वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मार्च पृ. ७
  • “जागृत राहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जागृत राहा”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही “जागृत” राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • ‘विश्‍वासू दास’ परीक्षा पार करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मार्च पृ. ७
येशूच्या दाखल्यातल्या दहा कुमारी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २५

“जागृत राहा”

२५:१-१२

येशूने जरी दहा कुमारींचा दाखला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून दिला असला तरी, त्यातला मूळ संदेश सर्व ख्रिश्‍चनांना लागू होतो. (टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. १२-१६) “सतत जागृत राहा, कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही.” (मत्त २५:१३) येशूने दिलेला दाखला तुम्ही समजावून सांगू शकता का?

  • वर (वचन १)—येशू

  • समजदार, तयारीत असलेल्या कुमारी (वचन २)—असे अभिषिक्‍त ख्रिस्ती जे आपली नेमणूक विश्‍वासूपणे पार पाडण्यासाठी तयार असतात आणि शेवटपर्यंत प्रकाशाप्रमाणे चमकत राहतात (फिलि २:१५)

  • हाक येते: “पाहा, वर येत आहे!” (वचन ६)—येशूच्या उपस्थितीचा पुरावा

  • मूर्ख कुमारी (वचन ८)—त्या अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतात ज्या बाहेर जाऊन वराला भेटतात. पण, त्या जागृत नसतात आणि एकनिष्ठा टिकवून ठेवत नाहीत

  • समजदार कुमारी त्यांचं तेल इतरांना देण्यास नकार देतात (वचन ९)—शेवटचा शिक्का मारल्यानंतर विश्‍वासू अभिषिक्‍त जण अविश्‍वासू झालेल्यांना मदत करत नाहीत, कारण खूप उशीर झालेला असतो

  • “वर आला” (वचन १०)—मोठ्या संकटाच्या शेवटी येशू न्याय करण्यासाठी येतो

  • समजदार कुमारी वरासोबत लग्नाच्या मेजवानीला आत जातात आणि दार बंद करण्यात येतं (वचन १०)—येशू त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त जणांना स्वर्गात जाण्यासाठी एकत्रित करतो, पण अविश्‍वासू जण स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ गमावून बसतात

बरेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चन अविश्‍वासू होतील आणि त्यांच्या जागी इतरांची निवड करावी लागेल याविषयी हा दाखला सांगत नाही. तर, हा दाखला असा इशारा देतो की, निवड करण्याची संधी प्रत्येक अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाकडे आहे. एकतर ते तयार व जागृत राहण्याची किंवा मूर्ख व अविश्‍वासू ठरण्याची निवड करू शकतात. म्हणून येशू प्रोत्साहन देतो की “तयार राहा”. (मत्त २४:४४) आपल्याला स्वर्गाची आशा असो किंवा पृथ्वीची, येशू आपल्याकडून अपेक्षा करतो की, आपण सर्वांनीच विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी आपलं मन तयार करावं. तसंच, जागृत राहण्याच्या बाबतीत जे स्तर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी आहेत ते आपल्यालाही लागू होतात म्हणून आपण त्यांचं पालन केलं पाहिजे.

मी जागृत असल्याचं कशा प्रकारे दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा