यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग बायबल विद्यार्थ्याला संघटनेबद्दल माहिती देण्यासाठी केला जाऊ शकतो
१. यहोवाची इच्छा या नवीन माहितीपत्रकाचा त्रिसूत्री हेतू काय आहे?
१ यहोवाच्या इच्छेनुसार कोण कार्य करत आहेत? या नवीन माहितीपत्रकाचा वापर करण्यास तुम्ही सुरुवात केली आहे का? याचा उद्देश (१) यहोवाच्या साक्षीदारांबद्दल, (२) आपल्या कार्यांबद्दल (३) आपल्या संघटनेचे काम कसे चालवले जाते यांबद्दलची माहिती बायबल विद्यार्थ्याला देणे हा आहे. या नवीन माहितीपत्रकात एका पानावर एकच अध्याय आहे. त्यामुळे बायबल विद्यार्थ्याचा अभ्यास संपल्यावर सहजपणे पाच-दहा मिनिटांत एका अध्यायावर चर्चा केली जाऊ शकते.
२. नवीन माहितीपत्रकाची रचना आणि त्याचे वैशिष्ट्ये सांगा.
२ याची रचना कशी आहे? या माहितीपत्रकाचे तीन भागांत वर्गीकरण केलेले आहे. पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भागात यहोवाच्या संघटनेचे वेगवेगळे पैलू मांडण्यात आलेले आहेत. यातील सर्व २८ अध्यायांचे शीर्षक प्रश्नार्थक स्वरूपात आहेत आणि त्यानंतरचे ठळक शब्दांतील पोटमथळे त्या प्रश्नांची उत्तरे आहेत. या माहितीपत्रकात जवळजवळ ५० देशांचा चित्रांसकट उल्लेख करण्यात आला आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कार्य किती वेगाने वाढत आहे याची जाणीव होते. बऱ्याच अध्यायांत “आणखी जाणून घ्या” ही चौकट आहे, ज्यात असे काही व्यावहारिक सल्ले आहेत जे तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्याला लागू करण्याचे उत्तेजन देऊ शकता.
३. यहोवाची इच्छा या माहितीपत्रकाचा वापर आपण कसा करू शकतो?
३ त्याचा उपयोग कसा करावा? अध्यायाच्या शीर्षकाची सुरुवात ज्या प्रश्नाने केली आहे तो प्रश्न बायबल विद्यार्थ्याला विचारा. त्यानंतर, तुम्ही दोघे मिळून तो अध्याय वाचल्यावर त्यातील ठळक पोटमथळे कोणते आहेत ते सांगा. शेवटी, पृष्ठाच्या अखेरीस जे उजळणी प्रश्न दिले आहेत त्यावर चर्चा करा. तुम्ही पूर्ण अध्याय वाचून काढू शकता किंवा मग एकएक भाग वाचून त्यावर चर्चा करू शकता. तेथे उल्लेख करण्यात आलेली कोणती वचने तुम्ही वाचाल याचा आधीच विचार करा. अध्यायात दिलेल्या चित्रांवर आणि “आणखी जाणून घ्या” या चौकटीवर चर्चा करायला विसरू नका. खरेतर, एकामागोमाग एक अध्यायावर चर्चा केली जाऊ शकते पण, काही वेळा प्रसंगानुरूप मधले काही अध्याय वगळून आपण पुढील अध्यायावर चर्चा करू शकतो. जसे की, एखादे विभागीय संमेलन किंवा अधिवेशन येणार असेल तर तुम्ही लगेच ११ वा अध्याय घेऊ शकता.
४. नवीन साधन मिळाल्याबद्दल तुम्ही आनंदी का आहात?
४ आपण जेव्हा एखाद्याशी बायबल अभ्यास करतो तेव्हा आपण त्याला आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल जाणून घेण्यास मदत करतो. पण त्याचबरोबर आपण त्याला यहोवाच्या संघटनेचीसुद्धा माहिती देणे महत्त्वाचे आहे. (नीति. ६:२०) आपल्याला असे साधन मिळाले आहे जे वापरण्यास अगदी सोपे आहे याबद्दल आपण किती आनंदी आहोत!