“तू भिऊ नको”
१. यिर्मयाप्रमाणे आपल्याला कोणत्या आव्हानांचा सामना कदाचित करावा लागेल?
१ यिर्मयाला संदेष्टा म्हणून कार्य करण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा आपल्याठायी योग्यता नाही असा विचार करून तो घाबरला. पण यहोवाने त्याला आश्वासन दिले: “तू भिऊ नको,” आणि त्याला सोपवलेले काम साध्य करण्यासाठी शक्ती दिली. (यिर्म. १:६-१०) आज आपण, लाजाळू स्वभावामुळे किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे सेवाकार्यात भाग घेण्यास कचरू. बऱ्याच वेळा लोक आपल्याला कसा प्रतिसाद देतील किंवा कोणत्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहतील या भीतीने आपण सेवाकार्यात भाग घेत नसू. आपण या भीतीवर मात कशी करू शकतो, आणि यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतील?
२. पूर्व तयारी केल्याने सेवाकार्य करण्याच्या संबंधाने वाटणारी भीती कशी कमी होईल?
२ पूर्व तयारी करा: भीती कमी करण्यासाठी आपण आधीपासूनच पुरेशी तयारी करू शकतो. जसे की, संभाषणाला खीळ घालणाऱ्या विषयांची जर आपण आधीच उजळणी केली, तर क्षेत्रात जेव्हा लोक आक्षेप घेतात तेव्हा आपण त्यांना उत्तर देऊ शकू. (नीति. १५:२८) म्हणून शाळेत किंवा सेवाकार्यात ज्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागतो त्यांचा कौटुंबिक उपासनेच्या वेळी आपण सराव करू शकतो.—१ पेत्र ३:१५.
३. यहोवावरील भरवसा आपल्याला भीतीवर मात करण्यास कशी मदत करतो?
३ यहोवावर भरवसा ठेवा: भीती कमी करण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय म्हणजे देवावर भरवसा ठेवणे. यहोवा आपल्याला आश्वासन देतो की तो आपल्याला साहाय्य करेल. (यश. ४१:१०-१३) याहून अधिक संरक्षण आपल्याला कोठे मिळेल का? येशूने असे आश्वासन दिले की आपल्यासमोर जेव्हा अनपेक्षित प्रसंग उद्भवतो, तेव्हाही देवाचा पवित्र आत्मा आपल्याला उत्तम रित्या साक्ष देण्यास मदत करेल. (मार्क १३:११) म्हणून यहोवाजवळ नियमितरित्या पवित्र आत्म्याची मागणी करा.—लूक ११:१३.
४. आव्हानांचा सामना करत, सेवाकार्यात टिकून राहिल्याने कोणते आशीर्वाद लाभतात?
४ आशीर्वाद: आव्हानांवर मात करूनसुद्धा जेव्हा आपण सेवाकार्यात टिकून राहतो, तेव्हा भविष्यात येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यास आपल्याला शक्ती मिळते. पवित्र आत्म्याचे गुण असलेले धैर्य व धाडस आपल्यात येते. (प्रे. कृत्ये ४:३१) आपण जेव्हा यहोवाच्या मदतीमुळे भीतीवर मात करतो तेव्हा यहोवा आपले रक्षण करेल यावरील आपला विश्वास आणि भरवसा मजबूत होतो. (यश. ३३:२) आपण आपल्या स्वर्गीय पित्याला खूश करत आहोत हे समजल्यावर आपणही आनंद आणि समाधान अनुभवतो. (१ पेत्र ४:१३, १४) तर, राज्याचा संदेश धैर्याने सांगण्यास घाबरू नका; यहोवा नेहमीच आपली मदत करेल हा विश्वास ठेवा.