५) ख्रिस्तासारखं प्रेम दाखवण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या हिताची चिंता केली पाहिजे आणि चिडणं टाळलं पाहिजे.—१कर १३:५.
हे कसं करावं:
जेव्हा कोणी काही बोलण्याद्वारे किंवा कार्यांद्वारे आपल्याला दुखवतं, तेव्हा आपण थोडं थांबून समस्येच्या कारणाबद्दल आणि आपण देणार असलेल्या प्रतिक्रियेच्या परिणामांबद्दल विचार केला पाहिजे.—नीत १९:११
हे नेहमी लक्षात असू द्या की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि कधीकधी आपणही असं काहीतरी बोलून जातो किंवा करतो ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होतो
मतभेद लवकरात लवकर सोडवा
‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—स्वार्थ पाहू नका व चिडू नका हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
हॅरीने दिलेल्या सल्ल्याप्रती बेंजामिनने कशी प्रतिक्रिया दिली?
कोणत्या गोष्टीने हॅरीला चीड येण्यापासून रोखलं?
हॅरीने शांतपणे उत्तर दिल्यामुळे काय झालं?
आपल्याला एखाद्याने चीड आणल्यावर शांत राहिल्यामुळे मंडळीला कसा फायदा होतो?