नमुना सादरीकरणे
जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“आज आम्ही सर्वांना भेटी देत आहोत. आम्ही अनेकांशी बोललो आणि बहुतेकांना असं वाटतं की आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला फार दुःख होतं आणि ते दुःख सहन करणं खूप कठीण असतं. तुम्हालाही तसंच वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] या बाबतीत काही सांत्वनदायक माहिती मी तुम्हाला सांगितली तर चालेल का?” घरमालकाने होकार दिल्यास, टेहळणी बुरूज जानेवारी – मार्च नियतकालिकाचे शेवटचे पृष्ठ दाखवा आणि पहिल्या प्रश्नाच्या खाली दिलेल्या माहितीवर आणि उल्लेख केलेल्या निदान एका शास्त्रवचनावर चर्चा करा. घरमालकाला नियतकालिक द्या आणि पुढच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी जानेवारी – मार्च
“आजकालचं जीवन इतकं धकाधकीचं झालंय की अनेकांना आध्यात्मिक गोष्टींवर विचार करायला वेळ काढणं कठीण जातं. तुम्हाला काय वाटतं आपल्याला देवाची गरज आहे का? [उत्तरासाठी थांबा.] जीवनात खऱ्या अर्थानं आनंदी होण्यासाठी आध्यात्मिक मूल्यं जपणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारं एक वचन तुम्हाला शास्त्रातून वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास लूक ११:२८ वाचा.] आपल्याला देवाची गरज का आहे याची तीन कारणे या नियतकालिकात देण्यात आली आहेत.”