ख्रिस्ती जीवन
खरं प्रेम काय आहे?
स्त्री आणि पुरुषामध्ये कायम टिकून राहणाऱ्या लग्नबंधनाची रचना यहोवाने केली. (उत्प २:२२-२४) फक्त लैंगिक अनैतिक कृत्यांमुळे घटस्फोट घेतला जाऊ शकतो. (मला २:१६; मत्त १९:९) वैवाहिक जीवन आनंदी असावं, अशी यहोवाची इच्छा आहे. ख्रिश्चनांनी सुज्ञतेने जोडीदार निवडावा आणि विवाहात आनंद टिकवून ठेवावा, यासाठी त्याने मदतदायी तत्त्वं दिली आहेत.—उप ५:४-६.
खरं प्रेम कसं ओळखाल? हा व्हिडिओ पाहा आणि नंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
एक व्यक्ती डेटिंग किंवा लग्नाआधी भेटीगाठी करणं कधी सुरू करू शकते?
आकर्षण, आवड आणि खरं प्रेम यांमध्ये काय फरक आहे?
तुम्ही ज्या व्यक्तीसोबत लग्नाआधीच्या भेटीगाठी करत आहात, त्याला तुम्ही बदलू शकाल असा विचार करणं सुज्ञपणाचं का ठरणार नाही?
भौतिक गोष्टी मिळवण्याच्या बाबतीत संतुलित नसल्यामुळे विवाहावर कसा परिणाम होतो?
आध्यात्मिक ध्येयं सारखीच असल्यामुळे विवाह कसा मजबूत होतो?
एका व्यक्तीसोबत लग्नाची शपथ घेण्याआधी, तिच्या “अंतःकरणातील गुप्त व्यक्तीला” जाणून घेणं का गरजेचं आहे? (१पेत्र ३:४)
खरं प्रेम काय आहे? (१कर १३:४-८)