वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१४ पृ. ७-८
  • नियमन मंडळाकडून पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियमन मंडळाकडून पत्र
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ४/१४ पृ. ७-८

नियमन मंडळाकडून पत्र

परिवारातील प्रिय सदस्यांनो:

या महत्त्वपूर्ण वर्षाच्या सुरुवातीला हे पत्र लिहिण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे! १९१४ मध्ये आपला प्रिय राजा येशू ख्रिस्त याने त्याच्या शत्रूंमध्ये राज्य करण्यास सुरुवात केली. या गोष्टीला २०१४ च्या अखेरीस एक शतक पूर्ण होईल.—स्तो. ११०:१, २.

या सेवा वर्षाच्या सुरुवातीला, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनियाची वार्षिक सभा झाली. या सभेत, न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीने इंग्रजी बायबलची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. मानवांकरता उपलब्ध असलेले हे सर्वात उत्तम प्रतीचे भाषांतर आहे. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे मूळ भाषांतर पुरवण्याकरता यहोवाने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या त्याच्या पुत्रांचा उपयोग केला. (रोम. ८:१५, १६) हे एकच कारण या भाषांतराला निश्‍चितार्थाने खास ठरवण्यास पुरेसे आहे; याच्याशी तुम्ही सहमत नाही का?

कित्येक वर्षांपासून नियमन मंडळाच्या लेखन समितीने बायबलचे भाषांतर करण्याला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. आज संपूर्ण न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन किंवा त्याचे काही भाग १२१ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या बायबलची तुम्ही किती कदर करता हे यहोवाला दाखवा असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो. त्यासाठी दररोज बायबलचे वाचन करा आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करा. असे केल्यास तुम्ही बायबलचा लेखक, यहोवा देव याच्या जवळ जाल.—याको. ४:८.

आपले प्रिय बंधुभगिनी परीक्षांचा सामना करत आहेत हे आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटते. यामुळे साहजिकच काही वेळा त्यांना आनंदाने सेवा करणे कठीण वाटू शकते. उदाहरणार्थ, आशियातील एका कुटुंबाचा विचार करा. अलीकडेच या कुटुंबातील आईला एकाएकी लकवा मारला तेव्हा त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःखाची गोष्ट म्हणजे, तिला नेमके काय झाले हे डॉक्टरांना कळेना. त्यामुळे तिला बरे करण्यात त्यांना यश आले नाही. आता तिचा पती रात्रंदिवस तिची काळजी घेतो. त्यांचा एक मुलगा व दोन मुली आपल्या पालकांना प्रेमळपणे आधार देण्यात एक उत्तम उदाहरण मांडत आहेत. हे कुटुंब आणि निरनिराळ्या परीक्षांचा यशस्वी रीत्या सामना करणारे तुम्ही सर्व जण विश्‍वासाच्या परीक्षांत टिकून राहिलात याबद्दल आनंद मानू शकता. (याको. १:२-४) यहोवा अभिषिक्‍त जनांना आणि दुसऱ्‍या मेंढरांना असे आश्‍वासन देतो की धीराने परीक्षांचा सामना केल्याबद्दल त्यांना नक्कीच आनंद होईल, कारण त्यामुळे पुढे त्यांना सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळेल.—याको. १:१२.

गेल्या वर्षी स्मारकविधीची उपस्थिती १,९२,४१,२५२ इतकी होती. देवाच्या लोकांकरता असलेल्या सर्वात महत्त्वाच्या सभेला इतके लोक उपस्थित राहिले आणि त्यांनी यहोवाचा व येशू ख्रिस्ताचा सन्मान केला हे पाहून किती प्रोत्साहन मिळते! स्मारकविधीच्या काळात लाखो लोकांनी मार्च व एप्रिल महिन्यांत साहाय्यक पायनियरिंग करून मोठ्या प्रमाणात यहोवाची स्तुती केली. ही किती उत्तेजनात्मक गोष्ट आहे! तसेच, आता मार्च व एप्रिल महिन्यांसोबतच विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यानही तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करू शकता व संपूर्ण पायनियर सभेला उपस्थित राहू शकता हे जाणून तुम्हाला आनंद झाला नाही का? जे आध्यात्मिक रीत्या सुज्ञ आहेत त्यांना प्रचार कार्यात व मंडळीच्या कार्यात आवेशाने भाग घेण्याचे महत्त्व काय याची जाणीव आहे. अशा प्रकारे व्यस्त राहिल्याने आपण स्थिर व अढळ राहू आणि आपला विश्‍वास कमकुवत करण्याचे व आपल्याला सत्यापासून बहकावण्याचे दियाबलाचे प्रयत्न हाणून पाडू.—१ करिंथ. १५:५८.

गेल्या सेवा वर्षादरम्यान २,७७,३४४ जणांनी आपले जीवन यहोवाला समर्पित करून पाण्याने बाप्तिस्मा घेतला आणि आता ते जगभरातील इतर बांधवांसोबत जीवनाच्या मार्गावर चालत आहेत. ही किती प्रोत्साहनदायक गोष्ट आहे! (मत्त. ७:१३, १४) या नवीन लोकांना “विश्‍वासात दृढ” होण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. (कलस्सै. २:७) तेव्हा, शेवटपर्यंत टिकून राहण्यास एकमेकांना उत्तेजन देत राहा. (मत्त. २४:१३) “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनी. ५:१४) शेवटी इतकेच सांगायचे आहे, की आपण प्रत्येक जण “तुझे राज्य येवो,” अशी “निरंतर प्रार्थना” करत राहू या.—१ थेस्सलनी. ५:१७; मत्त. ६:१०.

यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांनो ही गोष्ट नेहमी आठवणीत ठेवा की तुम्हा प्रत्येकावर आमचे प्रेम आहे.

तुमचे बांधव,

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा