घोषणा
◼ साहित्य सादरता डिसेंबर: मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (T-16), शांतीदायक नवीन जगातील जीवन (T-15), कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (T-21), किंवा सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (T-27) या जुन्या पत्रिकांपैकी कोणतीही एक सादर करू शकता. जुन्या पत्रिका उपलब्ध नसल्यास खालीलपैकी कोणतीही पत्रिका वापरून तुम्ही बायबल अभ्यास सुरू करू शकता: मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?, कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? किंवा दुःख कधी संपेल का? पुढं मग देवाकडून आनंदाची बातमी! किंवा बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातून बायबल अभ्यास चालू ठेवा. जानेवारी आणि फेब्रुवारी: देवाकडून आनंदाची बातमी!, तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते, देवाचे ऐका, किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. प्रचार कार्यात भेटणाऱ्या व्यक्तीच्या गरजांनुरूप प्रचारक, दुसरं कोणतंही माहितीपत्रक सादर करू शकतात. मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकं.
◼ सन २०१७ चा स्मारकविधी मंगळवार, ११ एप्रिल, २०१७ रोजी असेल.
◼ भारतीय पासपोर्ट धारक आता www.jwindiagift.org ही वेबसाईट वापरून संघटनेला दान पाठवू शकतात. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर एकदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तुमच्या वैध भारतीय पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल. इंटरनेट बँकींगद्वारे दान करण्यासाठी ३५ बँकांची नावं या वेबसाईटवर दिली आहेत. तुमचं खातं या बँकांमध्ये नसल्यास, किंवा तुम्हाला याबाबतीत काही मदत हवी असल्यास, तुम्ही शाखा कार्यालयातील चॅरिटेबल डेस्कशी निसंकोच संपर्क करू शकता. त्यासाठी ०८०-२३०९२४२६ या नंबरवर फोन करा किंवा ACCToffice.in@jw.org वर ई-मेल पाठवा.